होम लोन विषयी माहिती

होम लोन विषयी माहिती


होम लोन विषयी माहिती

  गृह कर्जासाठी पत्रता काय हवी,home loan eligibility criteria आजच्या जमान्यात गृहकर्ज या योजनेस खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.आज शहरांतील तरुण मोठ्या घरे खरेदीसाठी गृहकर्ज घेताना दिसत आहे. आज नागरिकांना गृह कर्ज या प्रकारात लाभ मिळत आहे.बँकांत पण गृहकर्जावरील रकमेसाठी रांगा लावल्या जातात.


होम लोन विषयी माहिती

शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व लोकांना घरासाठी कर्ज हवे असते. बँकांमध्ये गृह कर्ज पुरवठा अधिकारी असतात. त्यांच्यामार्फत हे कर्ज पुरवठा केला जातो. पण गृहकर्ज घेताना कोणत्या अटी आणि नियम असतात, गृहकर्जदारांना कोणती पात्रता पूर्ण करावी लागते.गृहकर्ज देताना बँक कोणत्या गोष्टीचा विचार करून कर्ज देते,ती सर्व माहिती आज आपण या लेखात गृह कर्जासाठी पत्रता काय हवी,home loan eligibility criteria पाहणार आहोत.


गृह कर्ज काय पात्रता हवी?(home loan eligibility criteria)


  • गृह कर्ज पात्रतेसाठी जुने कर्ज वेळेवर फेडलेले असावे,जुन्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरलेले असावे.
  • जुने कर्ज फेड राहू नये.
  • उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत.जेवढे उत्पन्न अधिक तेवढे कर्ज जास्त प्रमाणात मिळते.
  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर रिपोर्ट चांगला असला पाहिजे.
  • तुमच्या उत्पन्नाचे कायमस्वरूपी स्रोत असावेत.


गृह कर्ज निकष ( home loan eligibility criteria)
Home loan eligibility criteria,home loan, गृह कर्ज नियम व अटी

  • गृह कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 18 ते कमाल 70 असावे.
  • वार्षिक उत्पन्न किमान 05 ते 06 लक्ष यादरम्यान असावे.
  • क्रेडिट सिबिल स्कोअर 750 च्या वर म्हणजेच उत्कृष्ट असावा.
  • गृह कर्ज घेणारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करणारी आणि 02 वर्षाचा कामाचा अनुभव असणारी असावी.
  • व्यक्ती भारतीय किंवा अनिवासी भारतीय असली तरी चालेल.


गृहकर्ज घेताना ही काळजी घ्या ?( home loan care)


  •  बँकेच्या सर्व नियम व अटी पाहून होम लोन नक्की करावे.
  • गृह कर्जासाठी घाई करू नका.
  • गृह कर्ज घेतलेल्या व्यक्तींचा अभिप्राय विचारात घेऊन कोणत्या बँकेचे कर्ज आपल्याला परवडेल याचा विचार करा.
  • गृह कर्ज मुदत पाहून घ्या. अल्पमुदतीचे कर्ज घेऊ नका.
  • गृह कर्ज हवे तेवढेच घ्या,जेणेकरून व्याज वाढणार नाही.
  • विश्वासू बँकेचे गृह कर्ज घ्या.
  • खाजगी बँका गृह कर्ज लवकर देतात पण त्याचा व्याजदर जास्त असतो याचा विचार करावा.

होम लोन विषयी माहिती

क्रेडिट सिबील स्कोर - 


तुम्ही कोणत्याही बँकेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्या,पण ते वेळेवर पूर्ण भरा.कारण आजच्या डिजिटल युगात एका ग्राहकाचा ऑनलाईन डाटा सर्वत्र उपलब्ध असतो.तुम्ही एखाद्या बँकेचे कर्ज वेळेत न भरल्यास ती बँक तुमचा क्रेडिट सिबल स्कोअर नकारात्मक नोंदवत असते.असा डाटा ऑनलाईन राहतो आणि दुसरी बँक तुम्हाला कर्ज देण्याआधी हा डाटा पाहते आणि तुम्हाला कर्ज नाकारते.म्हणून कोणत्याही बँकेचे कर्ज वेळेत भरा,नाहीतर भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.


होम लोन विषयी माहिती,Home loan eligibility criteria,home loan,गृह कर्ज नियम व अटी

संयुक्त गृह कर्ज निवडा -


गृह कर्जासाठी एकाच व्यक्तीचे आवेदन देऊ नका.एका कुटुंबात दोन नोकरदार व्यक्ती असतील तर दोघांचेही आवेदन भरा.असे केल्याने तुमचे कर्जभार विभागाला जाऊन तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता नक्कीच वाढेल.बँक या गोष्टींचा नक्कीच विचार करून कर्ज पास करत असते.


निष्कर्ष (Conclusion)


या प्रकारे आपण गृह कर्जासाठी या पात्रता आणि निकष पूर्ण करायला हवेत.बँक आपल्या इतिहासातील सर्व घटना पाहूनच कर्ज प्रकरण मंजूर करत असते.म्हणून आपले वागणे,इतर कर्जफेडी या सर्व गोष्टी चांगल्या असाव्यात.या सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बँक गृह कर्ज देत असते.वरील सर्व गोष्टी तुम्हाला गृह कर्ज मिळण्यासाठी नक्कीच फायदेशीर होतील.होम लोन घेत असताना वरील सर्व बाबींचा विचार करून होमलोन घ्यावे. होम लोन घेत असताना सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून आपल्याला कोणती बँक सुरक्षित असे होम लोन देऊ शकते?याचा विचार करून हो म्हणून घ्यावे. होम लोन ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असल्याने सर्व बाजूंनी विचार करून व्यवस्थितपणे होम लोन ची निवड करण्यात यावी.

आजचा होम लोन विषयी माहिती,गृह कर्जासाठी पत्रता काय हवी,home loan eligibility criteria हा information G वरील लेख तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.