राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध
मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट
भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे झाला.मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लष्करात प्रवेश केला.भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत सुरू झाला.मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारताने सलग तीन वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवले.जागतिक हॉकी खेळात पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या या खेळाडूला हॉकीचे जादूगार असेच म्हटले जाते.
भारत सरकारने देखील मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची दखल लक्षात घेऊन त्यांना 1956 साली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल भारत सरकारने त्यांचा येथोचित असा गौरव केला.हॉकी खेळात 1000 हून अधिक गोल करण्याची अविश्वासनीय अशी कामगिरी त्यांनी केली आहे.याच कारणामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे संबोधले जाते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व ( Importance of national sports day)
मानवी आयुष्यामध्ये खेळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.खेळाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत.मानवाची शारीरिक क्षमता विकसित करणे आणि आरोग्य निरोगी राखणे खेळामुळे शक्य होऊ शकते."व्यायामाला बिना पैशाचा डॉक्टर "असे संबोधले जाते आणि खेळामुळे मोठ्या प्रमाणावर व्यायाम होतो म्हणूनच,खेळाच्या माध्यमातून माणसाला निरोगी आयुष्य जगता येणे सहज शक्य आहे.
आजच्या आधुनिक युगात माणूस धकाधकीच्या आयुष्य जगत आहे. माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुद्धा वेळ नाही.आजच्या या आधुनिक युगात खेळाचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले आहे.लोकांना खेळाचे महत्व पटवे म्हणून शासन विविध प्रयत्न करताना दिसून येते अगदी,शाळा स्तरावरून याचा प्रयत्न होताना दिसून येतो. खेळाडूंना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात.भारतासारख्या देशात असंख्य असे खेळाडू तयार व्हावे ही सरकारची इच्छा असते परंतु,या धकाधकीच्या आयुष्यात ते साध्य होताना दिसत नाही.
जीवनात खेळाचे महत्व निबंध ( Sports importance in life essay in marathi)
मानवी जीवनामध्ये खेळाला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आले आहे.भारतात देखील प्राचीन काळी कुस्ती,मल्लखांब, विविध मैदानी खेळ यांच्या स्पर्धा भरवल्या जात.राजे-महाराजे खेळांना आश्रय देत.त्याकाळी खेळांचे महत्व लोकांनी जाणले होते दुर्दैवाने आजच्या आधुनिक युगात आपण खेळाचे महत्व विसरत चालले आहोत. खेळांची खरी गरज आजच्या युगातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आहे.
आज भारतामध्ये जगातील दोन नंबरची लोकसंख्या असून देखील, ऑलम्पिक मध्ये पदक मिळवताना भारतासारख्या देशाची दमछाक होताना दिसून येते.भारतापेक्षा लहान-लहान देश मोठ्या प्रमाणावर पदके मिळवतात.या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे. देशातील मुलांना शालेय स्तरापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असून भारताने खेळासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर राहणे हे अत्यंत भूषणावह आणि देशाच्या लौकिकात भर घालणारी बाब आहे.मानवी जीवनामध्ये खेळासाठी रोज किमान अर्धा तास तरी द्यायला हवा.खेळामुळे माणसाचा व्यायाम होतो.व्यायामामुळे माणसाचे आरोग्य निरोगी राहते.खेळ हा मनुष्याला जीवनामध्ये कधीच निराशा येऊ देत नाही.
राष्ट्रीय क्रीडा दिन निबंध 10 ओळींमध्ये ( National Sports Day essay 10 lines in marathi)
राष्ट्रीय क्रीडा दिन कसा साजरा करावा (How to celebrate National Sports Day)
- या दिवशी खेळाच्या स्पर्धा भरवाव्यात.
- आपल्या गावातील खेळाडूंना बक्षीस द्यावीत.
- नवीन खेळाडूंना प्रोत्साहन पर बक्षीस द्यावीत.
- नागरिकांना खेळाचे महत्व माहित व्हावे म्हणून भाषणे ठेवावीत.
- खेळाचे महत्व सांगणारे चित्रपट दाखवा.
- खेळाचे महत्व सर्वांना समजावून सांगा.
- या दिवशी भारतातील प्रसिद्ध खेळाडूंची संघर्ष कथा मुलांना सांगावी.
- सर्व नागरिकांना खेळाचे महत्व पटवून द्यावे.
जगामध्ये आज खेळाला खूप महत्त्व दिले जाते परंतु,भारतामध्ये याउलट स्थिती दिसून येते.भारतामध्ये आज देखील खेळांविषयी लोक फारसे चांगल्या नजरेने पाहताना दिसून येत नाही.भारतीय लोक खेळांबाबत अजून पूर्णपणे समजदार झालेले नसून,खेळ हे केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून आपले आरोग्य सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे कामगिरी बजावणारे अस्त्र आहे हे लक्षात घ्यावे.