बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध
बैल पोळा तिथी,बैल पोळा कधी साजरा केला जातो (When celebrate bail pola)
ऋण व्यक्त करणारा सण बैल पोळा (A debt-giving festival called Bail Poal)
भारत हा देश पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये पूर्वी आणि आत्ता देखील बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी बैल या प्राण्याचा वापर करतात. बैल हा प्राणी मोठ्या प्रामाणिकपणे वर्षभर शेतकऱ्यासाठी म्हणजेच आपल्या मालकासाठी शेतामध्ये राबवत असतो. बैलाला शेतकरी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून समजत असतो. शेतकऱ्याबरोबर वर्षभर राब- राब राबणाऱ्या बैलाला वर्षातून एक दिवस कामातून विश्रांती मिळावी तसेच मालकासाठी राबणाऱ्या या प्राण्याचे ऋण फेडण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो.
बैल पोळा सजावट कशी करावी (How to decorate bull in bail pola)
- बैलांच्या नख्या व शिंगे साळून स्वच्छ करावी.
- बैलांच्या अंगाला तेल चोळावे.
- बैलांच्या अंगावर झुल घालावी.
- सिंगांना छान कलर किंवा सोनेरी कलर लावावा.
- सिंगांना कलर लावल्यानंतर त्यावर रंगेबिरंगी बेगडे चिटकवीत.
- बैलांच्या अंगावर कलर ने उठून दिसेल अशी नक्षी काढावी.
- या दिवशी बैलांना नवीन मोरखी ,नवीन घुंगराची माळ ,मण्यांची माळ घालावी.
- बाजारात बैलांच्या सजावटीचे वेगवेगळे सामान आणावे.
- बैलांच्या पायामध्ये घुंगरांच्या माळा घालाव्यात.
- बैल सजावट आकर्षक आणि मनमोहक करावी.
अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या बैलांची सजावट करताना शेतकरी देखील मागेपुढे न पाहता आवश्यक तो सर्व खर्च करून ,आपला बैल इतर शेतकऱ्यांच्या बैला पेक्षा आकर्षक आणि मनमोहक कसा दिसेल यासाठी प्रयत्न करतात.
बैल पोळा सण कसा साजरा करावा ( How to celebrate bail pola)
बैल पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना मस्तपैकी अंघोळ घालावी. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही कोणत्याही कामाला जुंपू नये हा दिवस बैलांचा मानाचा दिवस असतो बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना आकर्षक आणि मनमोहक रीतीने सजवावे बैलांवर गुलाल भंडाऱ्याची उधळण करावी संध्याकाळी गावच्या ठिकाणी मुख्य दैवताला बैल जोड्यांची वाजत गाजत प्रदक्षिणा घालून आणावी घरी आल्यानंतर बैलांची स्त्रियांनी पूजा करावी आणि त्याला पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा बैलामुळेच आपल्याला वर्षभर जेवायला मिळते म्हणून या दिवशी बैलाला अवश्य पुरणपोळी खाऊ घालावी आपल्या पाहुण्यांना या दिवशी बैलपोळा सणाला आवर्जून बोलवावे अशा रीतीने ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत बैलपोळा सण साजरा केला जातो.
बैल पोळा निबंध मराठी (Bail Poal Essay in Marathi)
या गाण्याप्रमाणेच शेतकऱ्याचं आणि बैलाचा आयुष्य असतं रोज उठून कामावर जाणार आणि काळ्या आईची सर्वांना थकता करणे. मालकाबरोबरच बैल देखील शेतात राबत असतो अशा या बैलासाठी वर्षातून एक दिवस आपण बैलपोळा हा सण साजरा करतो.या दिवशी बैलांना धुतलं जातं चांगली सजावट केली जाते, गावामधून मिरऊन आणले जाते घरी आल्यानंतर ओवाळून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
बैलांप्रती आपल्या असणारे ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. प्राणीदेखील मानवासाठी मोलाचे आहेत हा संदेश या सणामधून दिला जातो. वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी विसावा म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. याचा परिणाम म्हणून बैलांची संख्या घटत चालली आहे. असे असून देखील या सणाचे महत्त्व किंचितही कमी झाले नाही. ज्या लोकांकडे खरे बैल नाहीत ते मातीचे बैल आणून त्यांची पूजा करतात.
भारताच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते.बैल सजावटीच्या वस्तू तयार करून बरेच कामगार आपला उदरनिर्वाह करतात.एकंदरीत बैलपोळा सण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा सण आहे.असा बैलपोळा मला खूप आवडतो.