My mother essay in marathi, माझी आई निबंध मराठी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

 My mother essay in marathi, माझी आई निबंध मराठी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 


My mother essay in marathi माझी आई निबंध मराठी


शाळेमध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विकास विचारला जाणारा प्रश्न निबंध लिहा.मग त्याचा विषय कोणता का असेना,आपल्याला त्या विषयावर निबंध लिहावा लागतो.आज आम्ही या पोस्टमध्ये इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा निबंध माझी आई निबंध मराठी हा सादर करीत आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा उपयुक्त निबंध अवश्य वाचावा.

माझी आई निबंध मराठी १० ओळी (My mother essay marathi 10 lines)


1. माझ्या आईचे नाव जनाबाई आहे.

2. ती उत्तम गृहिणी आहे.

3. माझी आई शेतात काम करते.

4.  माझी आई सकाळी लवकर उठून संध्याकाळी उशिरापर्यंत जागी असते.

5. माझी आई आम्हा सर्व भावंडांचे लाड करते.

6. माझी आई घरातील सर्व काम स्वतः करते.

7. माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते.

8. माझ्याही दिवसभर शेतात काबाडकष्ट करते.

9. माझी आई घरासाठी खूप खूप कष्ट करते.

10. माझी आई गोरगरिबांना मदत करते.


माझी आई निबंध मराठी २० ओळी (My mother essay marathi 20 lines)


1. माझी आई पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करते.
2. माझी आई सकाळी सकाळी शेतातील कामावर जाते.
3. माझी आई छान स्वयंपाक बनवते.
4. माझी आई शेतात वडिलांबरोबर काम करते.
5. माझी आई बाजारातून माझ्यासाठी खाऊ घेऊन येते.
6. माझी आई मला चांगले संस्कार लावते.
7. मला ती दादा या नावाने हाक मारते.
8. ती गोरगरिबांना नेहमी मदत करते.
9. माझ्या इतरांना नेहमी मदत करते.
10. माझी आई इतरांच्या दुःखात नेहमी सहभागी होते.
11. वडिलांना ती प्रत्येक कामात मदत करते.
12. माझी आई नेहमी मला चांगले उपदेश करते.
13. माझी आई प्रत्येकाबरोबर चांगले बोलते.
14. माझ्या आईच्या हाताला सुगरणीची चव आहे.
15. ती नेहमी आनंदी असते.
16. आपल्या मुलाने देशाची सेवा करावी असे तिला वाटते.
17. देशसेवेची तिला आवड आहे.
18. माझी आई उत्तम पुरणपोळी बनवते.
19. ती गरजवंताला नेहमी गरज करते.
20. माझी आई माझ्यासाठी देवच आहे.

माझी आई निबंध मराठी फोटो ( My mother essay in marathi photo)


माझी आई निबंध मराठी फोटो ( My mother essay in marathi photo)

माझी आई माहिती ( My mother information in marathi)


माझ्या आईचे नाव जनाबाई आहे.तिचे वय पन्नास वर्षे आहे.ती उत्तम गृहिणी आहे.ती शेतात काम करते.माझी आई रंगाने गोरी आहे.माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते.ती सतत कामात मग्न असते.इतरांशी हसतमुखाने आणि आनंदाने बोलत असते. ती कोणालाही दुखावत नाही. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ती नेहमी तत्पर असते.तिला लहान मुलांची खूप आवड आहे.वयस्कर लोकांची सेवा करण्यास तिला खूप आनंद वाटतो.

घरातील सर्वजण सुखी राहावे त्यासाठी दिसतात प्रयत्न करत असते.
घरातील लोकांच्या आरोग्याबाबत ती सदैव दक्ष असते. माझी आई आम्हा सर्व भावंडांची व्यवस्थित काळजी घेते.आम्हाला गोड गोड खाऊ बनवून देते.घरातील वडीलधाऱ्या लोकांना ती नेहमी आदराने बोलते.माझी आई मला खूप आवडते.


माझी आई निबंध मराठी १०० शब्द ई. ३ री ते ५ वी ( My mother essay marathi 100 words 3rd to 5th)


माझी आई पहाटे लवकर उठून,माझ्या शाळेचा डबा तयार करून, वडिलांबरोबर शेतावर कामाला जाते. दिवसभर शेतात काबाड कष्ट केल्यानंतर संध्याकाळी सर्वांचा स्वयंपाक बनवून घरातील सर्व कामे आवरून रात्री उशिरा झोपते.या प्रकारे तिची दिनचर्या आहे.

या दिनचर्येची तिला आता सवय झाली आहे.एवढे काबाडकष्ट करूनही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असत. इतरांना सुखात ठेवण्याची कला तिला अवगत झाली आहे .कुटुंबासाठी कितीही कष्ट करण्याची तिची तयारी आहे.

माझ्यासाठी ती नेहमीच गोड गोड खाऊ घेऊन येत असते. तिच्या हाताला सुगरणीची चव आहे.ती नेहमी खूप छान स्वयंपाक करते.घरातील सर्वजण तिच्या स्वयंपाकाची स्तुती करतात. मला ती अभ्यास करण्यास प्रोत्साहित करत असते. मी अभ्यास करून खूप मोठा साहेब व्हावे अशी तिची इच्छा आहे. या सर्व गुणांमुळे माझी आई मला खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी २०० शब्द ई. ६ वी ते ८ वी ( My mother essay marathi 200 words 6th to 8th)


घरातील सर्वांना सुखी ठेवून आपले घर नेहमी आनंदी ठेवण्याची कला माझ्या आईला अवगत झाली आहे.घरातील सर्वांचे लाड पुरवण्यात तिला आनंद वाटतो. आम्हा सर्व भावंडांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. आम्हाला काय हवे नको ते सर्व ती पाहते.आम्हाला प्रत्येक गोष्टीत आईची मदत घ्यावी लागते.आम्हाला कोणती गोष्ट हवी असल्यास ती वडिलांशी बोलून ती गोष्ट आम्हाला घेऊन देत असते.आमच्यासाठी आमची आई देवच आहे.

आम्हाला अभ्यास करण्यास ती नेहमी प्रोत्साहित करत असते. तिला वाटते की,अभ्यास करून आपल्या मुलांनी सरकारी नोकरी करावी. ती नेहमीच आम्हाला अभ्यास करण्याबाबत सांगत असते.आम्हाला अभ्यासाची आवड लागावी म्हणून ती थोर नेत्यांच्या गोष्टी आम्हाला सांगत असते. शिवाजी महाराजांच्या कथा ती नेहमीच सांगते.आपल्या मुलांनी शूरवीर व्हावे,देशासाठी सेवा करावी अशी तिची मनोमन इच्छा आहे. आम्हाला ती खूप मोलाचे सल्ले देत असते. आमची शाळेतील प्रगती ती वारंवार तपासत असते.

माझ्यासाठी माझी आई नेहमीच गोड पदार्थ बनवत असते. माझी आई घरातील वृद्धांची व्यवस्थित काळजी घेते. घरी येणाऱ्या प्रत्येक मदत मागणाऱ्याला ती रिकाम्या हाताने पाठवत नाही.गरिबांना मदत करण्यास ती नेहमी पुढे असते. वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यास तिला खूप आनंद होतो. शेतातील प्रत्येक कामात ती वडिलांना हातभार लावत असते. माझी आई बाजारात गेल्यावर माझ्या कुटुंबासाठी हव्या असलेल्या वस्तू घेऊन येत असते.माझ्या कुटुंबासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असते. माझे कुटुंब आदर्श कुटुंब व्हावे अशी तिची इच्छा असते.


माझी आई निबंध मराठी ३०० शब्द ई. ९ वी ते ११ वी ( My mother essay marathi ३00 words 9th to 11th)


माझी आई आमच्या गावातील एक प्रतिष्ठित महिला असून,गावातील इतर स्त्रिया तिच्याकडे वेगवेगळे कामे घेऊन येत असतात. गावातील स्त्रियांना एकत्रित करून तिने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटे-छोटे कुटीर उद्योग सुरू केले आहेत. गावातील महिलांना माझी आई खूप मोठा आधार वाटते. गावातील स्त्रियांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्याचे ती काम मनोभावाने करते. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास ती पुढाकार घेते. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यास ती नेहमीच धावून जाते. माझी आई माझ्या गावासाठी खूप कष्ट करते.

माझ्या गावाने प्रगती करून देशात आदर्श असे गाव व्हावे असे तिला मनोमन वाटते.गावाच्या विकासासाठी ती नेहमीच एक पाऊल पुढे असते. गावातील प्रश्न सोडवण्यात तिचा नेहमीच पुढाकार असतो.गावातील लोक तिला आदराने हाक मारतात. गावातील लोकांना तिच्याविषयी आदर आहे. गावातील लोक नेहमीच तिच्या कार्याची प्रशंसा करतात. माझी आई नेहमीच बोलते, "हे विश्वचि माझे घर". या उक्ती प्रमाणेच ती गावाची सेवा मनोभावाने करत असते. गावातील प्रत्येक अडल्या नडलेल्या लोकांना ती नेहमी मदत करते.

माझी आई आमच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागृत आहे.आमचा दररोजचा अभ्यास ती पाहत असते.आपल्या मुलांनी शिक्षणात चांगली प्रगती करून देशाच्या नावलौकिकात भर घालावी असे तिला वाटते."पोटाला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला". या म्हणी प्रमाणे आपल्या मुलांनी वागू नये असे तिला वाटते. समाजात जन्माला येऊन काही न करता मरणे हे तिला पटत नाही.जन्माला आल्यावर चांगली कर्तबगारी करूनच देह सोडावा असे तिला वाटते. आपल्या मुलांनी समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे तिला वाटते.समाजातील प्रत्येक गरजू घटकांना मदत करावीच असे ते आम्हाला निक्षून सांगते .

समाजातील प्रत्येक घटक हा आपला घटक मानून त्याच्या प्रगतीसाठी आपण मदत केली पाहिजे असे तिचे मत आहे. आमच्या गावातील स्त्रियांना हरप्रकारे मदत करण्यासाठी पुढे असते.स्त्रियांचे प्रश्न ती नेहमीच आनंदाने सोडवते. या सर्व व्यापातून घरावर तिचे बारीक लक्ष असते. घरात काहीही कमी पडू देत नाही. घरातील सर्वांची व्यवस्थित काळजी घेते. समाजाप्रमाणेच घरही तिला खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच ,घराबरोबर समाजाची देखील ती काळजी घेत असते.
माझी आई मला नेहमीच चांगले आणि मोलाचे सल्ले देत असते.मला माझ्या आईचे शब्द खूपच मोलाचे ठरतात. माझ्यासाठी ती नेहमीच चांगले निर्णय घेते.मला ती नेहमीच चांगले मार्गदर्शन करते.माझा ती नेहमीच लाड करते म्हणून, मला माझी आई खूप आवडते.

सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त निबंध अवश्य वाचा.
माझी आई निबंध मराठी १२ वी ५०० शब्द ( My mother essay marathi 12th 500 words)


मला बारावी च्या वर्षाला सर्वात मोलाची मदत करणारी आणि शैक्षणिक सल्ला देणारी माझी आई आहे. बारावी इयत्ता सुरुवात झाल्यापासून अगदी अभ्यासाचे वेळापत्रक बनवण्यापासून ते माझ्या खाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत या सर्वांची व्यवस्थित काळजी घे माझी आई घेते. बारावीच्या वर्गात मला कुठलीही अडचण आल्यास ती सोडवण्याचे कार्य ती ताबडतोब पूर्ण करते.मी जरी शिक्षण घेत असलो तरी माझ्यावर लक्ष ठेवण्याचे जबाबदारीचे कार्य ती पार पाडत असते.आपला मुलगा चांगल्या मार्काने पास होऊन आपल्यासारखेच कष्टाचे काम न करता चांगल्या पोस्टवर त्याने नोकरी करावी असे तिला वाटते. माझ्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम ती करत असते.माझ्या शिक्षणाबाबत ती प्रचंड जागरूक असते.शेतात काबाड कष्ट करून ती मला मोठ्या हिमतीने शिकवते. शेतात वडिलांबरोबर कष्ट करून घरी आल्यावर माझे शाळेचे आवरून देऊन घरातील कामे करणे हा तिचा नित्यक्रमच बनला आहे.

माझी आई माझ्याप्रमाणेच माझ्या भावंडांच्या शिक्षणावर देखील लक्ष ठेव असते. माझ्या आईचे जीवन कष्टाने भरलेले आहे.आपल्या मुलांसाठी माझी आई कितीही कष्ट करायला तयार आहे.आपल्या मुलांचे जीवनात आपल्या प्रमाणेच कष्ट येऊ नये म्हणून ती मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून असते.आपली मुले इतर वाईट मुलांच्या नादी लागू नये यासाठी ती विशेष जागृत असते.आपली मुले नेहमी चांगले आणि सन्मार्गाने वागावे म्हणून ती जागृत असते.माझी आई आम्हा सर्व भावंडांसाठी चांगले शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न करते.आमच्या वर्गातील शिक्षकांशी ती नेहमीच भेटते आणि मुलांच्या प्रगती विषयी चर्चा करते.माझ्यासाठी माझी आई आदर्श आहे.

बारावीच्या वर्गात मुलांवर चांगले संसार घडायला हवेत असे तिला वाटते. बारावी वर्गापासून मुलांना परस्परांविषयी आकर्षण वाटू लागते. या गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे कार्य करते. मला या विषयावरती मोलाचे मार्गदर्शन करते. शाळेत देखील या विषयावर मार्गदर्शन करण्याचे ती शिक्षकांना सांगत असते. एकंदरीत माझ्याबरोबर गावातील विद्यार्थ्यांवर देखील सुसंस्कार घडावेत असे तिला वाटते.प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या पाल्याकडून खूप अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करणे हे पाल्याची कर्तव्य असते याची जाणीव ती आम्हाला करून देत असते.आमच्यासाठी माझे आई वडील किती कष्ट करत असतात याची जाणीव देखील ती आम्हाला करून देत असते.आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये असे तिला मनोमन वाटत असते.आई-वडील मुलांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण करणे मुलांचे कर्तव्य आहे असे तिला वाटते.

मुलांनी आई-वडिलांच्या आज्ञा पाळायला हव्यात असे ती आम्हाला सांगते. माझी आई आम्हा सर्व भावनांकडून शेतातील कामे देखील थोड्या प्रमाणात करून घेत असते .मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव हवी आणि कष्टाची सवय राहावी हा त्यामागचा मायेचा हेतू असतो. आपल्या आई वडील किती कष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात हे देखील त्यामधून समजते.माझी आई आमच्यासाठी पहाटेच उठून आंघोळीसाठी पाणी आणि गरमागरम नाश्ता आणि शाळेचा डबा तयार करून ठेवत असते मुलांसाठी किती कष्ट करण्याची तिची तयारी असते.तिला नेहमी वाटते की मुलांनी आपल्या कष्टाची जाण ठेवून इतरांना देखील मदत करायला हवी.शाळेतील गरजू आणि होतकरू मुलांना मदत करण्यासाठी ती नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करते. इतरांना मदत करावी हा येतो यामागे तिचा असतो.

माझ्या बारावीच्या वर्गासाठी तिने मला रोज पहाटे उठण्यास आणि अभ्यास करण्याची सवय लावली आहे.रोज पहाटे उठून अभ्यास केल्यावर तो अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असे तिला वाटते.सकाळी लवकर उठल्यामुळे मन आणि आरोग्य देखील उत्साही राहते.आपली मुले उत्साही आणि निरोगी राहावी यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. माझी आई आम्हाला व्यायाम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते. आपल्या मुलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे तिला वाटते आणि ती त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देते.माझी आई आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत.आपल्या मुलांनी नेहमी चांगल्या गोष्टी कराव्यात असे तिला वाटते.आईबद्दल दोन शब्द ४०० शब्द (A word about mother 400 words)


"स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी".

या उक्तीप्रमाणे पाहिलं तर जगात आई शिवाय कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते.अगदी मुल जन्माला आल्यापासून तर जोपर्यंत त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मुलाला मायेने जपणारी आणि मुलाच्या दुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी आईच असते.आपण सहज बोलतो की,आई आहे काही काळजी नाही म्हणूनच,जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती म्हणजे त्याला त्याच्यामागे खंबीरपणे उभी असणारी आई असते.माणसाकडे किती संपत्ती आहे हे महत्त्वाचे नसून,माणूस कौटुंबिक दृष्ट्या किती सुखी आहे? हे महत्त्वाचे आहे.कुटुंबाला सुखात ठेवणारी आई असते.कुटुंबाला आनंदात ठेवण्याचे काम ती करत असते. आई शिवाय कुटुंब हे अपूर्ण असते.

आज जगात असंख्य आईविना अनाथ झालेली मुले आपण पाहत असतो. या मुलांच्या जडणघडणीवर कोणाचेही लक्ष नसते. आई विना वाढलेली मुले मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींच्या आहारी गेलेली असतात.आईचे महत्व अशा आईविना अनाथ झालेल्या मुलांना विचारा, मग आपल्याला कळेल की आपली आई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आई मुलाला जगात जगायची रीत शिकवत असते जगात कसे वागावे ,कसे बोलावे, कसे चालावे या सर्वांचे शिक्षण आपल्याला आई देत असते.शाळेत आपण शैक्षणिक ज्ञान घेत असतो परंतु व्यवहार ज्ञान देण्याचे कार्य आपली आईच करत असते.आई ही असा शिक्षक आहे की, जी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या मुलाला निरंतर अमूल्य असे मार्गदर्शन करत असते.आईच्या मनात आपल्याविषयी कोणतीही स्वार्थाची भावना नसते. स्वतःच्या हाताला चटके घेऊन ती मुलांना भाकरी बनवून देत असते म्हणूनच आईच्या मायेचे मोल जगातील कोणत्याही गोष्टीला नसते असे म्हटले जाते.

असे बोलले जाते की ईश्वराला प्रत्येक माणसाची स्वतः येऊन काळजी घेणे शक्य नाही म्हणून, त्याने प्रत्येक व्यक्तीला आई दिली.आई हिच आपला ईश्वर प्रत्येकाने मानले पाहिजे.आईला आपला मुलगा अगदी नकटा असला, काळा असला ,शेंबडा असला तरी प्यारा असतो कारण, त्या मुलाला तिने स्वतः जन्म दिलेला असतो. त्या मुलासाठी तिने नऊ महिने नऊ दिवस स्वतः यातना भोगलेल्या असतात म्हणून, आपले मूल कसे असले तरी तिला ते प्राणाहून प्रिय असते. आपल्या मुलाची ती नेहमीच काळजी करत असते .मुलाच्या प्रगतीसाठी मुलाची आई निरंतर प्रयत्न करत असते .आपल्या मुलाने जगात यशस्वी नागरिक व्हावे यासाठी ती प्रयत्नशील असते. आपल्या मुलांनी जगात नेहमीच ताट मानेने जगावे असे कोणतेही आईला वाटत असते.
कोणत्याही मुलांसाठी आई प्राणाहून प्यारे असते.मुलाला भवितव्य देण्याचे काम आई करत असते.मूल भविष्यात कोणत्या मार्गाने जाईल हे आईच्या संस्कारांवर अवलंबून असते.प्रत्येक मुलाची आई आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्यासाठीच प्रयत्नशील असते.आई ही मुलांसाठी,"वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाया असते".याचे कारण म्हणजे मुलाच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात आई त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते.आई मुलाला कणखरपणा देण्याचा प्रयत्न करत असते. मुलाच्या सुखात आई आनंदी असते आणि मुलाच्या दुःखात आहे त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते.मुलासाठी आई हि देवा पेक्षाही महत्त्वाची मानली जाते.मुलासाठी आई ही देवच असते."आईसारखे दैवत जगात नाही". असे त्यामुळेच म्हटले जाते.

आईचे महत्व ( Importance of mother)


आई माझा डब्बा झाला का तयार? रोज सकाळी या नाहीतर दुसऱ्या कोणत्याही कामाच्या वाक्याने आपल्या जीवनातील आईचे महत्व अधोरेखित होते.आपल्या जीवनात आईचे महत्व खूप आहे अगदी जन्माला आल्यापासून ते आपली आई आहे तोपर्यंत तिचे महत्व आपल्यासाठी खूप मोलाचे असते.आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम ती करत असते.ईश्वर आपल्याला जन्माला घालतो परंतु,आपल्या जीवनाला संपूर्ण आकार देण्याचे काम काहीच करत असते.मूल जन्माला आल्यानंतर त्याला संपूर्ण जीवन जगण्याची कला हीच आईच शिकवत असते. मुलाच्या जीवनात आईचे महत्व देवा पेक्षा जास्त असते.आई ही मुलांसाठी मायेचा आधार असते.

आपल्या मुलांना समाजात चांगल्या रीतीने वागता यावे यासाठी त्यांना चांगले वळण लावण्याचे काम आईच करत असते.आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत राब राब राबणारी आईचा असते. आपल्या कुटुंबाला चांगले दिवस येण्यासाठी ती सतत कष्ट करत असते.आपल्या मुलाने कुठल्याही वाईट व्यसनांच्या,गोष्टींच्या आहारी जाऊ नये यासाठी ती सतत काळजी घेत असते.आपल्या मुलांसाठी आई मातीपेक्षा मऊ आणि वेळ आलीच तर हिऱ्यापेक्षाही कठीण होते.आपल्या मुलांना समाजात कोणीही वाईट बोलू नये,हीन दर्जाची वागणूक देऊ नये यासाठी ती सतत प्रयत्न करत असते.आपल्या मुलांनी समाजाला आदर्श बनून मान मिळवावा यासाठी ती सतत प्रयत्न करत असते.प्रसंगी आपल्या मुलांची बाजू घेऊन समाजाशी झगडणारी आईच असते.

आपल्या मुलाच्या जन्मापासून ते मुलगा मोठा होईपर्यंत मुलांसाठी जीवाचे रान करणारी आईच असते.मुलांना समाजाची रीत शिकवणारी आईच असते.आपल्या मुलांच्या भल्यासाठी समई प्रमाणे सतत तेवत राहणारी आपली आईच असते.मुलांसाठी आई वासराची गाय असते.आईला मला शिवाय कोणतीही गोष्ट अमूल्य नसते.अशी ही आईची माया मुलांना हवीहवीशी वाटत असते.


मोलाचे बोल


माझी आई निबंध मराठी हा निबंध ई.२ री ते ४ थी, ई.५ वी ते ७ वी, ई. ८ वी ते १० वी आणि ११ वी व १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा निबंध अगदी १० ओळी ,२० ओळी, १०० शब्द ते ५०० शब्दांपर्यंत हा निबंध उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने हा निबंध वाचून लिहिण्याचा प्रयत्न करावा म्हणजे,निबंध पाठ होईल आणि आपल्या हक्काचे मार्क्स मिळवता येतील.निबंध कसा वाटला आवश्य कमेंट करून सांगा.