लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध मराठी (lokmanya tilak thoughts in marathi)


lokmanya tilak thoughts in marathi


lokmanya tilak thoughts in marathi -

 शाळेत असल्यापासूनच लोकमान्य टिळकांचा करारी बाणा आपल्याला दिसून येतो.  lokmanya tilak thoughts in marathi - शाळेत असल्यापासूनच टिळकांनी शाळेत मुलांना शेंगाची टरफले वर्गात टाकली म्हणून उचलायला लावले परंतु लोकमान्य टिळकांनी आपला करारी बाणा दाखवत मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफलेही भरणार नाही असे रोखठोक उत्तर शिक्षकांना दिले.

लहानपणापासूनच लोकमान्य टिळकांना आपल्या देशात चाललेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली. अशा या महान नेत्याचे भाषण तुम्ही 15 ऑगस्ट, 26 जानेवारी ,लोकमान्य टिळक जयंती 23 जुलै, टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहाने लोकमान्य टिळक भाषण करू शकता.

या लेखातून आपण लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध मराठी (lokmanya tilak thoughts in marathi) जाणून घेणार आहोत.


लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध मराठी (lokmanya tilak thoughts in marathi)


नाव लोकमान्य टिळक
जन्म23 जुलै 1856
कार्यक्षेत्र सामाजिक कार्य
शिक्षणB.A.L.L.B

लोकमान्य टिळक यांची शेगांच्या टरफलांची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली असेल. लोकमान्य टिळक लहानपणी शाळेत जात असताना त्यांच्या वर्गात घडलेली ही गोष्ट आहे.

एक दिवशी शाळेत लोकमान्य टिळकांच्या वर्गामध्ये मधल्या सुट्टीत काही खोडकर मुलांनी शेंगा खाऊन त्यांची टरफले वर्गामध्ये इतरत्र टाकली. मधली सुट्टी झाल्यानंतर शिक्षक वर्गामध्ये आले वर्गात सर्वत्र शेंगांची टरफले पाहून शिक्षक चिडले.

शिक्षकांनी सर्व मुलांना टरफले कुणी टाकली असे विचारले असता सर्व मुले घाबरून शांत बसली. कुणीही काहीही बोलले नाही किंवा कुणाचे नावही सांगितले नाही. यावर शिक्षकांनी सर्व मुलांना शिक्षा देण्याचे ठरवले.

शिक्षा होती सर्वांनी वर्गातील शेगांची टरफले भरून वर्ग साफ करायचा. सर्व मुले कामाला लागली परंतु लोकमान्य टिळक जागेवर बसून राहिले. यावर शिक्षकांनी त्यांना काम न करण्याबाबत विचारले त्यावर टिळकांनी सांगितले की, मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरफले भरणार पण नाही.

यावर शिक्षकांनी त्यांना विचारले की मग तू टरफले कुणी टाकली हे का सांगितले नाही त्यावर टिळकांनी सांगितले मला कुणाचेही नाव घ्यायचे नव्हते म्हणून मी गप्प बसलो. अशा प्रकारे टिळकांनी शिक्षकांना आपली स्पष्ट भूमिका सांगितली व न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा पण घेतली नाही.

अशा प्रकारे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांना लहानपणापासूनच मिळालेली होती.


लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व माहिती मराठी (lokmanya tilak mahiti in marathi)


सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते. भारतीयांमध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचे सामर्थ्य नव्हते.

इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या कपाट नीतीचा वापर करून भारतीय लोकांना कधीही एकत्र येऊ दिले नव्हते.

इंग्रजांना माहीत होते की भारतीय लोक एकत्र आल्यास आपली सत्ता फार काळ टिकणार नाही म्हणून, इंग्रजांनी भारतीय लोकांमध्ये आपापसात भांडणे लावून देण्याचे काम केले होते.

या कारणामुळे भारतीय समाज एकत्र येत नव्हता. टिळकांनी या गोष्टीचा अभ्यास केला आणि भारतीय लोकांना एकत्र करण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला.

यावर लोकमान्य टिळकांनी भारतीय लोक एकत्र येतील आणि इंग्रज ही विरोध करू शकणार नाही अशी युक्ती शोधली लोकमान्य टिळकांनी भारतीय लोकांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सोहळा सुरू केला.

या दोन ऊत्सवांच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी भारतीय लोक एकत्र करून त्यांना आपल्यावरील होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले.

भारतीय लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण केला म्हणूनच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.

या दोन उत्सवांच्या माध्यमातून भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आला आणि खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले.


हा लेख जरूर वाचा - स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माहिती व भाषण


लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध मराठी (lokmanya tilak thoughts in marathi)


भारतीय लोक पूर्णपणे इंग्रजांचे गुलाम झाले आहेत. भारतीयांवर इंग्रज करत असलेले अत्याचार याची लोकांना जाणीव व्हावी तसेच भारतीय जनतेचे प्रश्न इंग्रज सरकारच्या लक्षात यावी. म्हणून टिळकांनी सन १८८१ साली मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र तर केसरी हे मराठी भाषेतील वृत्तपत्र भारतीय जनतेसाठी सुरू केली.

केसरी व मराठा या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी भारतीय जनतेवरील अन्याय अत्याचार यांना वाचा फोडली तसेच इंग्रज सरकारच्या राज्यकारभारावर सडकून टीका देखील केली.


हा लेख जरूर वाचा - आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी माहिती (acharya balshastri jambhekar in marathi)


आनंद दिघे यांच्या बाबतची सर्व माहिती


या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून भारतीय जनतेला आपल्यावरील अत्याचाराची व अन्यायाची माहिती होऊ लागली.

लोकमान्य टिळकांनी भारतीय समाज एकत्र येऊन संघटित व्हावा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सारखे उत्सव सुरू केले.

सर्व भारतीयांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी तयार झाले पाहिजे असे त्यांचे मत होते.भारतीय लोकांच्या अडाणीपणाचा इंग्रज सरकार फायदा उठवत आहे म्हणून भारतीय लोक शिकले पाहिजे असे त्यांना वाटत होते.यातूनच मग त्यांनी विविध शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

शिक्षणासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी यासारख्या संस्थेची स्थापना करून भारतीय समाजाला शिक्षणाविषयी आवड निर्माण करून दिली.

भारतीय लोक शिकले तरच इंग्रजांविरुद्ध लढू शकतील म्हणून त्यांनी विविध शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

अशाप्रकारे भारतीय समाजास सामाजिक स्तरावर सुधारण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले."स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच"!लोकमान्य टिळकांची 1914 साली मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली.

एवढे दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर परत येऊन लोकांमध्ये इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण करणे सोपे काम नव्हते परंतु टिळकांनी या सर्व गोष्टी अत्यंत सुलभतेने हाताळल्या 1916 साली या महापुरुषाने एक घोषणा दिली व या घोषणेने संपूर्ण भारताला इंग्रजांविरुद्ध लढण्याची खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली.


लोकमान्य टिळक यांची माहिती मराठी (lokmanya bal gangadhar tilak information in marathi)


स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच हीच ती टिळकांची लोकप्रिय घोषणा होय.

या घोषणेने संपूर्ण भारतात इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला म्हणूनच लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते.

अशी मिळाली लोकमान्य ही पदवी, आज आपण आदराने लोकमान्य टिळक असे नाव घेतो परंतु लोकमान्य टिळकांचे खरे नाव बाळ गंगाधर टिळक होय.

मग त्यांना लोकमान्य ही पदवी कशी मिळाली 1916 च्या काँग्रेस अधिवेशनात स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच ही लोकप्रिय घोषणा तसेच इंग्रज सरकारच्या राज्यकारभारावर कडाडून टीका करताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?

या प्रकारे सरकारला दिलेल्या आव्हान राष्ट्रीय सभेत लाल बाल पाल या तीन नेत्यांनी एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध जहाल पद्धतीने विरोध करून इंग्रज सरकारला सर्व करून सोडले होते.

भारतीय लोकांनी एकत्र यावी म्हणून सुरू केलेले विविध उत्सव लोकांत जनजागृती व्हावी म्हणून सुरू केलेले वृत्तपत्रे ,लोकांना शिक्षणासाठी सुरू केलेली कॉलेज, भारतीय समाजातील अनिष्ट प्रधानविरुद्ध उठवलेला आवाज या सर्व कारणांमुळे भारतीय समाजात लोकमान्य टिळक हे खूप लोकप्रिय झाले होते .

राष्ट्रीय सभेमध्ये त्यांच्या कारकीर्दीस जहाल कालखंड म्हणून ओळखले जाते. इंग्रजांविरुद्ध मवाळीने वागून इंग्रज आपल्याला स्वतंत्र देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांची होती.

संपूर्ण भारतीय समाजाने इंग्रजांविरुद्ध उठाव केला पाहिजे असे त्यांना वाटत होते.

भारतीय समाजाच्या जडणघडणीत भारतीय समाजाच्या स्वातंत्र्यलढ्यात बाळ गंगाधर टिळकांचा लक्षणीय असा वाटत होता .

या सर्व कारणांमुळे लोकांमध्ये ते लोकमान्य म्हणून ओळखले जाऊ लागले.

इथून पुढेच बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणून ओळखले जाऊ लागले. लोकमान्य म्हणजेच लोकांना मान्य असणारा होय.

लोकमान्य टिळकांनी आपल्या कर्तृत्वातून भारतीय समाजामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. लोकमान्य टिळकांनी भारतीय समाजाला खऱ्या अर्थाने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणण्याच्या कार्यात मोलाची भर घातली.

भारतीय समाजात लोकप्रिय असे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. भारतीय समाजाला एका वेगळ्या वाटेवर म्हणजेच स्वातंत्र्यलढ्याच्या वाटेवर आणण्याचे कार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. अशा या महान नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम!


सारांश


या लेखातून आपण लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य निबंध मराठी (lokmanya tilak thoughts in marathi) जाणून घेतला आहे.

लोकमान्य टिळक यांनी भारतीय समाजात अनमोल असे कार्य केले. भारतीय समाजात असलेल्या वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला.

लोकमान्य टिळकांनी सत्याची कास कधीच सोडली नाही. लोकमान्य टिळकांनी आपला करारी बाणा अगदी शेवटपर्यंत जपला म्हणून ,हा असा नेता परत होणे नाही.

टिळकांविषयी तुमचे काय मत आहे ? कमेंट मध्ये नक्की कळवा.