हिंदू धर्मामध्ये मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया चा उल्लेख केला जातो.या दिवशी केलेले दान किंवा काम हे अक्षय राहते म्हणजेच वाढते राहते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विविध प्रकारचे दान,धर्म किंवा नवीन कामाची सुरुवात,खरेदी यासारखे महत्त्वाचे कामे या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करतात.हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात महत्वाचा मुहूर्त म्हणून देखील अक्षय तृतीयेचा उल्लेख केला जातो.हिंदू धर्मामध्ये या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
अक्षय तृतीया मराठी माहिती (Akshay trutiya marathi mahiti)
- अक्षय तृतीया ईतिहास
- अक्षय तृतीया अक्षय मुहूर्त
- अक्षय तृतीया महत्व
- अक्षय तृतीया कशी साजरी करावी?
- समारोप
अक्षय तृतीया मराठी माहिती (Akshay trutiya marathi mahiti)
अक्षय तृतीया ईतिहास (Akshay trutiya itihas)
- हिंदू पुराणांनुसार या दिवशी भगवान श्री विष्णूंचा जन्म झाला म्हणून या दिवशी त्यांचा जन्म उत्सव म्हणून अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो.
- या दिवशी परशुरामांचा देखील जन्म झाल्यामुळे या दिवशी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो.
- हायग्रीव यांचा जन्म या दिवशी झाल्यामुळे अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो.
- या दिवशी त्रेतायुग तसेच कृतयुगाचा आरंभ झाल्यामुळे हा सन साजरा केला जातो.
एकंदरीत वरील सर्व घटना लक्षात घेऊन अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो.या दिवशी या खूप महत्वाच्या घटना घडून गेल्या असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.या दिवसाला हिंदू धर्मामध्ये खूप मोलाचे स्थान असून साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया हा दिवस ओळखला जातो.सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहात हा सण संपूर्ण भारतामध्ये विविध नावांनी तसेच विविध प्रथांनुसार साजरा केला जातो.संपूर्ण भारतामध्ये या सणाला मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले जाते.
Akshay trutiya marathi mahiti
अक्षय तृतीया अक्षय मुहूर्त (Akshay trutiya Akshay muhurt)
भारतीय संस्कृतीत अक्षय तृतीया या दिवशी दानाचे खूप महत्व सांगितले जाते या दिवशी केलेले दान कधीही क्षय होत नाही म्हणजेच अक्षय तृतीयाच्या दिवशी केले जाणारे दान हे नेहमी अक्षय राहते म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया म्हटले जाते.भारतीय परंपरेनुसार वर्षातील साडेतीन मुहुर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक संपूर्ण मुहूर्त असून या दिवशी लोक विविध प्रकारची नवीन कामे,खरेदी किंवा दानधर्म करत असून या दिवशी केलेली सर्व कामे शुभ मुहूर्त म्हणून मानली जातात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक दान धर्माचे कामे करत असतात.या दिवशी लोक ठीक ठिकाणी पाणपोई सुरू करत असतात.चांगले काम करण्यासाठी या दिवशी खूप महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो.या दिवशी केलेले कोणतेही दान हे आपल्याला दुप्पट मिळत असते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी बहुतांशी लोक विविध गोष्टींचे दान करत असतात. अशाप्रकारे भारतीय परंपरेत अक्षय तृतीया हा एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जाणारा सण आहे.
अक्षय तृतीया महत्व (Akahay trutiya mahatv in marathi)
दरवर्षी वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला अक्षय तृतीया हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.अक्षय तृतीया हा खूप महत्त्वाचा सण असून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा सण साजरा करण्यामागे खूप महत्वाच्या घटना घडून गेल्या असल्यामुळे हा सण खूप महत्त्वाचा आहे.
- याच दिवशी भगवान विष्णू यांचा जन्म झाल्यामुळे भगवान विष्णू यांच्या जन्मप्रीत्यर्थ अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची प्रथा पाळण्यात आली. संपूर्ण सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू असल्यामुळे त्यांच्याप्रती आपली श्रद्धा म्हणून लोक हा सण साजरा करतात.
- या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाल्यामुळे देखील अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो.
- भारतीय वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्यामुळे अक्षय तृतीया हा सण खूप महत्त्वाचा आहे.
- याच दिवशी आपल्या पूर्वजांना म्हणजेच पितरांना नैवद्य दाखवण्याची प्रथा आहे.पूर्वजांना त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून अक्षय तृतीया हा सण खूप महत्त्वाचा आहे.
वरील सर्व कारणांमुळे अक्षय तृतीया हा सण खूप महत्वाचा सण मानला गेला असून भारतीय लोकांच्या जीवनात सुख,शांती,आनंद देणारा हा सण खूप महत्त्वाचा आहे.
Akshay trutiya marathi mahiti
अक्षय तृतीया कशी साजरी करावी?(Akshay trutiya Kashi sajari karavi in marathi)
अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अक्षय तृतीया साजरी करण्यात येते.भारताच्या प्रत्येक भागात त्या भागाच्या रिवाजानुसार अक्षय तृतीया साजरी करण्यात येते.
- अक्षय तृतीया च्या दिवशी लवकर उठून गंगास्नान करावे असे सांगितले जाते.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी विविध वस्तूंचे दान करावे.या दिवशी ब्राम्हणांना दक्षिणा द्यावी.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवद्य अर्पण करावा.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ लोकांस भोजन घालावे.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कामाची सुरुवात करावी.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी उदार मनाने दानधर्म करावा.
समारोप (Conclusion)
अक्षय तृतीया हा सण धानाचे महत्व सांगणारा आणि भगवान परशुराम यांच्या जन्म प्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा भारतातील सर्वात मोठा सण असून वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा मुहूर्त यादिवशी येत असतो अक्षय तृतीया हा सण लोकांना नवीन कार्यासाठी उमेदीचा सण आहे. भारतीय परंपरेत दानाचे खूप महत्त्व असून दानासाठी अक्षय तृतीया हा सण खूप महत्त्वाचा आहे.
Akshay trutiya marathi mahiti हा InformationG वरील आजचा लेख तुम्हाला कसा वाटला?आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग अवश्य फॉलो करा.