Bhaubij,भाऊबीज माहिती मराठी,भाऊबीज निबंध मराठी,भाऊबीज कशी साजरी करावी?बहीण भावाचा सण भाऊबीज,भाऊबीज साजरी करण्यामागचे महत्व,भाऊबीज मुहूर्त 2021,भाऊबीज मुहूर्त 2022.
आपण दरवर्षी खूप मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा करतो.भारतात सर्वात जास्त दिवस साजरा केला जाणारा सण म्हणून ओळखला जातो.दिवाळी या पाच दिवस चालणाऱ्या सणात विविध सण येतात.धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन,दिवाळी पाडवा,भाऊबीज अशी सणांची रेलचेल दिवाळी या एकाच सणामध्ये असते.या सर्व सणांपैकी आज आपण भाऊबीज या सणाची माहिती बघणार आहोत.
बहीण भावाचा सण भाऊबीज
भाऊबीज हा सण खऱ्या अर्थाने बहीण आणि भावाच्या प्रेमाचा सण म्हणून ओळखला जातो.या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जाऊन तिच्या हातचे गोडधोड पदार्थ चाखत असतो.बहीण पण आपल्या भावाला विविध प्रकारचे पदार्थ भरवत असते.खऱ्या अर्थाने बहीण भावाचा उत्सव या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळत असतो.
या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते.भाऊ पण आपल्या लाडक्या बहिणीला तिच्या आवडतीची भेटवस्तू देऊन तिला खुश ठेवत असतो.बहीण भाऊ एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येऊन त्याविरुद्ध लढण्याचे बळ मिळवण्यासाठी हा सण खूप महत्वाचा आहे.
भाऊबीज का साजरी करण्यात येते?
दरवर्षी कार्तिक शुध्द द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो.पौराणिक कथेनुसार थोडक्यात सांगायचे झाले तर याच दिवशी यम हा त्याची बहीण यामिकडे जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितिया म्हणूनही ओळखले जाते.या दिवशी द्वितीयेचा आकर्षक चंद्र दिसत असतो.चंद्राच्या साक्षीने भाऊ बहिणीच्या प्रेमाची जपणूक करणारा हा दिवस मानला जातो.
या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो.बहीण भावास न्हाऊ माखु घालते.संध्याकाळी चंद्राचे दर्शन घेऊन बहीण आपल्या भावाला ओवाळते.भाऊ पण आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी देत असतो.
आधुनिक काळात बहीण भावाचे नाते जपणारा सण भाऊबीज
आजच्या आधुनिक काळात स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहेत.जो तो आपल्या नात्याच्या व्यक्तींना ओळखेणा झाला आहे.ज्याला त्याला आपले काम प्रिय आहे.अशा प्रकारे भरकटत चाललेल्या समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न करणारा सण म्हणून भाऊबीज ओळखला जातो.
आजच्या युगात भाऊ लोक काय म्हणतील म्हणून तरी बहिणीकडे जात असतो.आजच्या आधुनिक काळात स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आल्यामुळे सर्व नातेसंबंध संपुष्टात आले आहेत.पण भाऊबीज हा सण या सर्व गोष्टींना छेद देणारा सण आहे.आजच्या काळात देखील किंचित अपवाद वगळता सर्व भाऊ बहीण एकत्र येऊन मोठ्या उत्साहात भाऊबीज हा सण साजरा करतात.
भाऊबीज मुहूर्त 2022
भाऊबीज मुहूर्त 2021
या वर्षी भाऊबीज हा पवित्र सण दिनांक 6 नोव्हेंबर 2021 शनिवार या दिवशी येत आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार भाऊबीज मुहूर्त
भावाला तिलक करणे व औक्षण करणे दुपारी 01 वाजून 10 मिनिटे ते दुपारी 03 वाजून 21 मिनिटे हा शुभ मुहूर्त आहे जो एकंदरीत 02 तास 11 मिनिटांचा अवधी आहे.
कोणताही सण किंवा कार्य असूद्या ते मुहूर्त पाहून केले जाते.हिंदू धर्मात मुहूर्त हा खूप महत्वाचा असतो.भाऊबीजेला देखील मुहूर्त पाळुन भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.
भाऊबीज सण कसा साजरा करावा?
How to celebrate bhaubij
बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला सर्वात मोठा सण म्हणून भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.भारतात तसेच विदेशातही भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो.भाऊबीज हा सण कसा साजरा करावा हे आपण पाहणार आहोत.
कार्तिक शुध्द द्वितीयेला भावाने बहिणीच्या घरी जावे.
बहिणीने भावाला अभ्यंग स्नान घालावे.
पूजेचे ताट तयार करावे.
ताटात अक्षदा,कुंकू,हळद,सोने,गोड बर्फी, करदोटा असावा.
शुभ मुहूर्त पाहून बहिणीने भावाला औक्षण करून ओवाळावे.
यमाच्या नावाने दिवा लावून बाहेर ठेवावा.
बहिणीने भावाला आवडीचे पदार्थ खाऊ घालावे.
भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी.
या प्रकारे भाऊबीज हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.बहीण भावाचा सण म्हणतात तो याच कारणामुळे.भाऊबीज हा दिवाळीतील सर्वात महत्वाचा समाजातील प्रेम , आपुलकी निर्माण करणारा सण आहे.Bhaubij,भाऊबीज माहिती मराठी,भाऊबीज निबंध मराठी,भाऊबीज कशी साजरी करावी?बहीण भावाचा सण भाऊबीज,भाऊबीज साजरी करण्यामागचे महत्व,भाऊबीज मुहूर्त 2021,भाऊबीज मुहूर्त 2022.
हा Information G वरील लेख आवडला तर नक्की शेअर करा.