Jagatik hruday din in marathi अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी

 Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

 Jagatik hruday din in marathi, World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.आजच्या आधुनिक,धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो,आणि मग एखाद्या दिवस अचानक कळत की अमुक अमुक चा हृदय विकाराने मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने हृदय विकारबाबत खूप कार्यक्रम राबवले जातात.ज्याने त्याने आपल्या हृदयाची काळजी घेतलीच पाहिजे.jagtik hruday din,२९ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो की हा आजार जागतिक पातळीवर आणि खूप मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे,लोकांना त्याविषयी माहिती व्हावी हा या मागे हेतू आहे.


हार्ट अटॅक म्हणजे काय? ( What is heart attack?)


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांनपैकी एखादी रक्तवाहिनी बंद पडली की हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा बंद होतो आणि हार्ट अटॅक येतो.


हार्ट फैल्यूअर म्हणजे काय? ( What is heart fellure?)


या मध्ये हृदयाचे स्नायू कमजोर होतात आणि हृदय प्रसरण पावते,हृदयातून रक्त बाहेर टाकले जाते त्याला पंपिंग असे म्हणतात.साधारण व्यक्तीचे हृदय ५० ते ६०% पंपिंग क्षमतेने काम करते तर हार्ट फैल्यूअर व्यक्तीमध्ये हे प्रमाण ४०% कमी होते.


का होतो हृदय रोग? (Why does heart disease occur?)


वर्ल्ड हार्ट फेडरेशन च्या मते धूम्रपान,डायबेटिस,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,प्रदूषण या मुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहे,त्यांच्या मते दरवर्षी हृदय आजारांनी लाखो लोक मरण पावतात.


नॉन कम्यूनेकेबल डीसिस


हृदय विकार हा संसर्गजन्य आजार नसून तो मानवाच्या जीवनशैली विरुद्ध आजार आहे,माणसाची जीवनशैली बदलल्यास तो होतो.उदा.धूम्रपान,तेलकट पदार्थ अधिक खाणे,लठ्ठपणा ई.जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी २०१३ या सालापासून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या मते हा वाढणारा आजार २०२५ पर्यंत २५% कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.या आजाराबद्दल लोकांना माहिती व्हावी या साठी दर २९ सप्टेंबर रोजी हा jagatik hruday din साजरा केला जात असतो.


हृदय विकाराची लक्षणे (Symptoms of heart disease)


हृदय रोग येण्यापूर्वी महिनाभर त्याची वेगवेगळी लक्षणे दिसून येत असतात,त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले असता,जीवावर बेतू शकते,म्हणून हृदय विकाराची लक्षणे ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,चला तर पाहू कोणकोणती लक्षणे दिसून येतात.


चालताना छाती खूप जड झाल्यासारखी वाटते.

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो.

चालताना दम लागतो.

काहीही खाताना जळजळ होते.

काही खाल्ल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणे,चालताना दम लागणे.

चक्कर, उलटी,पोटाच्या समस्या दिसणे 

सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे थकवा येणे,चालताना डावा हात दुखणे,खोकला, कफ आणि हात पाय यांना सूज येणे.हे गंभीर लक्षणे आहेत ही लक्षणे दिसून येताच डॉक्टरांची भेट घ्यावी.


हृदय विकार काय काळजी घ्यावी? (What to watch out for heart disease?)


खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.तेलकट,मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

सर्वात महत्वाचे तेल कमी वापरा,नैसर्गिक तेल वापर करा.

व्हिटॅमिन बी6,फॉलीक अँसिड,व्हिटॅमिन सी घ्या.

३० वर्षानंतर रक्तदाबाची वेळेवर तपासणी करावी.

धूम्रपान टाळावे.

रोज व्यायाम,योगासने करावीत.


मानवाचे हृदय हा मानवाचा सर्वात महत्वाचा अवयव आहे,त्याची निगा राखणे खूप गरजेचं आहे. खाणपिण्यावर नियंत्रण,व्यायाम, योगासने या सर्व कारणांमुळे हृदय विकार होण्यापासून बचाव होऊ शकतो.मानवाची बदलती जीवनशैली ही या आजारास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे.

आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल,या मुळे होणारी धावपळ,कामाचा ताण,धूम्रपान या सर्व कारणांमुळे हृदय विकार आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढू लागला आहे.आपण वेळेत सावध होऊन हृदय विकार होण्यापासून स्वतःचा बचाव करणे हे खूप गरजेचं बनलं आहे.


Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. Information G या आमच्या ब्लॉगला नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.