माझे आवडते शिक्षक निबंध मराठी,आवडते शिक्षक माहिती,my favourite teacher essay in marathi

My favourite teacher essay in marathi, माझे आवडते शिक्षक निबंध मराठी

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी,आवडते शिक्षक माहिती,my favourite teacher essay in marathi 


प्रस्तावना - शाळेमध्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावी पर्यंत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे निबंध लेखन होय. निबंध लेखनामध्ये कोणत्याही विषयावर आपल्याला निबंध लेखन करायला सांगितले जाते .आज या पोस्टमध्ये आम्ही अगदी पहिलीपासून ते बारावीपर्यंत शिक्षक निबंध मराठी या ठिकाणी लिहित आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी हा निबंध अवश्य वाचावा.माझे आवडते शिक्षक निबंध मराठी किंवा आवडते शिक्षक,माझे आदर्श शिक्षक,माझी आवडती शिक्षिका, माझे आवडते शिक्षक भाषण या पोस्टमध्ये वाचण्यास  मिळणार आहे.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 10 ओळी ( My Favourite teacher essay in marathi 10 lines)


1. माझे आवडते शिक्षक श्री.पवार सर आहेत.
2. पवार सर सर्वांना समजेल असे सोप्या भाषेमध्ये शिकवतात.
3. सर सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात.
4. सर सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या समजावून घेतात.
5. माझे आवडते सर गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यास सर्वात पुढे असतात.
6. माझे आवडते शिक्षक सर्व मुलांना छान-छान गोष्टी सांगतात.
7. माझे आवडते शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शिस्तीने वागण्यास सांगतात.
8. ते आम्हाला विविध स्पर्धा परीक्षांत भाग घेण्यास प्रोत्साहित करतात.
9. ते आमच्या समस्या समजावून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.
10. आमच्या शाळेतील एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांना ओळखले जाते.


माझे आवडते शिक्षक निबंध मराठी 10 ओळी ( My Favourite teacher essay in marathi 10 lines)


माझे आवडते शिक्षक निबंध मराठी ई. २ री ते ४ थी  ( १०० शब्दांत ) My favorite teacher essay marathi  2nd to 4th (in 100 words)


माझे आवडते शिक्षक श्री. शिंदे सर आहेत. ते सर्व विद्यार्थ्यांना नावासकट आणि प्रेमाने हाक मारतात. ते सर्व विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्याप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न करतात .ते सर्व विद्यार्थ्यांना समजेल आणि लक्षात येईल या पद्धतीने शिकवतात. शाळेत शिंदे सर सर्व विद्यार्थ्यांच्या आवडीच्या आहेत .

शिंदे सर सर्व विद्यार्थ्यांना आपलेच आहेत असे वाटतात .ते सर्वांशी आपुलकीने वागतात. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न आणि काळजी ते बरोबर जाणतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या काळजीचे कारण दूर करतात. लहान विद्यार्थ्यांची काळजी कशी घ्यावी? याचे त्यांना पुरेपूर ज्ञान आहे .विद्यार्थ्यांना वाटणारी विविध विषयांतील भीती ते चुटकी सरशी दूर करतात.

 लहान विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न ते जाणून असतात. शिंदे सर संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. शाळेबरोबरच संपूर्ण गावातही शिंदे सरांना आदराने बोलले जाते. विद्यार्थ्यांशी कसे वागावे याचे गुपित त्यांना ठाऊक आहे. विद्यार्थ्यांशी विद्यार्थी होऊन जाणारे श्री. शिंदे सर मला खूप खूप आवडतात.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी ई. ५ वी ते ७ वी ( २०० शब्दांत ) My favorite teacher essay marathi  5th to 7th  (in 200 words)


श्री. वेताळ सर हे माझे आवडते शिक्षक असून ते आमच्या वर्गाचे वर्गशिक्षक पण आहेत. सर आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवतात. आपण मराठी असल्याने आपली मातृभाषा मराठी असते. इंग्रजी विषय आपल्या सर्वांनाच कठीण जातो परंतु ,वेताळ सर आम्हाला इंग्रजी विषयातील विविध क्लुप्त्या आणि बारकावे व्यवस्थित समजावून सांगतात म्हणून ,आम्हाला इंग्रजी विषयाची भीती वाटण्याएवजी इंग्रजी विषयी प्रेम वाढत चालले आहे.

श्री वेताळ सर सकाळी वर्गामध्ये हसतमुखाने प्रवेश करून अगदी मन लावून इंग्रजी विषय शिकवतात. विद्यार्थ्यांकडून चुकी झाल्यास त्यांना शिक्षाही करतात. विद्यार्थ्यांना त्यांची चूक लक्षात आणून देऊन परत होऊ न देण्याची हमी घेतात.

सर विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये जसे भाषण स्पर्धा, खेळाच्या स्पर्धा,विविध संस्कृती कार्यक्रम यामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना काही मदत हवी असल्यास, सर क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांना मदत करत असतात.

शाळेमध्ये कोणताही उपक्रम राबवायचा असेल तर सर सर्वात पुढे असतात.शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात सरांचा मोलाचा वाटा असतो. शाळेमध्ये एखाद्या गरजूला मदत निधी गोळा करायची असेल तर सर सर्वप्रथम मदत देतात.

वेताळ सर यांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे, ते सर्व विद्यार्थ्यांना बोलते करून विद्यार्थ्यांच्या शंका कुशंका दूर करण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना वाटणारी शिक्षकाची भीती ते चुटकी सरशी नाहीशी करतात. विद्यार्थ्यांना शाळेविषयी कर्तव्य समजावून देण्यात त्या गाडीवर असतात.वेताळ सर म्हणजे शिक्षणाचा जादूगारच होय म्हणून, मला वेताळ सर खूप आवडतात.

माझे आवडते शिक्षक निबंध मराठी ई. ८ वी ते १० वी ( ३०० शब्दांत ) My favorite teacher essay marathi   8th to 10th (in 300 words)


आदर्श शिक्षक हा सर्वगुणसंपन्न असतो. शिक्षक हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा मार्गदर्शक असतो. माझे आवडते शिक्षक म्हणजे श्री. वाळके सर होय. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठीण जाणाऱ्या विषयात अगदी योग्य आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करावे ते वाळके सर यांनी. विद्यार्थ्यांना खेळाच्या स्पर्धांमध्ये विविध टिप्स आणि सल्ला देणारे वाळके सर सर्वच कामांमध्ये अगदी आघाडीवर असतात.


महाराष्ट्रातील ऐतिहासिक जिल्हा अहमदनगर माहिती नक्की बघा.


आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकाच्या युगात संगणक शिकता यावे म्हणून प्रयत्न करणारे वाळके सर ,विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात ई लर्निंग शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करणारे आमचे आवडते शिक्षक वाळके सर होय. विद्यार्थ्यांना दहावीनंतर कोणत्या क्षेत्र निवडावे? कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? या सर्व विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणारे माझे आवडते शिक्षक श्री.वाळके सर आहेत.

विद्यार्थ्यांना माहीत नसलेल्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत करून सांगणे हे वाळके सरांची हातोटीच आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणे याबाबतीत वाळके सरांचा हात कुणीच धरणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात त्यांना प्रोत्साहन देऊन योग्य त्या वळणावर घेऊन जाण्याचे काम वाळके सर करतात. शाळेच्या जडणघडणीत वाळके सर यांचा खूप मोठा वाटा आहे. शाळेच्या कोणत्याही सुधारणेच्या कामात किंवा अडचणीच्या काळात सर्व गावाला एकत्र करून शाळेच्या मदतीस हातभार लावणारे वाळके सर सर्व गावात सुद्धा लोकप्रिय आहेत.

आपली शाळा तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर राज्य पातळीवर आणि देश पातळीवर अग्रेसर अशी शाळा व्हावी म्हणून, आवश्यक ते सर्व प्रयत्न वाळके सर सर्व शिक्षकांना आणि गावकऱ्यांना एकत्र घेऊन करतात. शाळेतील सुख सुविधा, फर्निचर आणि विद्यार्थ्यांसाठीच्या आवश्यक त्या सुविधा पुरविण्यावर वाळके सरांचा भर असतो. इतर शाळांच्या पुढे एक पाऊल का होईना आपली शाळा कशी राहील याचा सदैव ते विचार करत असतात. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते अगदी सुट्टीच्या दिवशी ही शाळेत आवर्जून उपस्थित राहत असतात.

शाळेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आवश्यक असणारे सर्व प्रयत्न वाळके सर करतात. विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग, संगणक शिक्षण, विविध विषयांवर मार्गदर्शन, व्यावसायिक शिक्षण या प्रकारचे शिक्षण त्यांनी उपलब्ध करून दिले आहे. आपल्या शाळेला लोक भेट देताना आवर्जून शाळेचे नाव काढतील या प्रकारचे कार्य वाळके सर करत असतात. विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या भल्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या या शिक्षकास माझा सलाम.


शिक्षक दिन निबंध व माहिती नक्की बघा.


माझे आवडते शिक्षक निबंध मराठी ई. ११ वी व १२ वी ( ४०० शब्दांत ) My favorite teacher essay marathi e.  11th to 12th (in 400 words)


इंग्लिश मीडियम स्कूल पुणे या आमच्या विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करणारे माझे आवडते शिक्षक श्री. रासने सर होय. अकरावी आणि बारावी हे दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनात मोलाचे बदल घडवून आणणारे वर्ष आहेत. या दोन वर्षात विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे गणित असते. विद्यार्थी नेमके या दोन वर्षातच बिघडण्याचा जास्त धोका असतो. रासने सरांना विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्र बाबत माहिती असल्याने या दोन वर्षात विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गाने जीवन जगण्यास प्रवृत्त करणारे रासने सर सर्व विद्यार्थ्यांना खूप आवडतात. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात आवश्यक ती सर्व मदत करण्यास रासने सर मागे पुढे पाहत नाही. विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जडणघडणीत रासने सर यांचा खूप आधार असतो.

विद्यार्थ्यांना अकरावी आणि बारावीनंतर उपलब्ध असणारी विविध क्षेत्र आणि कोर्स विविध प्रकारच्या संधी या सर्व गोष्टींची माहिती व्हावी म्हणून सर प्रत्येक महिन्याला विविध विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत असतात. विद्यार्थ्यांना विविध कोर्स साठी पैशाची कमतरता असल्यास विद्यार्थी कर्जासाठी प्रयत्न करणारे रासने सर सर्व विद्यार्थ्यांना प्रिय आहे. विद्यार्थिनींना येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यांची काळजीपूर्वक केले जाणारे निवारण हे रासने सर यांच्यामुळे शक्य होते. या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये तयार होणारे न्यूनगंड कसे करावे? याची व्यवस्थित माहिती रासने सर यांना आहे.

विद्यार्थ्यांना पोलीस भरती, आर्मी भरती यासाठी रासने सर विशेष मार्गदर्शन करतात. विद्यार्थिनींसाठी बँक भरती, शिक्षक भरती यासाठी सुद्धा रासने सर मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगातील अद्भुत शक्तीची जाणीव करून देऊन विद्यार्थ्यांना प्राविण्य मिळवून देण्याची कला त्यांच्या अंगात आहे. विद्यार्थ्यांबरोबर एक शिक्षक म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून ते वागत असतात. विद्यार्थ्यांना ते आपले मित्रच वाटतात. विद्यार्थी त्यांची सर्व सुख दुःख त्यांना सांगत असतात यातून मार्ग काढण्याचे काम सर लीलया करत असतात.

विद्यालया प्रती असणारे आपले कर्तव्य पाळण्यात सर कोणत्याही प्रकारची कसर करताना दिसून येत नाही. विद्यार्थ्यांना गरज असेल तर सर अगदी सुट्टीच्या दिवशीही सर विद्यालयात उपस्थित असतात. रासने सर हे आधुनिक विचारांचे पाईक असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी आधुनिक युगात कसे वागावे याचे संपूर्ण ज्ञान त्यांना अवगत आहे. सरांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यालयातील हजारो विद्यार्थी आज कोणत्या क्षेत्रात चमकत असून सरांचे नाव उज्वल करत आहे. जगाच्या स्पर्धेत आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत, चमकले पाहिजेत यासाठी सर सदैव प्रयत्न करताना दिसून येतात. जगातील विविध नामांकित क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन ते ऑनलाईन  उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात.

विद्यालयामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना बोलावून त्यांनी किती संघर्ष केला ,याची विद्यार्थ्यांना जाणीव करून देऊन, विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही,कष्टाला शॉर्टकट नाही असे त्यांचे ठाम मत आहे. त्यांच्यामध्ये या वयात नवोदित तरुणाने जगातील कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करण्याची तयारी मनाशी बाळगलेली असावी. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या चांगल्या गोष्टीत सर सदैव साथ देतात. विद्यार्थ्यांच्या वाईट गोष्टींना ते धारा देत नाही. विद्यार्थ्यांना याबाबतीत ते कोणत्याही प्रकारे माफी देत नाही.

आज विद्यालयाने जे यशाचे शिखर गाठले आहे ते सर आणि सरांनी साथीला घेतलेले त्यांचे सहकारी ,विद्यार्थी आणि गाव या सर्वांमुळे शक्य झाले आहे. विद्यालयाच्या मध्ये या सर्व घटकांना एकत्रित करून विविध अडचणींवर विद्यालयाला विशिष्ट अशा उंचीवर घेऊन गेल्याबद्दल रासने सर माझे आवडते शिक्षक आहेत.


माझे आदर्श शिक्षक निबंध  (My Ideal Teacher Essay in Marathi)


शाळा ही आदर्श नागरिक घडविणारे समाज मंदिर असून या समाज मंदिराला पवित्र करण्याचे कार्य आदर्श शिक्षक करत असतात. आदर्श शिक्षक कसा असावा? आदर्श शिक्षकांत कोणकोणते गुण असावेत? आदर्श शिक्षक हा आपल्या शाळेला आपले घर मानून शाळेतील विद्यार्थी हे आपली संपत्ती मानून विद्यार्थ्यांना शाळेप्रती असणारे कर्तव्य दाखवून देणारा असतो. अशा शेकडो शाळांमधून अगदी बोटावर मोजणी इतकेच आदर्श शिक्षक होत असतात. आदर्श शिक्षकांत वरील नमूद केलेले आणि इतरही अनेक चांगले गुण असतात.

आमच्या शाळेतील जोरी सर हे माझे आदर्श शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये खूप सारे चांगले गुण आहेत. आदर्श शिक्षकांमध्ये असणारे सर्व गुण जोरी सर यांच्यामध्ये आहे.

वक्तशीर - 

सरांच्या अंगात वक्तशीरपणा आणून ठासून भरलेला आहे. अगदी शाळा भरायच्या एक तास ते शाळेत हजर असतात. या वेळात ते विद्यार्थ्यांचे वाढीव तास घेत असतात.

समजदार - 

सरांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे समजदारपणा होय .विद्यार्थ्यांचे सर्व म्हणणे अगदी व्यवस्थित आणि शांतपणे समजून घेऊन त्यानुसार शिकवण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करतात.

जिज्ञासू वृत्ती -

सरांच्या अंगी जिज्ञासू वृत्ती अगदी ठासून भरली आहे. अध्यापनातील विविध घटक ते अगदी जिज्ञासू पणे विद्यार्थ्यांना समजावून देत असतात.

प्रयोगशील -

जगातील यशस्वी व्यक्ती ही सदैव प्रयोगशील असते. हे पालुपद सरांना तंतोतंत लागू पडते. अध्यापन करत असताना ते विविध अध्यापन पद्धतीचा प्रयोगशील वापर करतात.

शिस्तप्रिय - 

यशस्वी माणूस हा शिस्तप्रिय असतो.सर देखील याला अपवाद नाही. विद्यार्थी हा शिस्तप्रिय असला पाहिजे असे त्यांचे मत आहे. विद्यार्थी शिस्तप्रिय होण्यासाठी शिक्षकांनी शिस्त पाळली पाहिजे हे त्यांचे मत आहे. शाळेतील तसेच वैयक्तिक जीवनात त्यांनी स्वतःला शिस्त लावून घेतली आहे.

कामातील धडाडी -

जोरी सर यांच्या कामातील धडाडी पाहण्याजोगी आहे. शाळेतील कोणतेही काम करण्यात सरांचा हातखंडा आहे. शाळेतील कोणतेही काम करताना त्यांच्या अंगात एक प्रकारचा उत्साह सळसळतो.

अध्यापनात विविधता -

जोरी सर विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना अध्यापनाच्या विविध पद्धती वापरत असतात. अध्यापनात विविध पद्धती वापरल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनाचा कंटाळा न येता अभ्यास लक्षात राहतो. एक आदर्श शिक्षक विद्यार्थ्यांना विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्यापन करत असतो.

संशोधक वृत्ती - 

एका आदर्श शिक्षकात संशोधक वृत्ती ठासून भरलेली असायला हवी.जोरी सरांमध्ये संशोधकृती अगदी ठासून भरलेली आहे. कोणताही विषय शिकवताना त्यातील बारकावे ते विद्यार्थ्यांना समजावून सांगत असतात. विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीस ते प्रोत्साहित करत असतात.

अशाप्रकारे एक आदर्श शिक्षक हा शाळेच्या सर्वांगीण विकासात आपले आयुष्य झोकुन देऊन काम करत असतो. जोरी सरांमध्ये वरील सर्व गुणांबरोबरच शाळेतील शिक्षकांमध्ये मिळून मिसळून राहून त्यांच्याद्वारे शाळेचा विकास करून घेण्याची कला आहे. सरकार द्वारे येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये ते उत्साहात भाग घेतात. त्यांना सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

आदर्श शिक्षकात असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे शाळेबरोबरच समाजाला एकत्र घेऊन चालले होय. जोरी सर शाळेतील सर्व उपक्रमात गावाला सहभागी करून घेतात. शाळेमध्ये विविध स्पर्धा होतात त्यामध्ये सर गावातील तरुणाईचा सहभाग घेतात. असे आदर्श शिक्षक सर्व शाळांना लाभावे हीच माझी इच्छा आहे.

माझी आवडती शिक्षिका निबंध मराठी - ( My Favourite teacher essay in Marathi)


शाळेतील कोणतेही स्पर्धा असो किंवा उपक्रम असून यामध्ये आवडीने सर्व विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या माने मॅडम माझी आवडती शिक्षिका आहे. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असा भेदभाव न करता सर्वांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करणाऱ्या माने मॅडम विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. विद्यार्थ्यांना वक्तशीरपणा आणि शिस्तीचे महत्व पटवून देण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळतो.

शाळेतील काही गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे आणि गावातील दानशूर लोकांकडून त्यांना मदत मिळवून देण्यात त्या आघाडीवर असतात. गावातील महिला एकत्र करून त्यांना बचतीची सवय लावून त्या महिलांना लघुउद्योग सुरू करून देण्यास त्यांनी मदत केली आहे. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यास त्या मदत करतात.

सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांत भाग घेण्यास प्रोत्साहित करून आपल्या विद्यालयाचे नाव उज्वल करण्यास त्या मदत करतात. विद्यार्थ्यांच्या मनातील शंका त्या अचूक हेरून योग्य त्या प्रकारे शंका निरसन करतात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी दोन पावले पुढे राहावे म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना त्या सतत मार्गदर्शन करत असतात. शाळेतील सर्वांशी त्या प्रेमाने आणि आदराने वागतात.

शाळेतील सुख सुविधांबाबत त्यांचे जातीने लक्ष असते. या सर्व बाबतीत त्या वेळोवेळी लक्ष ठेवून असतात. शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर त्या लक्ष ठेवून असतात. शाळेत घडणाऱ्या कोणत्याही घटनेचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून त्या सदैव प्रयत्न करतात.

अशा या सर्व गुणसंपन्न आणि सर्वांना आवडणाऱ्या माने मॅडम माझी आवडती शिक्षिका आहे.


माझे आवडते शिक्षक भाषण  ( My Favourite teacher Speech in Marathi)

आमच्या शाळेत शारीरिक शिक्षण हा विषय शिकवणारे साने सर खूप आवडतात .शारीरिक शिक्षण हा विषय मुळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची संबंधित असणारा विषय आहे. सर सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत प्रचंड जागरूक असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने शारीरिक शिक्षणाच्या तासात सहभागी व्हायला हवे ही त्यांची इच्छा असते.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावून त्या स्पर्धेची चांगली तयारी ते विद्यार्थ्यांकडून करून घेत असतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आरोग्य शिबीर घेण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना विविध खेळातील यशस्वी खेळाडूंचे मार्गदर्शन घडवून आणतात. शारीरिक शिक्षण मानवाच्या जीवनाचा पाया आहे असे ते म्हणतात.

शाळेतील शेकडो विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध खेळांमध्ये चमकले आहेत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगातील गुण हेरून त्यांना सर योग्य ते मार्गदर्शन करतात. शाळेतील क्रीडा विभागाचा प्रमुखांमुळे आधारस्तंभ साने सर हे आहेत. विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून ते स्वतः विद्यार्थ्यांबरोबर व्यायाम करत असतात.

सरांच्या मेहनतीमुळे आज कितीतरी विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी झाले आहेत. खेळातील उत्तम कामगिरीमुळे कितीतरी विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत आरक्षण देखील मिळाले आहे. सरांच्या कष्टाचे फळ म्हणून हे विद्यार्थी आवर्जून सरांची भेट घेऊन ऋण व्यक्त करतात.

आज या स्पर्धेच्या युगातही या शाळेची जी यशस्वी घोडदौड चालू आहे ती साने सर यांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच आहे. साने सर यांनी शाळा हेच आपले कुटुंब म्हणून विद्यार्थ्यांना जीवापाड शिकवून शाळेचे नाव नावारूपाला आणले आहे. असे साने सर आपल्या शाळेचे सर्वात आदर्श व्यक्तिमत्व आहे. एवढे बोलून मी साने सर यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे भाषण थांबवतो.
 जय हिंद ! जय महाराष्ट्र!