Pavasala nibandh marathi

 पावसाळा निबंध मराठी


पावसाळा निबंध मराठी


पावसाळा निबंध मराठी (१० ओळींमध्ये)

1.पावसाळा ऋतू जून महिन्यात सुरू होतो.
2.पावसाळा ऋतू सर्वात सुखद असतो.
3.पावसाळ्यात खूप खूप पाऊस पडतो.
4.पावसाळ्यात मोर पिसारा फुलवून नाचतो.
5.पावसाळ्यात सर्वत्र गवत उगते.
6.पावसाळ्यात लहान मुले आनंदाने उड्या मारत पावसात भिजत असतात.
7.पावसाळा सर्वांना आवडतो.
8.पावसाळ्यात आई गरम गरम कांदा भजी करते 
9.पावसाळ्यात पावश्या पक्षी आनंदाने कोकत असतो.
10.पावसाळ्यात शाळेला जायला खूप मजा येते.

प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळा निबंध मराठी 


सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?

लहान मुलांचे पावसाळ्यातील सर्वात आवडते गीत म्हणजे सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?खरंतर लहान मुलांना पावसाळा ऋतू खूप आवडत असतो त्याला कारणेही भरपूर आहेत. उन्हाळा संपून शाळा सुरू झाल्या की पावसाळा ऋतू येतो आणि आम्हा विद्यार्थ्यांना खूप आनंद होतो.पावसाळा ऋतू आल्यावर शाळांना सुट्ट्या मिळतात.पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या करून सोडणे खूप-खूप आवडते.पावसाळ्यात नदी नाल्यांना येणारे पाणी पाहून खूप आनंद होतो.पावसाळ्यात नद्या-नाले दुथडी भरून वाहत असतात.डोंगरांवर,रानामध्ये गुरांना चरण्यासाठी भरपूर गावात वाढलेले असते .सुट्टीच्या दिवशी जनावरे राखणे हे खूप आनंदाचे काम असते.पावसाळ्यात श्रावण महिना येतो आणि या महिन्यात सणांची रेलचेल असते म्हणून पावसाळा दरवर्षी हवाहवासा वाटतो.

नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.

मोराचा नाच आपल्याला पावसाळा ऋतूत पाहायला मिळतो. ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस मोर आनंदाने बेभान होऊन नाचत असतो. हे दृश्य पाहायला खूप खूप आवडते.
असा हा सर्वांना हवाहवासा वाटणारा पावसाळा ऋतू मला खूप-खूप आवडतो.

माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळा निबंध मराठी उन्हाळा संपून खऱ्या अर्थाने पावसाळ्या ऋतूचे आगमन होण्याचे संकेत दिसू लागतात .आभाळामध्ये ढगांची गर्दी होऊन कुठेतरी पावसाचे थेंब पडा यला सुरुवात होते आणि पावसाळा ऋतूचे आगमन झाल्याचे संकेत मिळतात.अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांना पावसाळा ऋतू हवाहवासा वाटत असतो.लहान मुलांना पावसाळ्यात खूप गमती जमती करायला मिळतात तर मोठ्या माणसांना पावसाळ्यामुळे आपल्या पोटाची  खळगी भागवण्यास मदत होणार असते.पावसाळा ऋतू खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद घेऊन येत असतो.पाऊस सुरू असताना भिजण्यामध्ये जी मजा असते तो आनंद काही औरच असतो. पावसाळा सुरू झाला की शाळांना पण वारंवार सुट्ट्या मिळतात. पावसाळ्यात आईच्या हातचे कांदा-भजी खाण्यात खूप मजा असते.पावसाळ्यामध्ये रेनकोट घालून फिरण्यास खूप आनंद मिळत असतो.पावसाळ्यामध्ये रस्त्याने चालताना इतरांच्या अंगावर पाणी उडवण्यातही खूप मजा असते. पावसाळ्यामध्ये मित्र-मैत्रिणी संगे खूप मजा केली जाते. शाळेमध्ये शिकण्यासाठी खूप उत्साहाचे दिवस असतात.पावसाळ्यामध्ये सर्व प्रकारचे प्रदूषण कमी होत असल्याने या दिवसांमध्ये आरोग्यासाठी खूप छान असे वातावरण असते.पावसाळा ऋतूमध्ये श्रावण महिना येत असतो.या महिन्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत असतात श्रावणात ऊन सावल्यांबरोबर पावसाचा देखील खेळ चालू असतो.भारतामध्ये पावसाळा खूप महत्त्वाचा मानला जातो.शेतकऱ्यासाठी तर पावसाळा हा देवच असतो.पावसावरच सर्व शेती अवलंबून असते. भारताचे भविष्य देखील पावसावरच अवलंबून असते म्हणूनच सर्वांना आवडणारा पावसाळा मला देखील खूप खूप आवडतो.

उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळा निबंध मराठी 


शेतकऱ्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ऋतू म्हणजे पावसाळा होय .भारतीय शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा ऋतू खूप महत्त्वाचा असतो.भारतीय अर्थव्यवस्थेसाठी पावसाळा हा ऋतू खूप महत्त्वाचा असतो.जर पावसाळा झाला नाही तर शेतकऱ्यांना आणि पर्यायाने देशाला आर्थिक झळ बसते.पावसाळा ऋतू भारतीय उद्योग-धंद्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो.कच्चामाल तयार होण्यासाठी पावसाची गरज असते.पावसाळ्यामध्ये पर्यटन करण्यासाठी खूप वाव असतो.पावसाळ्यात धबधबे,धरणे,नद्या यांना भेट देण्यास अनुकूल असा काळ असतो.पावसाळ्यामध्ये धरती गवताच्या रूपाने हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते. हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक असतो म्हणून पावसाळ्यात सर्व धरतीच हिरवे वस्त्र परिधान करत असते.एक अर्थाने पूर्ण धरतीच समृद्ध झालेली असते.उन्हाळ्यामध्ये डोंगरे उजाड आणि टक्कल पडल्यागत झालेले असतात परंतु पावसाळ्यामध्ये डोंगरांवर हिरव्या गवताच्या रूपाने केस आलेले असतात.पावसाळा ऋतू हा प्राणी, पक्षी,जीवजंतू या सर्वांनाच आनंद देणारा ऋतू असतो.पावसाळ्यात सर्वांना अनुकूल असे वातावरण तयार होत असते.पावसाळा ऋतू संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ऋतू असतो.पावसाळ्यामध्ये शेतकरी आनंदाने गाणी गात शेतीचे काम करत असतो.पावसाळ्यात पावश्या म्हणजे चातक पक्षी आनंदाने ओरडत असतो. पावसाळ्यामध्ये तळी-नाली तुडुंब भरल्यामुळे बेडके डराव-डराव करत आपला आनंद व्यक्त करत असतात.पावसाळ्यात धरणे भरल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पुढील काळात पाणी उपलब्ध होत असते.जनावरांसाठी पावसाळा म्हणजे पर्वनीच असते. जनावरांना मुबलक हिरवा चारा पावसाळ्यात उपलब्ध होत असतो. एकंदरीत पावसाळा ऋतू पृथ्वीवरील सर्वच जीवांचे भले करण्यासाठी येत असतो.काही ठिकाणी पावसाची पूजा केली जाते, ती याच कारणामुळे पाऊस सर्व प्राणीमात्रांना सूख देत असतो. पावसाला देवच मानले जाते.पावसाला मेघराज म्हटले जाते.मेघराज म्हणजे देवाचा अवतार होय.असा हा पावसाळा सर्वसृष्टीचे भले करण्यासाठीच येत असतो.

पावसाळा निबंध मराठी हा Information G वरील आजचा निबंध आवडल्यास नक्की लाईक करा,शेअर करा.