असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा

 असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi

भाद्रपद शुध्द तृतीयेला सुवासिनी स्त्रिया हरतालिका व्रत करतात.या दिवशी हरतलिकेचा उपवास करतात. हरतालिकेची पूजा करतात, भगर खाऊन उपवास करतात.सामूहिक समारंभ आयोजित करून हळदी कुंकू,भेटी गाठी,मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले जातात. हरतालिकेच्या दिवशी स्रिया जागरण करून दुसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन करतात.हरतालिकेच्या दिवशी आदिमाया व शिवशक्ती यांचे मिलन झाले व जगतकल्यानाचे कार्य पार पाडले.


हरतालिका धार्मिक कथा


राजा दक्षाच्या आपमनाने क्रुद्ध झालेल्या शंकरांना माता पार्वतीने खडतर तप करून प्रसन्न करून घेतले.अनुपम लावण्यवती,राजकन्या,रूपवती,सर्व सुखांत लोळणारी असूनही देवांच्या रक्षणासाठी शिवकृपेची गरज असून या सर्व सुखांवर पाणी फिरून पार्वतीने शंकरांशी विवाह केला.सर्व देवांचे दुःख, संकटे दूर केली.अशी धार्मिक कथा सांगितली जाते.


हरतालिकेच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी


1) क्रोध करणे टाळावे

या दिवशी क्रोध,राग,मत्सर करू नये,शांत अंतःकरणाने पूजा करावी,उपवास,व्रत करावे,क्रोध या दिवशी जवळही येऊ देऊ नका.


2) अपमान करू नये

या दिवशी कोणाचाही अपमान करू नये,लहान थोर सर्वांचा आदर करावा,कुणालाही दुःख देऊ नये.कोणीही दुखावेल असे अपशब्द कुणालाही वापरू नये.


3) झोपू नये

हरतालिका व्रताच्या दिवशी झोपू नये,रात्रभर भजन,कीर्तन करावे,व्रत करणाऱ्याने दिवस रात्र झोपू नये,भजन कीर्तन करावे.


4) खाणे-पिणे टाळावे

हरतालिका व्रत हे निर्जल करण्याचे विधान आहे,या दिवशी खाणे पिणे टाळावे,जास्त आवश्यकता वाटल्यास दूध,पाणी,फळ आहार अगदी अल्प प्रमाणात करावा,शक्यतो पाणी व दूध घ्यावे.


हरतालिकेचे महत्व


भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात हरतालिका साजरी केली जाते.

महिलांनी या दिवशी व्रत करावे.निर्जल उपवास करावा,रात्री फलाहार घ्यावा.

हिंदू धर्मानुसार परवतीमातेने केलेल्या व्रतामुळे त्यांना शिव शंकराची प्राप्ती झाली.

देशात सर्वत्र हरतालिका साजरी करण्यात येते फक्त स्वरूप वेगवेगळे असते.

हिंदुधर्मात हरतालिकेला खूप महत्व आहे.

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो.

या प्रकारे हरतालिकचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे.खासकरून स्रिया दिवशी मोठ्या प्रमाणात व्रत करतात. हिंदू धर्मानुसार हरतालीकच्या दिवशी केलेल्या व्रतामुळ सर्व ईच्छा,आकांक्षा,सुख,समृद्धी प्राप्त होते.


हरतालिका व्रत करण्यास लागणारे साहित्य


 • 1. शिव व पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वाळू आणावी 

 • 2. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी चौपाई

 • 3. चौपई झाकण्यासाठी वस्त्र

 • 4. नारळ

 • 5. पाण्याचा कलश

 • 6. आंब्याची पाने

 • 7. तूप

 • 8. दिवा

 • 9. अगरबत्ती,धूप

 • 10. कापूस

 • 11. कापूर

 • 12. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी एक छानसे पात्र.


हरतालिका व्रत कसे करावे


हरतालिका पूजेसाठी एक लाल वस्त्र पसरून त्यावर भगवान शिव व पार्वतीचे मूर्ती,फोटो ठेवावा.


भगवंतांच्या अभिषेकासाठी एक पात्र घ्या.


अक्षता घेऊन त्यावर कलश स्थापन करावा.


कलाशामध्ये नाने,सुपारी,खारीक,हळद घाला.


कलाशा शेजारी पान,सुपारी ठेवा आणि त्यावर तांदूळ व एक दिवा भरलेली वाटी ठेवा.


पान व सुपारी घेऊन त्यावर अक्षता वाहून गौरी व गणेशाची मूर्ती स्थापन करा.


पूजा सुरू करा देवांना दूध,तांदूळ अर्पण करा.


सर्व देवतांना दीप कलश घालून पूजा करावी.


आमच्या लोकप्रिय पोस्ट नक्की बघा.


बैल पोळा सजावट आणि माहिती नक्की बघा.


अशा प्रकारे हरतालिका व्रत करावे,या व्रतास भारतात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, हरतलिकेच्या व्रत केल्यास सर्व दुःख,संकटे दूर होऊन जीवनात सुख,शांती, समाधान प्राप्त होते. हरतालिकेचे व्रत हे खूप श्रेष्ठ असून जो ते मनोभावे पूर्ण करील त्याच्या सर्व ईच्छा आकांक्षा माता पार्वती व शिव शंकर पूर्ण करतील या प्रकारची अख्यायिका या व्रतामागे आहे.


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हा आमचा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन लेख,माहिती मिळवण्यासाठी आमच्या Information G या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.