Marathi mhani

मराठी म्हणी marathi mhani

मराठी म्हणी,म्हणी व त्याचे अर्थ, स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या म्हणी,मराठी भाषेमध्ये म्हणी आणि त्यांचे अर्थ खूप महत्त्वाचे असतात.म्हणी या एखाद्या वाक्याचे अलंकारिक रूप असतात.शालेय जीवनात म्हणींना खूप मोलाचे स्थान मराठीत असते.शालेय परीक्षा,स्पर्धा परीक्षा या सर्वांमध्ये म्हणी हमखास विचारल्या जातात.आज आम्ही या ठिकाणी शालेय परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास विचारल्या जाणाऱ्या 100 म्हणी व त्यांचे अर्थ येथे देत आहोत.

मराठी म्हणी

म्हणी मराठी,शालेय परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या म्हणी, स्पर्धा परीक्षांत हमखास विचारल्या जाणाऱ्या म्हणी, मराठी भाषेतील अत्यंत महत्वाच्या अशा 100 म्हणी व त्यांचे अर्थ आम्ही खाली देत आहोत.

मराठी म्हणी


   मराठी म्हणी ------------------------------अर्थ


यथा राजा तथा प्रजा - प्रमुखा प्रमाणेच त्याच्या अधिकारातील लोक वागतात.

बुडत्याचा पाय खोलात - संकटातील माणूस त्यात अजून गुरफटून जातो.

झाकली मुठ सव्वा लाखाची - दोष उघड होऊ न देणच हिताचं असत.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी - प्रत्येकाने जबाबदारी टाळल्यामुळे दोन्हीकडून गैरसोय होणे.

हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे - कष्ट करणाऱ्यांच्या घरी संपत्ती धाव घेते 

उठता लाथ बसता बुक्की - सतत छळ होणे.

काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू जवळच पण शोधाशोध सगळीकडे करणे.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - मुलगा मोठेपणी कसा निघेल याची लक्षणे लहानपणीच दिसतात.

डोळ्यात कर आणि कानात फुंकर - गरज एकीकडे आणि उपाय भलतीकडे.

या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे - भूलथापा देऊन दुसऱ्याला फसविणे.

नकटे असावे पण धाकटे असू नये - धाकटा म्हणून सगळे त्याच्यावर अधिकार गाजवतात.

हात दाखवून अवलक्षण - आपल्याच कृतीने आपली फजिती करून घेणे.

आपला हात जगन्नाथ - आपले हातच आपले उद्धारकर्ते आहेत.

खोऱ्याच्या कापली गोटा - खोटे वागणाऱ्याचे नेहमी नुकसानच होते.

नाकापेक्षा मोती जड - कमी दर्जाचा माणूस शिरजोर होणे.

नाक दाबले की तोंड उघडते - मर्मावर आघात करताच वठणीवर येणे.

बळी तो कान पिळी - बलवान माणूस इतरांवर अधिकार गाजवतो.

कानामागून आला आणि तिखट झाला - नंतर येणारा वरचढ होणे.

दात कोरून पोट भरत नाही - शुल्लक गोष्टीत काटकसर करून भागात नसते.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने - दुर्दैवी माणसाच्या कार्यात अनेक अडथळे येणे.

आधी पोटोबा मग विठोबा - आधी स्वार्थ साधने मग परमार्थ करणे.

ज्याचे पोट दुखेल तोच ओवा मागेल - दुःख सोसानाराच त्यावर उपाय शोधले.

उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे.

हात ओला तर मित्र भला - फायदा असेपर्यंत दोस्ती टिकते.

हाताच्या काकणाला आरसा कशाला? - सहज सिद्ध होणाऱ्या गोष्टींना पुराव्याची गरज नसते.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार घेणे - कोंडमारा करून जुलूम करत राहणे.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खासारखे वागणे.

आई जेऊ घालीना बाप भीक मागू देईना - दोन्हीकडून अडचणीत येण.

गुरुची विद्या गुरुलाच फळणे - फसवण्याची युक्ती सांगणाऱ्या वरच ती उलटवणे.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे - पिकाच्या अधिकाराचे दिवस बदलतात.

लेकी बोले सुने लागे - एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल आसे बोलणे.

बाप से बेटा सवाई - बापा पेक्षा मुलाची कर्तबगारी अधिक असणे.

अती शहाणा त्याचा बैल रिकामा - अतिशहाणा समजणाऱ्याकडून काहीच काम होत नाही.

बैल गेला आणि झोपा केला - नुकसान झाल्यावर उपाय योजना करणे.

 मोडून वासरांत शिरणे - जाणत्या माणसाने पोरकटपणा करणे.

वासरांत लंगडीशिंगे गाय शहाणी - अज्ञानी माणसांत थोडा शहाणा अधिक योग्यतेचा समजला जातो.

दुभत्या गाईच्या लाथा गोड - लाभासाठी अपमानकारक वागणूक सहन करणे.

कसायाला गाय धार्जिण - निष्ठूरपणे वागणाऱ्या पुढे लोक नमते घेतात.

चोरावर मोर - एका लबाडा पेक्षा दुसरा वरचढ.

मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते - वरिष्ठ वागतो तसेच कनिष्ठ वागतात.

कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही - अडथळा आणला तरी घडायच्या गोष्टी घडतात.

कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत - क्षुद्रांनी वाईट व्हावे म्हटल्याने सज्जनांचे काही नुकसान होत नाही.

साप साप म्हणून भोई धोपटू नये - एखाद्यावर नसता दोष लावून त्याला शिक्षा करु नये.

आयत्या बिळात नागोबा - स्वतः कष्ट न करता दुसऱ्याचा श्रमाचा फायदा घेणे.

हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी - नम्रतेने वागून अधिक फायदा करून घ्यावा.

हत्ती गेला आणि शेपूट राहिले - कामाचा मोठा भाग संपून अगदी थोडा भाग शिल्लक राहणे.

उंटावरून शेळ्या हाकलले - कामात हलगर्जीपणा करणे.

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये - जेथे राहायचे त्या समाजातील लोकांशी शत्रुत्व करू नये.

गोगलगाय आणि पोटात पाय - दिसायला गरीब पण कारस्थानी असणे.

सरड्याची धाव कुंपणापर्यंत - क्षूद्र माणसाची शक्ती अत्यंत मर्यादित असते.

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - आवश्यक तेवढेच थोडेसे सामान बरोबर असणे.

माकडाच्या हातात कोलित देणे - मूर्खाला विनाशकारी अधिकार देणे.

ज्याच्या हाती ससा तो पारधी - वस्तु ज्याच्या हाती तोच तिचा मालक समजला जातो.

कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे अल्प संतोषी असतात.

डोंगर पोखरून उंदीर काढणे - खूप परिश्रम करूनही थोडासाच लाभ होणे.

उंदराला मांजराची साक्ष - दोघे एकमेकांचे साथीदार असणे.

वरातीमागून घोडे - कार्यभाग संपल्यानंतर साधन सामग्री घेऊन पोहोचणे.

भीक नको पण कुत्रा आवर - मदत देऊ नको पण उपद्रव थांबव.

आंधळे दळते आणि कुत्र पिठ खाते - एकाच्या कष्टाचा फायदा दुसऱ्याने घेणे.

अडला नारायण धरी गाढवाचे पाय - अडचणीच्या वेळी बुद्धिमान माणसालाही मूर्खाच्या शरण जावे लागते.

गाढवाला गुळाची चव काय? - मुर्खा जवळ गुणग्राहकता नसते.

भरवश्याच्या म्हशीला टोणगा - खात्री असलेल्या बाबतीतही पूर्ण निराशा होणे.

चोराच्या मनात चांदणे - अपराध्याच्या मनात पकडले जाण्याची भीती असणे.

घरोघरी मातीच्या चुली - सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे.

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच जाती बांधवांच्या नाशास कारणीभूत होणे.

दगडापेक्षा वीट मऊ - दोन बाबींच्या तुलनेत एकाधिक बरी.

देश तसा वेश - बदलत्या परिस्थितीनुसार वागण्यातील बदल.

कोळसा उगाळावा तितका तो काळाच - अंतर्बाह्य संपूर्ण वाईटच असणे.

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - दोघांना एकमेकांची चांगली माहिती असणे.

दुरून डोंगर साजरे - लांबून दोष दिसत नाही.

पळसाला पाने तीनच - सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

तेरड्याचा रंग तीन दिवस - अल्पकाळ टिकणारे वैभव.

कुंपणानेच शेत खाणे - रक्षण करणाऱ्यानेच नुकसान करणे.

खाण तशी माती - आई-वडिलांचे गुण व अवगुण मुलांमध्ये दिसणे.

सुक्याबरोबर ओले ही जळते - वाईटा बरोबर चांगला ही भरडला जातो.

बुडत्याला काडीचा आधार - संकटात मिळालेली थोडी ही मदत महत्त्वाची असते.

इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे....

गर्जेल तो पडेल काय ? - बडबड करणाऱ्यांकडून काहीच काम होत नाही.

दुष्काळात तेरावा महिना - अडचणीत आणखी नव्या अडचणीची भर पडणे.

देवाची करणी अन् नारळात पाणी - देवाचे सामर्थ्य अद्भूत आहे.

थेंबे थेंबे तळे साचे - थोड्या थोड्या बचतीतून मोठा साठा तयार होतो.

तळे राखील तो पाणी चाखील - अधिकाराचा फायदा स्वतःसाठी करून घेणे.

उथळ पाण्याला खळखळाट फार - सामर्थ्य कमी असताना ते अधिक असल्याचे दाखवणे.

न खात्या देवाला नैवेद्य - ना घेणाऱ्याला घेण्यासाठी आग्रह करणे.

तेल गेले, तुप गेले हाती धुपाटणे आले - मूर्खपणामुळे फायद्याच्या गोष्टी गमावून बसणे.

ताकाला जाऊन भांडे लपवू नये - दुसऱ्या कडे गेल्यावर त्याला आपला हेतू स्पष्ट सांगावा.

ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - आवडलेल्या गोष्टीबाबत अति लोभी बनू नये.

साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवान माणसाला दैवाची साथ मिळते.

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - उपकार करणार याचे गुणदान करावे.

शितावरून भाताची परीक्षा - लहानशा चवीने सर्व गोष्टींचा अंदाज करणे.

आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे - अप्पलपोटेपणा करणे.

तुपाच्या आशेने उष्टे खाणे - लाभासाठी घाणेरडे काम करणे.

आयत्या पिठावर रहेगा ओढणे - कष्टाशिवाय मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.

आवळा देऊन कोहळा काढणे - थोडे देऊन अधिक मिळवणे.

सुंठीवाचून खोकला जाणे - उपाय करण्यापूर्वीच अडचण दूर होणे.

पी हळद नि हो गोरी - झटपट फळ मिळविण्यासाठी उतावळेपणा करणे.

भुकेला कोंडा निजेला धोंडा - अगदी साधे जीवन जगणे.

पुराणातील वांगी पुराणात - उपदेश ऐकायचा पण हवे ते करायचे.

खाई त्याला खवखवे - वाईट काम करणाऱ्या च्या मनात सारखी धास्ती असते.

बडा घर पोकळ वासा - फक्त दिखाऊ मोठेपणा असणे.

नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा - फक्त नावात मोठेपणा पण आर्थिक स्थिती हलाखीची.

समारोप -

याप्रकारे शालेय जीवनात तसेच ग्रामीण भागात म्हणींचा बोलीभाषेत खूप मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो.शालेय जीवनात विचारल्या जाणाऱ्या तसेच म्हणी,म्हणी मराठी,म्हणी व त्याचे अर्थ,स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 100 म्हणी व त्यांचे अर्थ आम्ही येथे दिले आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी या म्हणी आवश्य वाचाव्यात अत्यंत उपयुक्त अशा या म्हणी आहेत.

मराठी म्हणी व अर्थ हा InformationG वरील लेख आपणास कसा वाटला?आवडल्यास लाईक करा,शेअर करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.