स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध
प्रस्तावना - सर्व भारतीय नागरिक दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.भारताचा प्रमुख राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो.लहान मुलांना तर या दिवसाची ओढत लागून राहिलेली असते.लहान मुलांच्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा दिवस असतो.लहान मुलांना त्यांच्यातील गुण या दिवशी दाखवण्याची संधी दिली जाते.दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत काढून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे.हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून,अनेक राष्ट्र भक्तांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत.आज आपण या लेखात स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध सर्व इयत्तांसाठी उपयुक्त पाहणार आहोत.
75 वा स्वातंत्र्य दिन निबंध ( 75th Indipence day essay in Marathi)
भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून यावर्षी म्हणजेच सन 2022 यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे.भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे परंतु, हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व वीरांना आपण अभिवादन केले पाहिजे.कारण, त्यांच्यामुळेच आज आपण भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.
या 75 वर्षात भारतामध्ये मोठे अमलाग्र बदल घडून आले.भारत आज जगामध्ये एक महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत हा आधुनिक युगातील भारत बनला असून,आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण झाले आहे.
आज भारताचे नाव जगामध्ये मोठ्या आदराने घेतले जाते.जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो.भारत जगातील व्यापाराचे आज प्रमुख केंद्र बनला आहे.स्वातंत्र्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आहे.आज भारतीय जगात कुतूहलाचा विषय बनला आहे.
आज भारत खऱ्या अर्थाने एक स्वावलंबी देश म्हणून नावारुपास आला आहे.परक्यांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवून गरुड पक्षाप्रमाणे भरारी घेणारा भारत आज जगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या योद्ध्यांचा हाच खरा सन्मान म्हणता येईल.जय हिंद जय भारत!
स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?
भारताला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून,सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत घालून हे स्वातंत्र्य मिळाले आहे.स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील अनेक लहान मुले,तरुण,स्त्रिया,वयोवृद्ध पुरुष या सर्वांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यात घालवले.या सर्वांच्या प्रयत्नाने भारताला स्वातंत्र्य मिळाले.हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व बलिदान दिलेल्या वीर पुरुषांसाठी या वीर पुरुषांची आठवण आणि त्यांचा मान या दिवशी राखण्यात येतो.स्वातंत्र्य दिन हे भारताच्या आनंदाचे,उत्साहाचे,स्वातंत्र्याचे,ऐक्याचे,भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते.या सर्व गोष्टींसाठी भारतात स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम
15 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये सर्वत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते.शाळा,विद्यालय,कॉलेज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात.या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा, संस्कृती कार्यक्रम,प्रभात फेऱ्या,भाषणे,नाटके,देशभक्तीपर गीते या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर मेजवानी असते.या सर्व कार्यक्रमांंबरोबरच मुलांसाठी खाऊची देखील विशेष काळजी घेतली जाते.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आनंदामुळे सर्व मुलांचे तोंड खाऊ देऊन गोड केले जाते.
स्वातंत्र्य दिनाची तयारी
शाळांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची तयारी जवळ जवळ 15 ते 20 दिवस अगोदर चाललेली असते.यामध्ये मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसविणे, मुलांकडून कवायत करून घेणे,भाषणे पाठ करून घेणे या प्रकारची लगबग सर्व शाळांमध्ये सुरू असते.ही कामे सर्व शिक्षक आणि मुले मोठ्या आनंदाने आणि न थकता करत असतात.शाळेची सजावट,रंग-रांगोळी, शाळेची स्वच्छता या गोष्टींची देखील मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाते.
15 ऑगस्ट राष्ट्रीय एकात्मतेचा सण
भारतावर इंग्रजांनी सुमारे १५० वर्ष राज्य केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य आपणाला सहजासहजी मिळाले नसून यासाठी अनेक भारतीय नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.भारतीय नागरिकांनी केलेल्या या महान त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे.भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवून इंग्रजांना आपल्या देशातून पळून लावले म्हणून आपण या मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घ्यायला हवा.
एखादा देश लहान असू द्या परंतु,त्या देशाचे नागरिक एकजुटीत असेल तर, त्या देशावर कुणीही सत्ता मिळवू शकत नाही.स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय नागरिकांसाठी हाच महत्त्वाचा संदेश आहे की,सर्व भारतीय नागरिकांनी एकजुटीत रहा आणि राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवा. भारतातील सर्व नागरिक एकजूट होऊन एक नवीन भारत,शक्तिशाली भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा करूयात.
स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण माहिती आणि भाषण सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त नक्की वाचा.
स्वातंत्र्य दिन शौर्याचा दिवस
भारतीय स्वातंत्र्य दिन हा भारतीय राष्ट्रीय सणाबरोबरच,भारतीय लोकांसाठी पराक्रमाचा आणि शौर्याचा दिवस म्हणून देखील संबोधला जातो.भारतीय नागरिकांनी दाखवलेल्या पराक्रम आणि शौर्य मुळेच भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले.हा दिवस सर्व भारतीय नागरिकांना भारतीय महापुरुषांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देतो.भारतीय नागरिकांनी भारताच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी असेच शौर्य दाखवले पाहिजे ही शिकवण आपल्याला या सणातून मिळते.
स्वातंत्र्य दिन भारताच्या सामर्थ्याचा गौरव दिन
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भारतावर पाकिस्तान आणि चीन यांनी वेळोवेळी आक्रमण केले परंतु,भारतीय सैनिक त्यांना पुरून उरले. भारताच्या या पराक्रमाची दखल स्वातंत्र्य दिनाच्या दिल्ली येथील कार्यक्रमात घेतली जाते.दिल्लीतील राजपथावर भारतीय लष्करातील विविध शस्रांचे प्रदर्शन केले जाते.भारत आत्ता पूर्वीसारखा राहिलेला नसून, भारत एक मोठी लष्करी महासत्ता म्हणून उदयाला येत आहे,याचे प्रतीक होय.आम्ही भारतीय लोक कुणावरही पहिले अतिक्रमण करणार नाही आणि आमच्यावर अतिक्रमण झाले तर शांत बसणार नाही हा इशारा या दिवशी सर्वांना दिला जातो.
स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण माहिती नक्की बघा.
शेवटी एवढेच
भारतीय स्वातंत्र्य दिन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी संपूर्ण भारतामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करत असतात.सर्व नागरिकांमध्ये देशभक्तीचा जोश ओसंडून वाहत असतो.लहान मुले आणि महिला देखील याला अपवाद नसतात.भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हाच सर्वात मोठा विजय मानला जातो.भारतीय नागरिकांना आपल्या पूर्वजांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाण आहे हे या सणातून व्यक्त करण्यात येते.अशाप्रकारे 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा.