माझी शाळा निबंध मराठी

माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi

शाळा ही अशी जागा आहे की,ज्या जागेत विद्यार्थ्यांना जगातील महान असे तत्वज्ञान शिकवले जाते.शाळा हे एक मंदिर असून,शाळेत विद्यार्थ्यांना महानतेची शिकवण दिली जाते.शाळा ही विद्यार्थ्यांसाठी खरोखरच जीवन जगण्यासाठी शिक्षण देणारी एक संस्थाच असते.माझी शाळा निबंध मराठी ,My school essay in marathi मित्रांनो मी आज तुम्हाला माझी शाळा निबंध वेगवेगळ्या भागांमध्ये लिहून दिला आहे.माझी शाळा हा निबंध इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे नक्की वाचा.

माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (10 ओळींमध्ये )

1) माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.

2) माझी शाळा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आहे.

3) माझ्या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात.

4) माझ्या शाळेभोवती सुंदर असे गार्डन आहे.

5) माझ्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच शारीरिक आरोग्याकडे ही लक्ष दिले जाते.

6) माझ्या शाळेतून अनेक नामवंत क्षेत्रातील तज्ञांनी शिक्षण घेतले आहे.

7) सर्व विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटणारी अशी माझी शाळा आहे.

8) माझ्या शाळेत दरवर्षी विविध खेळांच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात.

9) माझ्या शाळेत पारंपरिक शिक्षणाबरोबरच डिजिटल प्रणालीद्वारे सुद्धा शिक्षण दिले जाते.

10) माझी शाळा सर्वगुणसंपन्न असा विद्यार्थी घडवूनच पुढे पाठवते.


माझी आई निबंध


माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (१०० शब्दांमध्ये)

सर्व विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटणारी अशी माझी शाळा आहे.शाळेची इमारत आकर्षक आणि टुमदार आहे.विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेमध्ये छानशी बाग आणि खेळाचे मैदान आहे.विद्यार्थ्यांना आवडणारी गाणी आणि गोष्टी तसेच प्रार्थना माझ्या शाळेमध्ये दररोज घेतल्या जातात.माझ्या शाळेत छानसे छोटेसे ग्रंथालय आहे.ज्यामध्ये मुलांना वाचण्यासाठी छान छान गोष्टीची पुस्तके तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार घडण्यासाठी संस्कार पुस्तकेही आहेत.

माझ्या शाळेतील गुरुजी हे विद्यार्थ्यांना मनमिळाऊ पणे वागवणारे आहेत. माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुरुजींनी छान असे संस्कार केले आहेत. माझी शाळा एक आदर्श अशी शाळा आहे.माझ्या शाळेत शिक्षणाबरोबरच शारीरिक विकासाला देखील महत्त्व आहे म्हणूनच मला माझी शाळा खुप खुप आवडते.माझी शाळा मला खूप प्यारी आहे.


माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (२०० शब्दांमध्ये)

"शाळा ही विद्यार्थ्यांची दुसरी आई असते असे म्हणतात कारण शाळेत विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कला शिकवली जाते".शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर योग्य असे संस्कार केले जातात.माझ्या शाळेचे नाव जि प प्राथमिक शाळा आहे.माझ्या शाळेमध्ये इयत्ता पहिली पासून ते इयत्ता सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावे म्हणून दररोज प्रार्थना आणि परिपाठ घेतला जातो.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांना दररोज छान छान बोधकथा ऐकवल्या जातात.

माझ्या शाळेत सुंदर असा बगीचा आहे.सर्व विद्यार्थी बगीच्या ची वेळेवर काळजी घेतात.बगीच्या मुळे शाळेच्या सुंदरतेत आणखी भर पडते.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त असे खेळाचे मैदान आहे.माझ्या शाळेतून खूप अष्टपैलू खेळाडू याच मैदानातून घडून गेले आहेत.माझ्या शाळेत शिक्षणाबरोबरच खेळाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते.

माझ्या शाळेत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना त्याच तोलामोलाचे शिक्षण दिले जाते.माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल प्रणालीद्वारे शिक्षण दिले जाते त्याचबरोबर इंग्रजी भाषेस सुद्धा महत्त्व दिले जाते.काळाची पावले ओळखून एक पाऊल पुढे राहणारी अशी सुंदर आणि आदर्श अशी ही माझी शाळा आहे.माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडावेत म्हणून एक सुंदर असे ग्रंथालय आहे.या ग्रंथालयात भारतातील थोर व्यक्तींचे आत्मचरित्र,भारतातील नेत्यांचे माहिती,भारतातील स्वातंत्र्यसैनिक अशी सर्व विषय असलेली पुस्तके आहेत.जी पुस्तके वाचून विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार घडावेत हा हेतू असतो.अशीच छान छान पुस्तके वाचून विद्यार्थी पुढे भारताचे आदर्श नागरिक बनतात.


माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (३०० शब्दांमध्ये)

माझी शाळा ही सर्वगुणसंपन्न अशी शाळा आहे.माझ्या शाळेत काळाची पावले ओळखून शिक्षण दिले जाते.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण उपलब्ध आहे.सर्व विद्यार्थ्यांना ई-लर्निंग द्वारे शिक्षण दिले जाते.विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा सोपी जावी म्हणून इंग्रजी भाषेचे क्लास सुद्धा माझ्या शाळेत घेतले जातात.माझ्या शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये नाव कमावून शाळेचे नाव उज्वल करत असतात.माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न असे बनवले जाते.विद्यार्थी केवळ परीक्षा पुरता तयार न करता विद्यार्थ्याकडून सर्वांगीण विकास करून घेतला जातो.विद्यार्थी अभ्यासात,खेळात,व्यायामात सर्व गोष्टीत पुढे राहील याची दक्षता घेतली जाते.

माझ्या शाळेची इमारत ही गावापासून थोडीशी दूर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना गावातील वर्दळीचा त्रास होणार नाही.निसर्गाच्या सानिध्यात मन लागून अभ्यास करण्यास चांगले वातावरण राहील याची दक्षता घेतली आहे.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्व सुख सुविधांची काळजी घेतली जाते.विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार वर्गाच्या खोल्या सजवल्या जातात.माझ्या शाळेत भिंतींवर विविध माहिती लिहून बोलक्या भिंती तयार केल्या आहेत.माझी शाळा सर्वगुणसंपन्न अशी शाळा आहे.

माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड लागावी म्हणून एक छानशी प्रयोगशाळा उभारली आहे.विद्यार्थ्यांना विज्ञानाचे नवनवीन आणि आकर्षक असे प्रयोग दाखवले जातात.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान वृत्ती जागवण्याचा प्रयत्न केला जातो.विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास प्रवृत्त केले जाते.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांचा प्रयोगशीलतेला वाव भेटावा म्हणून वेळोवेळी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते.माझ्या शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी म्हणून आठवडे बाजार देखील भरवला जातो.शाळेमध्ये बाजार भरून विद्यार्थ्यांना बाहेरील जगाची रीत कळते.अशी माझी शाळा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देते.विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टींमध्ये रस येण्यासाठी शाळेत नवनवीन वस्तूंचे प्रदर्शन भरवले जाते.अशा वस्तूंचे प्रदर्शन पाहून विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची क्षमता वाढीस लागते. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळण्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना नवनवीन कामांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.अशा प्रकारे माझी शाळा ही सर्व शाळांपेक्षा आगळेवेगळे शिक्षण देणारी शाळा आहे.शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते.विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस हातभार लावणारी अशी माझी शाळा मला खूप आवडते.माझी शाळा आहेच अशी की सर्वांना वाटते ती हवी हवीशी.


माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (४०० शब्दांत)

"अशी येती पाखरे आणि आठवण ठेउन जाती भुरकन उडून",शाळेचे असेच असते.दरवर्षी नवीन विद्यार्थी येतात आणि जुने विद्यार्थी त्यांचे शिक्षण संपवून व्यावहारिक जीवनात अनुभव घेण्यासाठी निघून जातात.असे म्हटले जाते की,"शाळा ही मनुष्याला व्यावहारिक जीवन जगण्याची कला शिकवते".विद्यार्थ्याला व्यवहारिक जीवनात जगताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्याचे काम शाळेमध्ये केले जाते.माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे खूप प्रयत्न केले जातात.विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शाळेमध्ये सुसज्ज असे ग्रंथालय आहे.ग्रंथालयामध्ये शिक्षणापासून ते थोर व्यक्तींच्या आत्मचरित्र पर्यंत पुस्तके उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांना आजच्या संगणकाच्या युगात वावरताना त्यांना संगणक ज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून एक सुसज्ज अशी संगणक लॅब आहे.ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळेल एवढे संगणक आहेत.माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आजच्या काळात संगणक साक्षर विद्यार्थी आहे.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.मग ते परीक्षा,खेळ,व्यायाम किंवा इतर कोणत्याही बाबतीत वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते.माझ्या शाळेतील शिक्षक हे विद्यार्थ्यांशी मित्रत्वाच्या नात्याने वागतात.आजच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीत त्यांना कसे हाताळावे याचे पुरेपूर ज्ञान आणि अनुभव माझ्या शाळेतील शिक्षकांना आहे.त्याचा वापर ते विद्यार्थ्यांना शिकवत असताना नेहमीच करत असतात.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधांची कमतरता पडू दिली जात नाही. मग त्या सुविधा भौतिक असो वा शैक्षणिक असो.विद्यार्थ्यांना एक पाऊल पुढे राहण्यासाठी नेहमीच चांगले मार्गदर्शन केले जाते.विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.विद्यार्थी विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये चमकण्यासाठी शाळेतील शिक्षकांकडून अपार मेहनत घेतली जाते.विद्यार्थी हा शाळेचा एक अविभाज्य घटक असून,विद्यार्थ्यां शिवाय शाळा अपूर्ण आहे याची जाणीव शाळेतील सर्व शिक्षकांना असून,विद्यार्थ्यांना छडीचा धाक न दाखवता त्यांना त्यांची चूक अत्यंत हुशारीने दाखवून दिली जाते आणि परत करण्यास विद्यार्थ्यास परावृत्त केले जाते.विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून त्यांना साने गुरुजी,पंडित जवाहरलाल नेहरु यांसारख्या थोर व्यक्तींची पुस्तके वाचायला दिली जातात.थोर व्यक्तींच्या पुस्तकांचा विद्यार्थ्यांच्या मनावर इच्छित परिणाम होऊन विद्यार्थी त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थी हे मातीचा गोळा असून आपण त्याला जसे घडवु तसे विद्यार्थी घडत असतात.माझ्या शाळेतील शिक्षक या वाक्याचा पुरेपूर वापर करून विद्यार्थी परिपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कसा बनेल याकडे अत्यंत काळजीने लक्ष देतात.

शाळा ही विद्यार्थ्यांना त्रासदायक न वाटता एक आनंददायी विद्यामंदिर वाटावे म्हणून शाळेमध्ये विविध स्पर्धा,प्रार्थना,सहली,अभ्यास दौरे,गड-किल्ल्यांना भेटी देणे यांसारख्या विविध मनोरंजनात्मक अभ्यासात्मक गोष्टींचा समावेश शाळेच्या वेळापत्रकात केला जातो.पालक विद्यार्थ्यांना खूप आशेने शाळेत पाठवत असतात.पालकांच्या विद्यार्थ्याकडून असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन माझ्या शाळेने पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समन्वयाने विद्यार्थी पूरक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या वाटचालीस आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शाळेचा मोलाचा वाटा असतो म्हणून शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवून,शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक तसेच इतर गोष्टींचे मार्गदर्शन केले जाते.माझी शाळा सर्व समाजाला एकत्र घेऊन पुढे चालते म्हणून मला माझी शाळा खूप खूप आवडते.


माझी शाळा निबंध मराठी my school essay in marathi (५०० शब्दांत)

"शाळा ही विद्या शिकवणारी देवताच आहे".शाळा ही केवळ शाळा नसून एक विद्यामंदिर आहे.शाळेतून शिक्षण घेऊन जाणारे विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यात जगण्यासाठी लागणारी कला शिकून जात असतात त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शाळेची असते.माझ्या शाळेत या सर्व गरजांची पूर्तता करण्यात आली असून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक आणि गुणात्मक शिक्षण देण्यावर माझ्या शाळेचा भर असतो.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे ओव्हरहेड प्रोजेक्टर द्वारे शिक्षण दिले जाते.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ई-लर्निंग द्वारे तज्ञ व्यक्ती द्वारे मार्गदर्शन केले जाते.शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.दर आठवड्याला विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्य तपासणी शिक्षकांमार्फत केली जाते.यामध्ये शारीरिक स्वच्छता तपासली जाते.शाळेमध्ये वर्षातून दोनदा आरोग्य तपासणी शिबिर घेतले जातात.यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निवारण करण्यात येते.आरोग्य चांगले तर मनुष्य चांगला या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्याला जर आरोग्याची तक्रार असेल तर तो अभ्यासाकडे लक्ष देणार नाही.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी शाळेमध्ये घेतली जाते.विद्यार्थ्यांना आहार विषयक माहिती देण्यात येऊन विद्यार्थ्यांचे पोषण व्यवस्थित कसे होईल याकडे लक्ष दिले जाते.

विद्यार्थी शिकून त्याने देशाचे नाव उज्वल करावे या हेतूने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणित ऑलिम्पियाड,राष्ट्रीय प्रज्ञाशोध यासारख्या परीक्षांना बसविले जाते. त्यासाठी त्यांना विशेष मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिकण्यात शाळेत परवानगी आहे.विद्यार्थ्याला ज्या विषयात रस असेल त्या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते.जर एखादा विद्यार्थी एखाद्या खेळात प्रावीण्य मिळवत असेल तर त्याला शाळेमार्फत हवे ते सर्व सहकार्य केले जाते. विद्यार्थ्यांची कुवत ओळखून त्यांना हवे त्या प्रकारचे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे माझी शाळा होय.शाळेमध्ये सर्व शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र जेवण करतात आणि त्यामधून सर्व धर्म समभाव याची शिकवण सर्व विद्यार्थ्यांना दिली जाते.एखाद्या गरीब विद्यार्थ्याला सर्व विद्यार्थी मदत करतात. यामधून आपण देशाचे काहीतरी देणे लागतो याची भावना सर्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजण्यास मदत होते.शाळेमध्ये शिक्षक असो वा विद्यार्थी असो सर्वांना समान नियम आहेत.नियमांचे सर्वजण पालन करतात.शिक्षक-विद्यार्थी असा भेदभाव केला जात नाही कारण,आपण सर्व एकाच भारताचे नागरिक आहोत आणि भारत मातेला प्रगत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.याचे भान माझ्या शाळेमध्ये ठेवले जाते.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मत मांडण्याची संधी दिली जाते जेणेकरून,विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानात भारतीय नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य माहिती होईल.शाळेमध्ये विद्यार्थी पालक चर्चा आयोजित केली जाते जेणेकरून,पालक-विद्यार्थी आणि शाळा हा एक जबाबदार त्रिकोण तयार होईल याची काळजी घेतले जाते.पालक आणि विद्यार्थी चर्चा आयोजित केल्यामुळे पालकांना देखील शाळेविषयी मनात आपुलकी तयार होते.आपण शाळेचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शाळेच्या असलेल्या समस्या सोडवण्यास मदत होते.शाळेत सर्वांना एकत्र येऊन प्रगतीची एकेक पायरी चढत जाणे या नियमाचे पालन होत असते.

"शाळा ही एक सुसंस्कृत भारत घडवणारी सामाजिक संस्था असून,शाळेच्या विकासात लोक सहभाग खूप महत्त्वाचा असतो".माझ्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून विविध प्रकारची कामे केली जातात.शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागातून हवी ती मदत घेतली जाते तसेच, शाळेच्या भौतिक सुधारणांबाबत ही लोक सहभाग घेतला जातो.लोकांचा सहभाग शाळेच्या विकासात खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. लोकसहभाग घेतल्याने लोकांना शाळेबद्दल आपुलकी आणि प्रेम वाढते.शाळेत आपलीच मुले शिक्षण घेणार आहेत म्हणून,लोकही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाहीत कारण,याच शाळेमधून देशातील भावी आणि आदर्श नागरिक घडणार असतात.कुणी डॉक्टर,इंजिनीयर,शिक्षक,उद्योजक याप्रकारे भावी पिढी घडवणारी शाळा ही सर्वांना हवीहवीशी वाटत असते म्हणून, लोकसहभागातून शाळेच्या सर्व सुविधांची पूर्तता करण्यात येते.माझी शाळा एक आदर्श शाळा असून पालक-विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मेळ घालून पुढे चालणारी एकमेव अशी शाळा आहे.शाळेमध्ये इतर शाळां प्रमाणे सर्व भौतिक सुविधा असून इतर शाळांच्या एक पाऊल पुढे म्हणून शाळेत विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाते तसेच,विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग व स्पोकन इंग्लिश चे क्लास घेतले जातात.शाळेमध्ये कोणीही विद्यार्थी अप्रगत राहू नये म्हणून विशेष परिश्रम घेतले जातात.अप्रगत विद्यार्थ्यांची यादी बनवून त्यांना विशेष अभ्यासक्रमाबरोबर शिक्षण दिले जाते.शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात.अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनात जगण्यासाठी काय करावे लागते याची माहिती मिळते म्हणूनच,माझी शाळा ही केवळ पुस्तकी ज्ञान देणारी शाळा नसून,माझी शाळा विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच अनुभव आणि कौशल्य प्रदान करण्यास मदत करणारी शाळा आहे.

समारोप - शाळा ही विद्यार्थ्यांसाठी खरोखरच जीवन जगण्यासाठी शिक्षण देणारी एक संस्थाच असते.शालेय जीवनात विद्यार्थी विविध प्रकारचे अनुभव  घेऊन जगण्याची कला शिकत असतात.खरोखरच शाळा ही विद्यार्थ्यांसाठी एक मंदिरच आहे.

माझी शाळा निबंध मराठी,my school essay in Marathi आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचा ब्लॉग Information-G अवश्य फॉलो करा.