जागतिक साक्षरता दिन, International Literacy Day 8 September in marathi

 
जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi

जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi 


साक्षरता म्हणजे काय? तर साक्षरता म्हणजे रोजच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीला आकडेमोड जमणे किंवा जीवनात व्यवहार ज्ञान कळण्याईतपत अंक,अक्षर ओळख असणे होय.आज जगात पाहिले तर सर्वात जास्त साक्षर असलेले देश प्रगत आहे आणि सर्वात निरक्षर देश अप्रगत राहिले आहेत.साक्षरता हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.साक्षरता म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले श्रम होय.आजच्या आधुनिक काळात साक्षरता हा शब्द खूप मौल्यवान झाला आहे.साक्षरता हि काळाची गरज बनली आहे.आज जगात खूप देश,राज्य अशी आहेत की जी साक्षरतेच्या बाबतीत मागासलेली आहेत.पुरुष वर्गापेक्षा स्री वर्ग या बाबतीत खूप मागासलेला आहे.जगातील हा साक्षरतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी युनेस्को ने 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.या दिवशी जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याचा संकल्प सोडला जातो.


निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा शाप आहे.पण माणूस निरक्षर का राहतो? याचा विचार केला आहे का आपण? माणूस निरक्षर राहण्याची खूप कारणे आहेत.


 • जगातील बहुतेक विद्यार्थी घरच्या गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
 • जगातील काही भटक्या विमुक्त जमाती त्यांच्या अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
 • स्थलांतरामुळे खूप विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही.
 • काही मुले बालकामगार बनतात म्हणून ते शिक्षण घेऊ शकत नाही.

या सर्व कारणांमुळे साक्षरता म्हणावी तशी दिसून येत नाही.युनेस्को च्या माध्यमातून या सर्व कारणांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भारतात सर्व प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते.यामुळे गरीब विद्यार्थ्यांची जेवणाची गरज भागली जाऊन त्यांना शिक्षणाचा आनंद मिळत आहे.भटक्या विमुक्त जमाती साठी जागोजागी शाळा चालवण्याचे कार्य सेवाभावी संस्था,सरकार करत आहे.सरकार निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.भारतात मध्यंतरी प्रौढसाक्षर वर्ग सुरू करण्यात आले होते त्यामध्ये प्रौढ व्यक्तींना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जात असत.आज अगदी कोणत्याही कंपनीत,कारखान्यात ,सरकारी नोकरी असो व खाजगी नोकरी असो सर्व क्षेत्रात शिक्षण गरजेचं आहे.अगदी रोजंदारीवर जरी काम असले तरी सही करण्यापुरते शिक्षण लागतेच.


साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी


 • ज्या त्या भागात तेथील बोलीभाषेत शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी जेणेकरून तेथील नागरिक,विद्यार्थी यांमध्ये शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण होईल.
 • लहान मुलांना हसत,खेळत मजेदार शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी.लहान मुले शिक्षणाने लवकर कंटाळून जाऊ नये म्हणून खेळ,गाणी,गप्पा,गोष्टी यांमधून शिक्षण देण्याची गरज आहे.
 • शिक्षणात गावातील जाणत्या व्यक्तींची मदत घ्यावी.त्यांच्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करावा.
 • जागतिक शिक्षण क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना वेळेवर त्या त्या बदलांविषयी प्रशिक्षण देण्यात यावे.
 • शाळेत ग्रंथालये असावीत,ग्रंथ,पुस्तके हेच आपले गुरू असतात.
 • ग्रामीण भागात ग्रामीण विकास,सहकार्य या विषयी विविध कार्यक्रम राबवावेत.
 • मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांसाठी शाळेत विविध स्पर्धा, गायन,वादन,सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी.
 • शासनाच्या सर्व योजना शाळा पातळीवर राबवण्यात याव्यात म्हणजे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतात.


जागतिक साक्षरता दिन का साजरा करण्यात येतो


 • जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
 • निरक्षर नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून दिली पाहिजे.
 • निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून जागतिक पातळीवर प्रगती साधने.
 • निरक्षरता तोटे नागरिकांना पटवून देऊन निरक्षरतेमुळे येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी त्यांना साक्षर करणे.
 • जगाची एकत्रित प्रगती साधण्यासाठी नागरिकांना साक्षर बनवून जगाची प्रगती साधणे.
 • सामूहिकपणे जगातील निरक्षरतेवर मात करणे.
 • जागतिक साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे. 

निरक्षरतेमुळे होणारे परिणाम


 • निरक्षरता जीवनातील सर्वात मोठा कलंक आहे.
 • निरक्षर व्यक्ती जीवनात यशस्वी होत नाही.
 • निरक्षर व्यक्ती प्रगती साधू शकत नाही.
 • निरक्षर राष्ट्रे अप्रगत राहतात.
 • निरक्षरतेमुळे जीवनात खूप संकटे,अडचणी येतात.
 • निरक्षरतेमुळे जीवनमान खलावले जाते.
 • निरक्षरता आजच्या काळात सर्वात मोठा शाप आहे.
 • निरक्षरतेमुळे जगातील बहुतेक देश अप्रगत राहिले आहेत

या प्रकारे निरक्षरता हा मानवी जीवनात खूप मोठा कलंक आहे.महात्मा फुले यांनी लोकांच्या साक्षरतेसठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.भारतातील समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते आणि भारतातील नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून देण्यात समाजसुधारकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा शिक्षणाला खूप महत्व आहे. 

आज भारतात व जगात सुद्धा शिक्षणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तरी सुध्दा आजच्या काळात मोठ्याप्रमाणात शिक्षण गळती,शिक्षण नघेण हे प्रकार दिसून येतात. स्रियांच्या बाबतीत हे प्रमाण अधिक आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.कोणत्या समस्या,अडीअडचणी आहेत.यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचा विचार केला पाहिजे.

जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्याची गरज आहे.प्रत्येक घटकाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जगातील नागरिक, मुले हे कोणत्या कारणाने निरक्षर राहिले याचा विचार केला पाहिजे,त्यावर संशोधन करून मग त्यानुसार प्रयत्न करणे गरजेचे आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर अभियान राबविण्यात येत आहे.युनेस्को या बाबतीत खूप प्रयत्न करत असते.युनेस्कोच्या सहकार्याने जगातील बहुसंख्य देश,नागरिक साक्षर बनून त्यांनी निरक्षरतेवर मात केली आहे.

 

जागतिक साक्षरता दिवस 2022 थीम (World Literacy Day 2022 Theme )जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi


नेहमी विचारले जाणारे प्रश्न - 


1. जागतिक साक्षरता दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

उत्तर - जागतिक साक्षरता दिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.


2. जागतिक साक्षरता दिवस 2022 ची थीम कोणती आहे?

उत्तर - "साक्षरता शिकण्याची जागा बदलणे" आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार, समान आणि समावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी साक्षरता शिकण्याच्या स्थानांच्या मूलभूत महत्त्वावर पुनर्विचार करण्याची संधी असेल.


3. जागतिक साक्षरता दिवस 2022 कधी आहे?

उत्तर - गुरुवार,08 सप्टेंबर,2022 रोजी आहे.आजचा जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.लेख आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.आणि आमच्या Information G या ब्लॉगला नक्की फॉलो करा.