Jagatik hruday din in marathi अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी

 Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.

 Jagatik hruday din in marathi, World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.आजच्या आधुनिक,धावपळीच्या युगात माणसाकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो,आणि मग एखाद्या दिवस अचानक कळत की अमुक अमुक चा हृदय विकाराने मृत्यू झाला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने हृदय विकारबाबत खूप कार्यक्रम राबवले जातात.ज्याने त्याने आपल्या हृदयाची काळजी घेतलीच पाहिजे.jagtik hruday din,२९ सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो की हा आजार जागतिक पातळीवर आणि खूप मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे,लोकांना त्याविषयी माहिती व्हावी हा या मागे हेतू आहे.


हार्ट अटॅक म्हणजे काय? ( What is heart attack?)


हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांनपैकी एखादी रक्तवाहिनी बंद पडली की हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा बंद होतो आणि हार्ट अटॅक येतो.


हार्ट फैल्यूअर म्हणजे काय? ( What is heart fellure?)


या मध्ये हृदयाचे स्नायू कमजोर होतात आणि हृदय प्रसरण पावते,हृदयातून रक्त बाहेर टाकले जाते त्याला पंपिंग असे म्हणतात.साधारण व्यक्तीचे हृदय ५० ते ६०% पंपिंग क्षमतेने काम करते तर हार्ट फैल्यूअर व्यक्तीमध्ये हे प्रमाण ४०% कमी होते.


का होतो हृदय रोग? (Why does heart disease occur?)


वर्ल्ड हार्ट फेडरेशन च्या मते धूम्रपान,डायबेटिस,उच्च रक्तदाब,लठ्ठपणा,प्रदूषण या मुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहे,त्यांच्या मते दरवर्षी हृदय आजारांनी लाखो लोक मरण पावतात.


नॉन कम्यूनेकेबल डीसिस


हृदय विकार हा संसर्गजन्य आजार नसून तो मानवाच्या जीवनशैली विरुद्ध आजार आहे,माणसाची जीवनशैली बदलल्यास तो होतो.उदा.धूम्रपान,तेलकट पदार्थ अधिक खाणे,लठ्ठपणा ई.जागतिक आरोग्य संघटनेने हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी २०१३ या सालापासून प्रयत्न सुरू केले आहेत.त्यांच्या मते हा वाढणारा आजार २०२५ पर्यंत २५% कमी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.या आजाराबद्दल लोकांना माहिती व्हावी या साठी दर २९ सप्टेंबर रोजी हा jagatik hruday din साजरा केला जात असतो.


हृदय विकाराची लक्षणे (Symptoms of heart disease)


हृदय रोग येण्यापूर्वी महिनाभर त्याची वेगवेगळी लक्षणे दिसून येत असतात,त्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले असता,जीवावर बेतू शकते,म्हणून हृदय विकाराची लक्षणे ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,चला तर पाहू कोणकोणती लक्षणे दिसून येतात.


चालताना छाती खूप जड झाल्यासारखी वाटते.

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो.

चालताना दम लागतो.

काहीही खाताना जळजळ होते.

काही खाल्ल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणे,चालताना दम लागणे.

चक्कर, उलटी,पोटाच्या समस्या दिसणे 

सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे थकवा येणे,चालताना डावा हात दुखणे,खोकला, कफ आणि हात पाय यांना सूज येणे.हे गंभीर लक्षणे आहेत ही लक्षणे दिसून येताच डॉक्टरांची भेट घ्यावी.


हृदय विकार काय काळजी घ्यावी? (What to watch out for heart disease?)


खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.तेलकट,मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

सर्वात महत्वाचे तेल कमी वापरा,नैसर्गिक तेल वापर करा.

व्हिटॅमिन बी6,फॉलीक अँसिड,व्हिटॅमिन सी घ्या.

३० वर्षानंतर रक्तदाबाची वेळेवर तपासणी करावी.

धूम्रपान टाळावे.

रोज व्यायाम,योगासने करावीत.


मानवाचे हृदय हा मानवाचा सर्वात महत्वाचा अवयव आहे,त्याची निगा राखणे खूप गरजेचं आहे. खाणपिण्यावर नियंत्रण,व्यायाम, योगासने या सर्व कारणांमुळे हृदय विकार होण्यापासून बचाव होऊ शकतो.मानवाची बदलती जीवनशैली ही या आजारास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरली आहे.

आधुनिक काळात प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल,या मुळे होणारी धावपळ,कामाचा ताण,धूम्रपान या सर्व कारणांमुळे हृदय विकार आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढू लागला आहे.आपण वेळेत सावध होऊन हृदय विकार होण्यापासून स्वतःचा बचाव करणे हे खूप गरजेचं बनलं आहे.


Jagatik hruday din in marathi,World heart day,अशी घ्या आपल्या हृदयाची काळजी,जागतिक हृदय दिवस कधी साजरा केला जातो.ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा. Information G या आमच्या ब्लॉगला नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा.

असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा

 असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हरतालिका 2022, हरतालिका व्रत कसे करावे,हरतालिका व्रत पूजा,मुहूर्त,हरतालिका व्रत माहिती,haratalika vrat information in marathi

भाद्रपद शुध्द तृतीयेला सुवासिनी स्त्रिया हरतालिका व्रत करतात.या दिवशी हरतलिकेचा उपवास करतात. हरतालिकेची पूजा करतात, भगर खाऊन उपवास करतात.सामूहिक समारंभ आयोजित करून हळदी कुंकू,भेटी गाठी,मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले जातात. हरतालिकेच्या दिवशी स्रिया जागरण करून दुसऱ्या दिवशी गौरींचे विसर्जन करतात.हरतालिकेच्या दिवशी आदिमाया व शिवशक्ती यांचे मिलन झाले व जगतकल्यानाचे कार्य पार पाडले.


हरतालिका धार्मिक कथा


राजा दक्षाच्या आपमनाने क्रुद्ध झालेल्या शंकरांना माता पार्वतीने खडतर तप करून प्रसन्न करून घेतले.अनुपम लावण्यवती,राजकन्या,रूपवती,सर्व सुखांत लोळणारी असूनही देवांच्या रक्षणासाठी शिवकृपेची गरज असून या सर्व सुखांवर पाणी फिरून पार्वतीने शंकरांशी विवाह केला.सर्व देवांचे दुःख, संकटे दूर केली.अशी धार्मिक कथा सांगितली जाते.


हरतालिकेच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी


1) क्रोध करणे टाळावे

या दिवशी क्रोध,राग,मत्सर करू नये,शांत अंतःकरणाने पूजा करावी,उपवास,व्रत करावे,क्रोध या दिवशी जवळही येऊ देऊ नका.


2) अपमान करू नये

या दिवशी कोणाचाही अपमान करू नये,लहान थोर सर्वांचा आदर करावा,कुणालाही दुःख देऊ नये.कोणीही दुखावेल असे अपशब्द कुणालाही वापरू नये.


3) झोपू नये

हरतालिका व्रताच्या दिवशी झोपू नये,रात्रभर भजन,कीर्तन करावे,व्रत करणाऱ्याने दिवस रात्र झोपू नये,भजन कीर्तन करावे.


4) खाणे-पिणे टाळावे

हरतालिका व्रत हे निर्जल करण्याचे विधान आहे,या दिवशी खाणे पिणे टाळावे,जास्त आवश्यकता वाटल्यास दूध,पाणी,फळ आहार अगदी अल्प प्रमाणात करावा,शक्यतो पाणी व दूध घ्यावे.


हरतालिकेचे महत्व


भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात हरतालिका साजरी केली जाते.

महिलांनी या दिवशी व्रत करावे.निर्जल उपवास करावा,रात्री फलाहार घ्यावा.

हिंदू धर्मानुसार परवतीमातेने केलेल्या व्रतामुळे त्यांना शिव शंकराची प्राप्ती झाली.

देशात सर्वत्र हरतालिका साजरी करण्यात येते फक्त स्वरूप वेगवेगळे असते.

हिंदुधर्मात हरतालिकेला खूप महत्व आहे.

गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हा दिवस साजरा केला जातो.

या प्रकारे हरतालिकचे हिंदू धर्मात खूप महत्व आहे.खासकरून स्रिया दिवशी मोठ्या प्रमाणात व्रत करतात. हिंदू धर्मानुसार हरतालीकच्या दिवशी केलेल्या व्रतामुळ सर्व ईच्छा,आकांक्षा,सुख,समृद्धी प्राप्त होते.


हरतालिका व्रत करण्यास लागणारे साहित्य


 • 1. शिव व पार्वतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी वाळू आणावी 

 • 2. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी चौपाई

 • 3. चौपई झाकण्यासाठी वस्त्र

 • 4. नारळ

 • 5. पाण्याचा कलश

 • 6. आंब्याची पाने

 • 7. तूप

 • 8. दिवा

 • 9. अगरबत्ती,धूप

 • 10. कापूस

 • 11. कापूर

 • 12. शिव पार्वती च्या मूर्ती ठेवण्यासाठी एक छानसे पात्र.


हरतालिका व्रत कसे करावे


हरतालिका पूजेसाठी एक लाल वस्त्र पसरून त्यावर भगवान शिव व पार्वतीचे मूर्ती,फोटो ठेवावा.


भगवंतांच्या अभिषेकासाठी एक पात्र घ्या.


अक्षता घेऊन त्यावर कलश स्थापन करावा.


कलाशामध्ये नाने,सुपारी,खारीक,हळद घाला.


कलाशा शेजारी पान,सुपारी ठेवा आणि त्यावर तांदूळ व एक दिवा भरलेली वाटी ठेवा.


पान व सुपारी घेऊन त्यावर अक्षता वाहून गौरी व गणेशाची मूर्ती स्थापन करा.


पूजा सुरू करा देवांना दूध,तांदूळ अर्पण करा.


सर्व देवतांना दीप कलश घालून पूजा करावी.


आमच्या लोकप्रिय पोस्ट नक्की बघा.


बैल पोळा सजावट आणि माहिती नक्की बघा.


अशा प्रकारे हरतालिका व्रत करावे,या व्रतास भारतात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, हरतलिकेच्या व्रत केल्यास सर्व दुःख,संकटे दूर होऊन जीवनात सुख,शांती, समाधान प्राप्त होते. हरतालिकेचे व्रत हे खूप श्रेष्ठ असून जो ते मनोभावे पूर्ण करील त्याच्या सर्व ईच्छा आकांक्षा माता पार्वती व शिव शंकर पूर्ण करतील या प्रकारची अख्यायिका या व्रतामागे आहे.


असे करा हरतालिका व्रत होईल खूप लाभ,हरतालिका व्रत कथा,हा आमचा लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन लेख,माहिती मिळवण्यासाठी आमच्या Information G या ब्लॉगला अवश्य फॉलो करा.


बैल पोळा अशी करा बैलांची भन्नाट सजावट,bail pola information in marathi

https://www.informationg.com/2022/08/bail-pola-information-in-marathi.html?m=1

 
बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध

बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध


भारतासारख्या कृषी प्रधान देशांमध्ये आज देखील मोठ्या प्रमाणावर बैलांच्या साह्याने शेती केली जाते.अशा या माणसाला उपयोगी पडणाऱ्या प्राण्याला वर्षातून एकदा मोठ्या दिमाखाने सजवून त्याची पूजा केली जाते. त्यालाच आपण बैलपोळा असे म्हणतो. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीपासूनच प्राण्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे.सर्व प्रकारचे प्राणी आपल्या उपयोगी येतात म्हणून आपण त्यांचे ऋण विसरता कामा नये,अशी आपली संस्कृती सांगते म्हणूनच ,आज देखील भारतातील काही राज्यांमध्ये बैलपोळा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. आज आपण बैलपोळा सणाबद्दल माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा बैलपोळा या विषयावर निबंध पाहणार आहोत.

बैल पोळा तिथी,बैल पोळा कधी साजरा केला जातो (When celebrate bail pola)


भारतामध्ये प्राचीन काळापासून श्रावण महिन्यामध्ये विविध सणांची रेलचेल असते .श्रावण महिन्यातील अमावस्या आणि भाद्रपद महिन्यातील अमावस्या या दोन अमावस्यांना भारतातील काही भागांमध्ये श्रावणी बैलपोळा ,श्रावणी अमावस्याला व भाद्रपदी बैलपोळा ,भाद्रपद अमावस्येला साजरा केला जातो याचप्रमाणे ,कर्नाटकात देखील कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. अशाप्रकारे भारतामध्ये महाराष्ट्र ,कर्नाटक ,मध्य -प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये वेगवेगळ्या तिथींना बैलपोळा हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

ऋण व्यक्त करणारा सण बैल पोळा  (A debt-giving festival called Bail Poal)


भारत हा देश पूर्वीपासूनच कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. भारतामध्ये पूर्वी आणि आत्ता देखील बहुसंख्य शेतकरी शेतीसाठी बैल या प्राण्याचा वापर करतात. बैल हा प्राणी मोठ्या प्रामाणिकपणे वर्षभर शेतकऱ्यासाठी म्हणजेच आपल्या मालकासाठी शेतामध्ये राबवत असतो. बैलाला शेतकरी आपल्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून समजत असतो. शेतकऱ्याबरोबर वर्षभर राब- राब राबणाऱ्या बैलाला वर्षातून एक दिवस कामातून विश्रांती मिळावी तसेच मालकासाठी राबणाऱ्या या प्राण्याचे ऋण फेडण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. 

बैलांप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा सण भारतातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. बैल हा एक प्राणी असून त्याला देखील भावभावना असतात .त्याला देखील विसावा हवा असतो. त्याच्या देखील प्राणाची कदर करायला हवी .या सर्व भावनेतून बैलपोळा सण वर्षातून एकदा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

बैल पोळा सजावट कशी करावी (How to decorate bull in bail pola)बैल सजावट फोटो,बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध


बैलपोळ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी आणि बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना स्वच्छ आंघोळ घालावी.
 • बैलांच्या नख्या व शिंगे साळून स्वच्छ करावी.
 • बैलांच्या अंगाला तेल चोळावे.
 • बैलांच्या अंगावर झुल घालावी.
 • सिंगांना छान कलर किंवा सोनेरी कलर लावावा.
 • सिंगांना कलर लावल्यानंतर त्यावर रंगेबिरंगी बेगडे चिटकवीत.
 • बैलांच्या अंगावर कलर ने उठून दिसेल अशी नक्षी काढावी.
 • या दिवशी बैलांना नवीन मोरखी ,नवीन घुंगराची माळ ,मण्यांची माळ घालावी.
 • बाजारात बैलांच्या सजावटीचे वेगवेगळे सामान आणावे.
 • बैलांच्या पायामध्ये घुंगरांच्या माळा घालाव्यात. 
 • बैल सजावट आकर्षक आणि मनमोहक करावी.

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी वर्षभर कठोर परिश्रम करणाऱ्या बैलांची सजावट करताना शेतकरी देखील मागेपुढे न पाहता आवश्यक तो सर्व खर्च करून ,आपला बैल इतर शेतकऱ्यांच्या बैला पेक्षा आकर्षक आणि मनमोहक कसा दिसेल यासाठी प्रयत्न करतात.


बैल पोळा सण कसा साजरा करावा ( How to celebrate bail pola)


बैल पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना मस्तपैकी अंघोळ घालावी. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना कोणत्याही कोणत्याही कामाला जुंपू नये हा दिवस बैलांचा मानाचा दिवस असतो बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना आकर्षक आणि मनमोहक रीतीने सजवावे बैलांवर गुलाल भंडाऱ्याची उधळण करावी संध्याकाळी गावच्या ठिकाणी मुख्य दैवताला बैल जोड्यांची वाजत गाजत प्रदक्षिणा घालून आणावी घरी आल्यानंतर बैलांची स्त्रियांनी पूजा करावी आणि त्याला पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा बैलामुळेच आपल्याला वर्षभर जेवायला मिळते म्हणून या दिवशी बैलाला अवश्य पुरणपोळी खाऊ घालावी आपल्या पाहुण्यांना या दिवशी बैलपोळा सणाला आवर्जून बोलवावे अशा रीतीने ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत बैलपोळा सण साजरा केला जातो.


बैल पोळा निबंध मराठी (Bail Poal Essay in Marathi)


"चल माझ्या सर्जा,चल र राजा,बिगी-बिगी डौलान,गाऊ मोटवरच गाणं ."

या गाण्याप्रमाणेच शेतकऱ्याचं आणि बैलाचा आयुष्य असतं रोज उठून कामावर जाणार आणि काळ्या आईची सर्वांना थकता करणे. मालकाबरोबरच बैल देखील शेतात राबत असतो अशा या बैलासाठी वर्षातून एक दिवस आपण बैलपोळा हा सण साजरा करतो.या दिवशी बैलांना धुतलं जातं चांगली सजावट केली जाते, गावामधून मिरऊन आणले जाते घरी आल्यानंतर ओवाळून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. 

बैलांप्रती आपल्या असणारे ऋण व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. प्राणीदेखील मानवासाठी मोलाचे आहेत हा संदेश या सणामधून दिला जातो. वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी विसावा म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. याचा परिणाम म्हणून बैलांची संख्या घटत चालली आहे. असे असून देखील या सणाचे महत्त्व किंचितही कमी झाले नाही. ज्या लोकांकडे खरे बैल नाहीत ते मातीचे बैल आणून त्यांची पूजा करतात.

भारताच्या ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळते.बैल सजावटीच्या वस्तू तयार करून बरेच कामगार आपला उदरनिर्वाह करतात.एकंदरीत बैलपोळा सण ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा सण आहे.असा बैलपोळा मला खूप आवडतो.

बैलपोळा हा सण ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारा हा सण आहे. ग्रामीण भागात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणारा बैलपोळा हा सण आहे.बैल पोळा माहिती मराठी,bail Pola mahiti marathi,bail Pola information in marathi, बैल पोळा निबंध हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा.


राष्ट्रीय क्रीडा दिन, हॉकीच्या जादुगरचे स्मरण , national sports day in marathi

राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध


राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध


मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट


भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे झाला.मेजर ध्यानचंद यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लष्करात प्रवेश केला.भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत सुरू झाला.मेजर ध्यानचंद यांच्या कारकिर्दीत भारताने सलग तीन वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडल मिळवले.जागतिक हॉकी खेळात पहिल्या स्थानावर विराजमान असणाऱ्या या खेळाडूला हॉकीचे जादूगार असेच म्हटले जाते.

भारत सरकारने देखील मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीची दखल लक्षात घेऊन त्यांना 1956 साली देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले.भारतीय हॉकीला जागतिक पातळीवर खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल भारत सरकारने त्यांचा येथोचित असा गौरव केला.हॉकी खेळात 1000 हून अधिक गोल करण्याची अविश्वासनीय अशी कामगिरी त्यांनी केली आहे.याच कारणामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे संबोधले जाते.

मानवी जीवनामध्ये खेळाला खूप महत्त्व आहे.खेळाने माणसाची शारीरिक प्रगती होत जाते.खेळामुळे व्यायाम होतो.खेळामुळे आरोग्य निरोगी राहते म्हणूनच,कोणत्याही देशात खेळाला खूप महत्त्व असते.प्रत्येक देशात दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो.भारतात देखील मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ 2012 पासून त्यांच्या नावाने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.अशा या महान खेळाडूचे निधन 3 डिसेंबर 19 रोजी झाले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व ( Importance of national sports day)


मानवी आयुष्यामध्ये खेळाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.खेळाचे फायदे मोठ्या प्रमाणात आहेत.मानवाची शारीरिक क्षमता विकसित करणे आणि आरोग्य निरोगी राखणे खेळामुळे शक्य होऊ शकते."व्यायामाला बिना पैशाचा डॉक्टर "असे संबोधले जाते आणि खेळामुळे मोठ्या प्रमाणावर व्यायाम होतो म्हणूनच,खेळाच्या माध्यमातून माणसाला निरोगी आयुष्य जगता येणे सहज शक्य आहे.

आजच्या आधुनिक युगात माणूस धकाधकीच्या आयुष्य जगत आहे. माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुद्धा वेळ नाही.आजच्या या आधुनिक युगात खेळाचे महत्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले आहे.लोकांना खेळाचे महत्व पटवे म्हणून शासन विविध प्रयत्न करताना दिसून येते अगदी,शाळा स्तरावरून याचा प्रयत्न होताना दिसून येतो. खेळाडूंना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येतात.भारतासारख्या देशात असंख्य असे खेळाडू तयार व्हावे ही सरकारची इच्छा असते परंतु,या धकाधकीच्या आयुष्यात ते साध्य होताना दिसत नाही.

लोकांनी वैयक्तिक आयुष्यातून थोडे बाहेर येऊन खेळायलाही महत्त्व द्यावे. प्रत्येक नागरिकाने खेळावे,बागडावे,व्यायाम करावा.प्रत्येक नागरिकाला खेळाचे महत्व माहित व्हावे म्हणून,भारतामध्ये दरवर्षी भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

जीवनात खेळाचे महत्व निबंध  ( Sports importance in life essay in marathi)


मानवी जीवनामध्ये खेळाला प्राचीन काळापासून अनन्यसाधारण असे महत्त्व देण्यात आले आहे.भारतात देखील प्राचीन काळी कुस्ती,मल्लखांब, विविध मैदानी खेळ यांच्या स्पर्धा भरवल्या जात.राजे-महाराजे खेळांना आश्रय देत.त्याकाळी खेळांचे महत्व लोकांनी जाणले होते दुर्दैवाने आजच्या आधुनिक युगात आपण खेळाचे महत्व विसरत चालले आहोत. खेळांची खरी गरज आजच्या युगातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आहे.

आज भारतामध्ये जगातील दोन नंबरची लोकसंख्या असून देखील, ऑलम्पिक मध्ये पदक मिळवताना भारतासारख्या देशाची दमछाक होताना दिसून येते.भारतापेक्षा लहान-लहान देश मोठ्या प्रमाणावर पदके मिळवतात.या गोष्टीचा आपण मोठ्या प्रमाणावर विचार केला पाहिजे. देशातील मुलांना शालेय स्तरापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ असून भारताने खेळासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर राहणे हे अत्यंत भूषणावह आणि देशाच्या लौकिकात भर घालणारी बाब आहे.मानवी जीवनामध्ये खेळासाठी रोज किमान अर्धा तास तरी द्यायला हवा.खेळामुळे माणसाचा व्यायाम होतो.व्यायामामुळे माणसाचे आरोग्य निरोगी राहते.खेळ हा मनुष्याला जीवनामध्ये कधीच निराशा येऊ देत नाही.

जीवनामध्ये खेळाला नेहमी उच्च स्थान द्यावे.खेळामुळे माणसाच्या आरोग्यात खूप चांगले बदल घडून येतात.खेळामुळे माणसाला समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण होते.खेळामुळे माणसाच्या जीवनात चांगले बदल घडून येतात.खेळ हा माणसाच्या जीवनात चांगले बदल घडवून आणतो.

राष्ट्रीय क्रीडा दिन निबंध 10 ओळींमध्ये ( National Sports Day essay 10 lines in marathi)राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध1. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
2. मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.
3. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते.
4. राष्ट्रीय क्रीडा दिन भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
5. या दिवशी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
6. राष्ट्रीय क्रीडा दिनामुळे नागरिकांना खेळाचे महत्व लक्षात येते.
7. राष्ट्रीय क्रीडा दिवस विविध स्पर्धांनी साजरा करण्यात येतो.
8. या दिवशी देशात खेळाचे वातावरण तयार झालेले असते.
9. या दिवशी भारतातील महान खेळाडूंचे आपण स्मरण करतो.
10. भावी खेळाडूंसाठी हा दिवस खूप मौल्यवान असतो.


राष्ट्रीय क्रीडा दिन कसा साजरा करावा  (How to celebrate National Sports Day)


29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना आपण तो विविध प्रकारे साजरा करू शकतो.राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करताना तो नेहमी इतरांच्या स्मरणात राहील या पद्धतीने साजरा करा. राष्ट्रीय क्रीडा दिन आपण खालील पद्धतीने साजरा करू शकतो-

 • या दिवशी खेळाच्या स्पर्धा भरवाव्यात.
 • आपल्या गावातील खेळाडूंना बक्षीस द्यावीत.
 • नवीन खेळाडूंना प्रोत्साहन पर बक्षीस द्यावीत.
 • नागरिकांना खेळाचे महत्व माहित व्हावे म्हणून भाषणे ठेवावीत.
 • खेळाचे महत्व सांगणारे चित्रपट दाखवा.
 • खेळाचे महत्व सर्वांना समजावून सांगा.
 • या दिवशी भारतातील प्रसिद्ध खेळाडूंची संघर्ष कथा मुलांना सांगावी.
 • सर्व नागरिकांना खेळाचे महत्व पटवून द्यावे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे -

1. राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर - भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

2. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?

उत्तर - राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

3. मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते?

उत्तर - मेजर ध्यानचंद हॉकी खेळाशी संबंधित होते.


मोलाचे बोल -

जगामध्ये आज खेळाला खूप महत्त्व दिले जाते परंतु,भारतामध्ये याउलट स्थिती दिसून येते.भारतामध्ये आज देखील खेळांविषयी लोक फारसे चांगल्या नजरेने पाहताना दिसून येत नाही.भारतीय लोक खेळांबाबत अजून पूर्णपणे समजदार झालेले नसून,खेळ हे केवळ पैसा मिळवण्याचे साधन नसून आपले आरोग्य सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे कामगिरी बजावणारे अस्त्र आहे हे लक्षात घ्यावे.

लोकांना ज्यावेळेस खेळाचे महत्व लक्षात येईल त्यावेळेस भारत देश नक्कीच खेळात महासत्ता झालेला असेल.आमचा आजचा राष्ट्रीय क्रीडा दिन,national sports day in marathi,मेजर ध्यानचंद जयंती 29 ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिवस निबंध हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा.
जागतिक साक्षरता दिन, International Literacy Day 8 September in marathi

 
जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi

जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi 


साक्षरता म्हणजे काय? तर साक्षरता म्हणजे रोजच्या व्यवहारात एखाद्या व्यक्तीला आकडेमोड जमणे किंवा जीवनात व्यवहार ज्ञान कळण्याईतपत अंक,अक्षर ओळख असणे होय.आज जगात पाहिले तर सर्वात जास्त साक्षर असलेले देश प्रगत आहे आणि सर्वात निरक्षर देश अप्रगत राहिले आहेत.साक्षरता हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.साक्षरता म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी केलेले श्रम होय.आजच्या आधुनिक काळात साक्षरता हा शब्द खूप मौल्यवान झाला आहे.साक्षरता हि काळाची गरज बनली आहे.आज जगात खूप देश,राज्य अशी आहेत की जी साक्षरतेच्या बाबतीत मागासलेली आहेत.पुरुष वर्गापेक्षा स्री वर्ग या बाबतीत खूप मागासलेला आहे.जगातील हा साक्षरतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी युनेस्को ने 8 सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.या दिवशी जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्याचा संकल्प सोडला जातो.


निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा शाप आहे.पण माणूस निरक्षर का राहतो? याचा विचार केला आहे का आपण? माणूस निरक्षर राहण्याची खूप कारणे आहेत.


 • जगातील बहुतेक विद्यार्थी घरच्या गरिबीमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
 • जगातील काही भटक्या विमुक्त जमाती त्यांच्या अडचणींमुळे शिक्षण घेऊ शकत नाही.
 • स्थलांतरामुळे खूप विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही.
 • काही मुले बालकामगार बनतात म्हणून ते शिक्षण घेऊ शकत नाही.

या सर्व कारणांमुळे साक्षरता म्हणावी तशी दिसून येत नाही.युनेस्को च्या माध्यमातून या सर्व कारणांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.भारतात सर्व प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते.यामुळे गरीब विद्यार्थ्यांची जेवणाची गरज भागली जाऊन त्यांना शिक्षणाचा आनंद मिळत आहे.भटक्या विमुक्त जमाती साठी जागोजागी शाळा चालवण्याचे कार्य सेवाभावी संस्था,सरकार करत आहे.सरकार निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे.भारतात मध्यंतरी प्रौढसाक्षर वर्ग सुरू करण्यात आले होते त्यामध्ये प्रौढ व्यक्तींना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले जात असत.आज अगदी कोणत्याही कंपनीत,कारखान्यात ,सरकारी नोकरी असो व खाजगी नोकरी असो सर्व क्षेत्रात शिक्षण गरजेचं आहे.अगदी रोजंदारीवर जरी काम असले तरी सही करण्यापुरते शिक्षण लागतेच.


साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी


 • ज्या त्या भागात तेथील बोलीभाषेत शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी जेणेकरून तेथील नागरिक,विद्यार्थी यांमध्ये शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण होईल.
 • लहान मुलांना हसत,खेळत मजेदार शिक्षण देण्याची सोय करण्यात यावी.लहान मुले शिक्षणाने लवकर कंटाळून जाऊ नये म्हणून खेळ,गाणी,गप्पा,गोष्टी यांमधून शिक्षण देण्याची गरज आहे.
 • शिक्षणात गावातील जाणत्या व्यक्तींची मदत घ्यावी.त्यांच्या कल्पना राबवण्याचा प्रयत्न करावा.
 • जागतिक शिक्षण क्षेत्रात होणारे बदल लक्षात घेऊन सर्व शिक्षकांना वेळेवर त्या त्या बदलांविषयी प्रशिक्षण देण्यात यावे.
 • शाळेत ग्रंथालये असावीत,ग्रंथ,पुस्तके हेच आपले गुरू असतात.
 • ग्रामीण भागात ग्रामीण विकास,सहकार्य या विषयी विविध कार्यक्रम राबवावेत.
 • मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांसाठी शाळेत विविध स्पर्धा, गायन,वादन,सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करण्यात यावी.
 • शासनाच्या सर्व योजना शाळा पातळीवर राबवण्यात याव्यात म्हणजे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतात.


जागतिक साक्षरता दिन का साजरा करण्यात येतो


 • जगातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
 • निरक्षर नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून दिली पाहिजे.
 • निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून जागतिक पातळीवर प्रगती साधने.
 • निरक्षरता तोटे नागरिकांना पटवून देऊन निरक्षरतेमुळे येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी त्यांना साक्षर करणे.
 • जगाची एकत्रित प्रगती साधण्यासाठी नागरिकांना साक्षर बनवून जगाची प्रगती साधणे.
 • सामूहिकपणे जगातील निरक्षरतेवर मात करणे.
 • जागतिक साक्षरता अभियान यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणे. 

निरक्षरतेमुळे होणारे परिणाम


 • निरक्षरता जीवनातील सर्वात मोठा कलंक आहे.
 • निरक्षर व्यक्ती जीवनात यशस्वी होत नाही.
 • निरक्षर व्यक्ती प्रगती साधू शकत नाही.
 • निरक्षर राष्ट्रे अप्रगत राहतात.
 • निरक्षरतेमुळे जीवनात खूप संकटे,अडचणी येतात.
 • निरक्षरतेमुळे जीवनमान खलावले जाते.
 • निरक्षरता आजच्या काळात सर्वात मोठा शाप आहे.
 • निरक्षरतेमुळे जगातील बहुतेक देश अप्रगत राहिले आहेत

या प्रकारे निरक्षरता हा मानवी जीवनात खूप मोठा कलंक आहे.महात्मा फुले यांनी लोकांच्या साक्षरतेसठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.भारतातील समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्व जाणले होते आणि भारतातील नागरिकांना साक्षरतेची गरज पटवून देण्यात समाजसुधारकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा शिक्षणाला खूप महत्व आहे. 

आज भारतात व जगात सुद्धा शिक्षणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तरी सुध्दा आजच्या काळात मोठ्याप्रमाणात शिक्षण गळती,शिक्षण नघेण हे प्रकार दिसून येतात. स्रियांच्या बाबतीत हे प्रमाण अधिक आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी सर्व जगातील नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.कोणत्या समस्या,अडीअडचणी आहेत.यांचा अभ्यास करून त्या सोडविण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याचा विचार केला पाहिजे.

जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्याची गरज आहे.प्रत्येक घटकाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.जगातील नागरिक, मुले हे कोणत्या कारणाने निरक्षर राहिले याचा विचार केला पाहिजे,त्यावर संशोधन करून मग त्यानुसार प्रयत्न करणे गरजेचे आहे.जागतिक साक्षरता वाढविण्यासाठी जागतिक पातळीवर अभियान राबविण्यात येत आहे.युनेस्को या बाबतीत खूप प्रयत्न करत असते.युनेस्कोच्या सहकार्याने जगातील बहुसंख्य देश,नागरिक साक्षर बनून त्यांनी निरक्षरतेवर मात केली आहे.

 

जागतिक साक्षरता दिवस 2022 थीम (World Literacy Day 2022 Theme )जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi


नेहमी विचारले जाणारे प्रश्न - 


1. जागतिक साक्षरता दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

उत्तर - जागतिक साक्षरता दिवस 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.


2. जागतिक साक्षरता दिवस 2022 ची थीम कोणती आहे?

उत्तर - "साक्षरता शिकण्याची जागा बदलणे" आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी आणि सर्वांसाठी दर्जेदार, समान आणि समावेशक शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी साक्षरता शिकण्याच्या स्थानांच्या मूलभूत महत्त्वावर पुनर्विचार करण्याची संधी असेल.


3. जागतिक साक्षरता दिवस 2022 कधी आहे?

उत्तर - गुरुवार,08 सप्टेंबर,2022 रोजी आहे.आजचा जागतिक साक्षरता दिन,जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी,जागतिक साक्षरता दिन कधी असतो,जागतिक साक्षरता दिन 2022 थीम,International Literacy Day 8 September in marathi हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.लेख आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.आणि आमच्या Information G या ब्लॉगला नक्की फॉलो करा.सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध

 स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध 


स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध


प्रस्तावना - सर्व भारतीय नागरिक दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात.भारताचा प्रमुख राष्ट्रीय सण म्हणून 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो.लहान मुलांना तर या दिवसाची ओढत लागून राहिलेली असते.लहान मुलांच्या जीवनातील हा सर्वात आनंदाचा दिवस असतो.लहान मुलांना त्यांच्यातील गुण या दिवशी दाखवण्याची संधी दिली जाते.दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत काढून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे.हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून,अनेक राष्ट्र भक्तांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत.आज आपण या लेखात स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध सर्व इयत्तांसाठी उपयुक्त पाहणार आहोत.


75 वा स्वातंत्र्य दिन निबंध  ( 75th Indipence day essay in Marathi)


भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळून यावर्षी म्हणजेच सन 2022 यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहे.भारत यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे परंतु, हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्व वीरांना आपण अभिवादन केले पाहिजे.कारण, त्यांच्यामुळेच आज आपण भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.

या 75 वर्षात भारतामध्ये मोठे अमलाग्र बदल घडून आले.भारत आज जगामध्ये एक महासत्ता म्हणून ओळखला जातो.भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत हा आधुनिक युगातील भारत बनला असून,आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण झाले आहे.

आज भारताचे नाव जगामध्ये मोठ्या आदराने घेतले जाते.जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होतो.भारत जगातील व्यापाराचे आज प्रमुख केंद्र बनला आहे.स्वातंत्र्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती साधली आहे.आज भारतीय जगात कुतूहलाचा विषय बनला आहे.

आज भारत खऱ्या अर्थाने एक स्वावलंबी देश म्हणून नावारुपास आला आहे.परक्यांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळवून गरुड पक्षाप्रमाणे भरारी घेणारा भारत आज जगामध्ये सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे.भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या योद्ध्यांचा हाच खरा सन्मान म्हणता येईल.जय हिंद जय भारत!


स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो?


भारताला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नसून,सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत घालून हे स्वातंत्र्य मिळाले आहे.स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतातील अनेक लहान मुले,तरुण,स्त्रिया,वयोवृद्ध पुरुष या सर्वांनी भारत मातेच्या रक्षणासाठी आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यात घालवले.या सर्वांच्या प्रयत्नाने भारताला स्वातंत्र्य मिळाले.हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारत मातेच्या रक्षणासाठी आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व बलिदान दिलेल्या वीर पुरुषांसाठी या वीर पुरुषांची आठवण आणि त्यांचा मान या दिवशी राखण्यात येतो.स्वातंत्र्य दिन हे भारताच्या आनंदाचे,उत्साहाचे,स्वातंत्र्याचे,ऐक्याचे,भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते.या सर्व गोष्टींसाठी भारतात स्वातंत्र्य दिन हा मोठ्या उत्साहात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो.


स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम


15 ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये सर्वत्र सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते.शाळा,विद्यालय,कॉलेज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात.या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा, संस्कृती कार्यक्रम,प्रभात फेऱ्या,भाषणे,नाटके,देशभक्तीपर गीते या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर मेजवानी असते.या सर्व कार्यक्रमांंबरोबरच मुलांसाठी खाऊची देखील विशेष काळजी घेतली जाते.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आनंदामुळे सर्व मुलांचे तोंड खाऊ देऊन गोड केले जाते.


स्वातंत्र्य दिनाची तयारी


शाळांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची तयारी जवळ जवळ 15 ते 20 दिवस अगोदर चाललेली असते.यामध्ये मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम बसविणे, मुलांकडून कवायत करून घेणे,भाषणे पाठ करून घेणे या प्रकारची लगबग सर्व शाळांमध्ये सुरू असते.ही कामे सर्व शिक्षक आणि मुले मोठ्या आनंदाने आणि न थकता करत असतात.शाळेची सजावट,रंग-रांगोळी, शाळेची स्वच्छता या गोष्टींची देखील मोठ्या प्रमाणावर दखल घेतली जाते.


15 ऑगस्ट राष्ट्रीय एकात्मतेचा सण


भारतावर इंग्रजांनी सुमारे १५० वर्ष राज्य केल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले हे स्वातंत्र्य आपणाला सहजासहजी मिळाले नसून यासाठी अनेक भारतीय नागरिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे.भारतीय नागरिकांनी केलेल्या या महान त्यागामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे.भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवून इंग्रजांना आपल्या देशातून पळून लावले म्हणून आपण या मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घ्यायला हवा.

एखादा देश लहान असू द्या परंतु,त्या देशाचे नागरिक एकजुटीत असेल तर, त्या देशावर कुणीही सत्ता मिळवू शकत नाही.स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय नागरिकांसाठी हाच महत्त्वाचा संदेश आहे की,सर्व भारतीय नागरिकांनी एकजुटीत रहा आणि राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवा. भारतातील सर्व नागरिक एकजूट होऊन एक नवीन भारत,शक्तिशाली भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा करूयात.


स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण माहिती आणि भाषण सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त नक्की वाचा.


स्वातंत्र्य दिन शौर्याचा दिवस


भारतीय स्वातंत्र्य दिन हा भारतीय राष्ट्रीय सणाबरोबरच,भारतीय लोकांसाठी पराक्रमाचा आणि शौर्याचा दिवस म्हणून देखील संबोधला जातो.भारतीय नागरिकांनी दाखवलेल्या पराक्रम आणि शौर्य मुळेच भारताला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले.हा दिवस सर्व भारतीय नागरिकांना भारतीय महापुरुषांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण करून देतो.भारतीय नागरिकांनी भारताच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी असेच शौर्य दाखवले पाहिजे ही शिकवण आपल्याला या सणातून मिळते.


स्वातंत्र्य दिन भारताच्या सामर्थ्याचा गौरव दिन


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील भारतावर पाकिस्तान आणि चीन यांनी वेळोवेळी आक्रमण केले परंतु,भारतीय सैनिक त्यांना पुरून उरले. भारताच्या या पराक्रमाची दखल स्वातंत्र्य दिनाच्या दिल्ली येथील कार्यक्रमात घेतली जाते.दिल्लीतील राजपथावर भारतीय लष्करातील विविध शस्रांचे प्रदर्शन केले जाते.भारत आत्ता पूर्वीसारखा राहिलेला नसून, भारत एक मोठी लष्करी महासत्ता म्हणून उदयाला येत आहे,याचे प्रतीक होय.आम्ही भारतीय लोक कुणावरही पहिले अतिक्रमण करणार नाही आणि आमच्यावर अतिक्रमण झाले तर शांत बसणार नाही हा इशारा या दिवशी सर्वांना दिला जातो.


स्वातंत्र्य दिनाची संपूर्ण माहिती नक्की बघा.


शेवटी एवढेच


भारतीय स्वातंत्र्य दिन भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी संपूर्ण भारतामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करत असतात.सर्व नागरिकांमध्ये देशभक्तीचा जोश ओसंडून वाहत असतो.लहान मुले आणि महिला देखील याला अपवाद नसतात.भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा हाच सर्वात मोठा विजय मानला जातो.भारतीय नागरिकांना आपल्या पूर्वजांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जाण आहे हे या सणातून व्यक्त करण्यात येते.अशाप्रकारे 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.स्वातंत्र्य दिन भाषण आणि निबंध तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा.
My mother essay in marathi, माझी आई निबंध मराठी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

 My mother essay in marathi, माझी आई निबंध मराठी सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 


My mother essay in marathi माझी आई निबंध मराठी


शाळेमध्ये परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विकास विचारला जाणारा प्रश्न निबंध लिहा.मग त्याचा विषय कोणता का असेना,आपल्याला त्या विषयावर निबंध लिहावा लागतो.आज आम्ही या पोस्टमध्ये इयत्ता दुसरी ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा निबंध माझी आई निबंध मराठी हा सादर करीत आहोत तरी सर्व विद्यार्थ्यांनी हा उपयुक्त निबंध अवश्य वाचावा.

माझी आई निबंध मराठी १० ओळी (My mother essay marathi 10 lines)


1. माझ्या आईचे नाव जनाबाई आहे.

2. ती उत्तम गृहिणी आहे.

3. माझी आई शेतात काम करते.

4.  माझी आई सकाळी लवकर उठून संध्याकाळी उशिरापर्यंत जागी असते.

5. माझी आई आम्हा सर्व भावंडांचे लाड करते.

6. माझी आई घरातील सर्व काम स्वतः करते.

7. माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते.

8. माझ्याही दिवसभर शेतात काबाडकष्ट करते.

9. माझी आई घरासाठी खूप खूप कष्ट करते.

10. माझी आई गोरगरिबांना मदत करते.


माझी आई निबंध मराठी २० ओळी (My mother essay marathi 20 lines)


1. माझी आई पहाटे लवकर उठून कामाला सुरुवात करते.
2. माझी आई सकाळी सकाळी शेतातील कामावर जाते.
3. माझी आई छान स्वयंपाक बनवते.
4. माझी आई शेतात वडिलांबरोबर काम करते.
5. माझी आई बाजारातून माझ्यासाठी खाऊ घेऊन येते.
6. माझी आई मला चांगले संस्कार लावते.
7. मला ती दादा या नावाने हाक मारते.
8. ती गोरगरिबांना नेहमी मदत करते.
9. माझ्या इतरांना नेहमी मदत करते.
10. माझी आई इतरांच्या दुःखात नेहमी सहभागी होते.
11. वडिलांना ती प्रत्येक कामात मदत करते.
12. माझी आई नेहमी मला चांगले उपदेश करते.
13. माझी आई प्रत्येकाबरोबर चांगले बोलते.
14. माझ्या आईच्या हाताला सुगरणीची चव आहे.
15. ती नेहमी आनंदी असते.
16. आपल्या मुलाने देशाची सेवा करावी असे तिला वाटते.
17. देशसेवेची तिला आवड आहे.
18. माझी आई उत्तम पुरणपोळी बनवते.
19. ती गरजवंताला नेहमी गरज करते.
20. माझी आई माझ्यासाठी देवच आहे.

माझी आई निबंध मराठी फोटो ( My mother essay in marathi photo)


माझी आई निबंध मराठी फोटो ( My mother essay in marathi photo)

माझी आई माहिती ( My mother information in marathi)


माझ्या आईचे नाव जनाबाई आहे.तिचे वय पन्नास वर्षे आहे.ती उत्तम गृहिणी आहे.ती शेतात काम करते.माझी आई रंगाने गोरी आहे.माझी आई उत्तम स्वयंपाक बनवते.ती सतत कामात मग्न असते.इतरांशी हसतमुखाने आणि आनंदाने बोलत असते. ती कोणालाही दुखावत नाही. गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी ती नेहमी तत्पर असते.तिला लहान मुलांची खूप आवड आहे.वयस्कर लोकांची सेवा करण्यास तिला खूप आनंद वाटतो.

घरातील सर्वजण सुखी राहावे त्यासाठी दिसतात प्रयत्न करत असते.
घरातील लोकांच्या आरोग्याबाबत ती सदैव दक्ष असते. माझी आई आम्हा सर्व भावंडांची व्यवस्थित काळजी घेते.आम्हाला गोड गोड खाऊ बनवून देते.घरातील वडीलधाऱ्या लोकांना ती नेहमी आदराने बोलते.माझी आई मला खूप आवडते.


माझी आई निबंध मराठी १०० शब्द ई. ३ री ते ५ वी ( My mother essay marathi 100 words 3rd to 5th)


माझी आई पहाटे लवकर उठून,माझ्या शाळेचा डबा तयार करून, वडिलांबरोबर शेतावर कामाला जाते. दिवसभर शेतात काबाड कष्ट केल्यानंतर संध्याकाळी सर्वांचा स्वयंपाक बनवून घरातील सर्व कामे आवरून रात्री उशिरा झोपते.या प्रकारे तिची दिनचर्या आहे.

या दिनचर्येची तिला आता सवय झाली आहे.एवढे काबाडकष्ट करूनही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असत. इतरांना सुखात ठेवण्याची कला तिला अवगत झाली आहे .कुटुंबासाठी कितीही कष्ट करण्याची तिची तयारी आहे.

माझ्यासाठी ती नेहमीच गोड गोड खाऊ घेऊन येत असते. तिच्या हाताला सुगरणीची चव आहे.ती नेहमी खूप छान स्वयंपाक करते.घरातील सर्वजण तिच्या स्वयंपाकाची स्तुती करतात. मला ती अभ्यास करण्यास प्रोत्साहित करत असते. मी अभ्यास करून खूप मोठा साहेब व्हावे अशी तिची इच्छा आहे. या सर्व गुणांमुळे माझी आई मला खूप आवडते.

माझी आई निबंध मराठी २०० शब्द ई. ६ वी ते ८ वी ( My mother essay marathi 200 words 6th to 8th)


घरातील सर्वांना सुखी ठेवून आपले घर नेहमी आनंदी ठेवण्याची कला माझ्या आईला अवगत झाली आहे.घरातील सर्वांचे लाड पुरवण्यात तिला आनंद वाटतो. आम्हा सर्व भावंडांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. आम्हाला काय हवे नको ते सर्व ती पाहते.आम्हाला प्रत्येक गोष्टीत आईची मदत घ्यावी लागते.आम्हाला कोणती गोष्ट हवी असल्यास ती वडिलांशी बोलून ती गोष्ट आम्हाला घेऊन देत असते.आमच्यासाठी आमची आई देवच आहे.

आम्हाला अभ्यास करण्यास ती नेहमी प्रोत्साहित करत असते. तिला वाटते की,अभ्यास करून आपल्या मुलांनी सरकारी नोकरी करावी. ती नेहमीच आम्हाला अभ्यास करण्याबाबत सांगत असते.आम्हाला अभ्यासाची आवड लागावी म्हणून ती थोर नेत्यांच्या गोष्टी आम्हाला सांगत असते. शिवाजी महाराजांच्या कथा ती नेहमीच सांगते.आपल्या मुलांनी शूरवीर व्हावे,देशासाठी सेवा करावी अशी तिची मनोमन इच्छा आहे. आम्हाला ती खूप मोलाचे सल्ले देत असते. आमची शाळेतील प्रगती ती वारंवार तपासत असते.

माझ्यासाठी माझी आई नेहमीच गोड पदार्थ बनवत असते. माझी आई घरातील वृद्धांची व्यवस्थित काळजी घेते. घरी येणाऱ्या प्रत्येक मदत मागणाऱ्याला ती रिकाम्या हाताने पाठवत नाही.गरिबांना मदत करण्यास ती नेहमी पुढे असते. वडिलांना शेतीच्या कामात मदत करण्यास तिला खूप आनंद होतो. शेतातील प्रत्येक कामात ती वडिलांना हातभार लावत असते. माझी आई बाजारात गेल्यावर माझ्या कुटुंबासाठी हव्या असलेल्या वस्तू घेऊन येत असते.माझ्या कुटुंबासाठी ते दिवस रात्र मेहनत करत असते. माझे कुटुंब आदर्श कुटुंब व्हावे अशी तिची इच्छा असते.


माझी आई निबंध मराठी ३०० शब्द ई. ९ वी ते ११ वी ( My mother essay marathi ३00 words 9th to 11th)


माझी आई आमच्या गावातील एक प्रतिष्ठित महिला असून,गावातील इतर स्त्रिया तिच्याकडे वेगवेगळे कामे घेऊन येत असतात. गावातील स्त्रियांना एकत्रित करून तिने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटे-छोटे कुटीर उद्योग सुरू केले आहेत. गावातील महिलांना माझी आई खूप मोठा आधार वाटते. गावातील स्त्रियांच्या कोणत्याही अडचणी दूर करण्याचे ती काम मनोभावाने करते. स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यास ती पुढाकार घेते. स्त्रियांवरील अन्याय अत्याचार थांबवण्यास ती नेहमीच धावून जाते. माझी आई माझ्या गावासाठी खूप कष्ट करते.

माझ्या गावाने प्रगती करून देशात आदर्श असे गाव व्हावे असे तिला मनोमन वाटते.गावाच्या विकासासाठी ती नेहमीच एक पाऊल पुढे असते. गावातील प्रश्न सोडवण्यात तिचा नेहमीच पुढाकार असतो.गावातील लोक तिला आदराने हाक मारतात. गावातील लोकांना तिच्याविषयी आदर आहे. गावातील लोक नेहमीच तिच्या कार्याची प्रशंसा करतात. माझी आई नेहमीच बोलते, "हे विश्वचि माझे घर". या उक्ती प्रमाणेच ती गावाची सेवा मनोभावाने करत असते. गावातील प्रत्येक अडल्या नडलेल्या लोकांना ती नेहमी मदत करते.

माझी आई आमच्या शिक्षणाच्या बाबतीत खूप जागृत आहे.आमचा दररोजचा अभ्यास ती पाहत असते.आपल्या मुलांनी शिक्षणात चांगली प्रगती करून देशाच्या नावलौकिकात भर घालावी असे तिला वाटते."पोटाला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला". या म्हणी प्रमाणे आपल्या मुलांनी वागू नये असे तिला वाटते. समाजात जन्माला येऊन काही न करता मरणे हे तिला पटत नाही.जन्माला आल्यावर चांगली कर्तबगारी करूनच देह सोडावा असे तिला वाटते. आपल्या मुलांनी समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा असे तिला वाटते.समाजातील प्रत्येक गरजू घटकांना मदत करावीच असे ते आम्हाला निक्षून सांगते .

समाजातील प्रत्येक घटक हा आपला घटक मानून त्याच्या प्रगतीसाठी आपण मदत केली पाहिजे असे तिचे मत आहे. आमच्या गावातील स्त्रियांना हरप्रकारे मदत करण्यासाठी पुढे असते.स्त्रियांचे प्रश्न ती नेहमीच आनंदाने सोडवते. या सर्व व्यापातून घरावर तिचे बारीक लक्ष असते. घरात काहीही कमी पडू देत नाही. घरातील सर्वांची व्यवस्थित काळजी घेते. समाजाप्रमाणेच घरही तिला खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच ,घराबरोबर समाजाची देखील ती काळजी घेत असते.
माझी आई मला नेहमीच चांगले आणि मोलाचे सल्ले देत असते.मला माझ्या आईचे शब्द खूपच मोलाचे ठरतात. माझ्यासाठी ती नेहमीच चांगले निर्णय घेते.मला ती नेहमीच चांगले मार्गदर्शन करते.माझा ती नेहमीच लाड करते म्हणून, मला माझी आई खूप आवडते.

सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त निबंध अवश्य वाचा.
माझी आई निबंध मराठी १२ वी ५०० शब्द ( My mother essay marathi 12th 500 words)


मला बारावी च्या वर्षाला सर्वात मोलाची मदत करणारी आणि शैक्षणिक सल्ला देणारी माझी आई आहे. बारावी इयत्ता सुरुवात झाल्यापासून अगदी अभ्यासाचे वेळापत्रक बनवण्यापासून ते माझ्या खाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत या सर्वांची व्यवस्थित काळजी घे माझी आई घेते. बारावीच्या वर्गात मला कुठलीही अडचण आल्यास ती सोडवण्याचे कार्य ती ताबडतोब पूर्ण करते.मी जरी शिक्षण घेत असलो तरी माझ्यावर लक्ष ठेवण्याचे जबाबदारीचे कार्य ती पार पाडत असते.आपला मुलगा चांगल्या मार्काने पास होऊन आपल्यासारखेच कष्टाचे काम न करता चांगल्या पोस्टवर त्याने नोकरी करावी असे तिला वाटते. माझ्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्याचे काम ती करत असते.माझ्या शिक्षणाबाबत ती प्रचंड जागरूक असते.शेतात काबाड कष्ट करून ती मला मोठ्या हिमतीने शिकवते. शेतात वडिलांबरोबर कष्ट करून घरी आल्यावर माझे शाळेचे आवरून देऊन घरातील कामे करणे हा तिचा नित्यक्रमच बनला आहे.

माझी आई माझ्याप्रमाणेच माझ्या भावंडांच्या शिक्षणावर देखील लक्ष ठेव असते. माझ्या आईचे जीवन कष्टाने भरलेले आहे.आपल्या मुलांसाठी माझी आई कितीही कष्ट करायला तयार आहे.आपल्या मुलांचे जीवनात आपल्या प्रमाणेच कष्ट येऊ नये म्हणून ती मुलांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून असते.आपली मुले इतर वाईट मुलांच्या नादी लागू नये यासाठी ती विशेष जागृत असते.आपली मुले नेहमी चांगले आणि सन्मार्गाने वागावे म्हणून ती जागृत असते.माझी आई आम्हा सर्व भावंडांसाठी चांगले शिक्षण कसे देता येईल याचा प्रयत्न करते.आमच्या वर्गातील शिक्षकांशी ती नेहमीच भेटते आणि मुलांच्या प्रगती विषयी चर्चा करते.माझ्यासाठी माझी आई आदर्श आहे.

बारावीच्या वर्गात मुलांवर चांगले संसार घडायला हवेत असे तिला वाटते. बारावी वर्गापासून मुलांना परस्परांविषयी आकर्षण वाटू लागते. या गोष्टी चांगल्या प्रकारे सांभाळण्याचे कार्य करते. मला या विषयावरती मोलाचे मार्गदर्शन करते. शाळेत देखील या विषयावर मार्गदर्शन करण्याचे ती शिक्षकांना सांगत असते. एकंदरीत माझ्याबरोबर गावातील विद्यार्थ्यांवर देखील सुसंस्कार घडावेत असे तिला वाटते.प्रत्येक आई-वडिलांना त्यांच्या पाल्याकडून खूप अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण करणे हे पाल्याची कर्तव्य असते याची जाणीव ती आम्हाला करून देत असते.आमच्यासाठी माझे आई वडील किती कष्ट करत असतात याची जाणीव देखील ती आम्हाला करून देत असते.आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ नये असे तिला मनोमन वाटत असते.आई-वडील मुलांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवतात आणि त्या पूर्ण करणे मुलांचे कर्तव्य आहे असे तिला वाटते.

मुलांनी आई-वडिलांच्या आज्ञा पाळायला हव्यात असे ती आम्हाला सांगते. माझी आई आम्हा सर्व भावनांकडून शेतातील कामे देखील थोड्या प्रमाणात करून घेत असते .मुलांना आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव हवी आणि कष्टाची सवय राहावी हा त्यामागचा मायेचा हेतू असतो. आपल्या आई वडील किती कष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात हे देखील त्यामधून समजते.माझी आई आमच्यासाठी पहाटेच उठून आंघोळीसाठी पाणी आणि गरमागरम नाश्ता आणि शाळेचा डबा तयार करून ठेवत असते मुलांसाठी किती कष्ट करण्याची तिची तयारी असते.तिला नेहमी वाटते की मुलांनी आपल्या कष्टाची जाण ठेवून इतरांना देखील मदत करायला हवी.शाळेतील गरजू आणि होतकरू मुलांना मदत करण्यासाठी ती नेहमीच आम्हाला प्रोत्साहित करते. इतरांना मदत करावी हा येतो यामागे तिचा असतो.

माझ्या बारावीच्या वर्गासाठी तिने मला रोज पहाटे उठण्यास आणि अभ्यास करण्याची सवय लावली आहे.रोज पहाटे उठून अभ्यास केल्यावर तो अभ्यास चांगल्या प्रकारे लक्षात राहतो असे तिला वाटते.सकाळी लवकर उठल्यामुळे मन आणि आरोग्य देखील उत्साही राहते.आपली मुले उत्साही आणि निरोगी राहावी यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. माझी आई आम्हाला व्यायाम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असते. आपल्या मुलांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यावा असे तिला वाटते आणि ती त्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देते.माझी आई आम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी पाठिंबा देण्यास मागे पुढे पाहत नाहीत.आपल्या मुलांनी नेहमी चांगल्या गोष्टी कराव्यात असे तिला वाटते.आईबद्दल दोन शब्द ४०० शब्द (A word about mother 400 words)


"स्वामी तिन्ही जगाचा,
आईविना भिकारी".

या उक्तीप्रमाणे पाहिलं तर जगात आई शिवाय कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसते.अगदी मुल जन्माला आल्यापासून तर जोपर्यंत त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मुलाला मायेने जपणारी आणि मुलाच्या दुःखात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी आईच असते.आपण सहज बोलतो की,आई आहे काही काळजी नाही म्हणूनच,जगातील सर्वात नशीबवान व्यक्ती म्हणजे त्याला त्याच्यामागे खंबीरपणे उभी असणारी आई असते.माणसाकडे किती संपत्ती आहे हे महत्त्वाचे नसून,माणूस कौटुंबिक दृष्ट्या किती सुखी आहे? हे महत्त्वाचे आहे.कुटुंबाला सुखात ठेवणारी आई असते.कुटुंबाला आनंदात ठेवण्याचे काम ती करत असते. आई शिवाय कुटुंब हे अपूर्ण असते.

आज जगात असंख्य आईविना अनाथ झालेली मुले आपण पाहत असतो. या मुलांच्या जडणघडणीवर कोणाचेही लक्ष नसते. आई विना वाढलेली मुले मोठ्या प्रमाणात वाईट गोष्टींच्या आहारी गेलेली असतात.आईचे महत्व अशा आईविना अनाथ झालेल्या मुलांना विचारा, मग आपल्याला कळेल की आपली आई आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे. आई मुलाला जगात जगायची रीत शिकवत असते जगात कसे वागावे ,कसे बोलावे, कसे चालावे या सर्वांचे शिक्षण आपल्याला आई देत असते.शाळेत आपण शैक्षणिक ज्ञान घेत असतो परंतु व्यवहार ज्ञान देण्याचे कार्य आपली आईच करत असते.आई ही असा शिक्षक आहे की, जी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या मुलाला निरंतर अमूल्य असे मार्गदर्शन करत असते.आईच्या मनात आपल्याविषयी कोणतीही स्वार्थाची भावना नसते. स्वतःच्या हाताला चटके घेऊन ती मुलांना भाकरी बनवून देत असते म्हणूनच आईच्या मायेचे मोल जगातील कोणत्याही गोष्टीला नसते असे म्हटले जाते.

असे बोलले जाते की ईश्वराला प्रत्येक माणसाची स्वतः येऊन काळजी घेणे शक्य नाही म्हणून, त्याने प्रत्येक व्यक्तीला आई दिली.आई हिच आपला ईश्वर प्रत्येकाने मानले पाहिजे.आईला आपला मुलगा अगदी नकटा असला, काळा असला ,शेंबडा असला तरी प्यारा असतो कारण, त्या मुलाला तिने स्वतः जन्म दिलेला असतो. त्या मुलासाठी तिने नऊ महिने नऊ दिवस स्वतः यातना भोगलेल्या असतात म्हणून, आपले मूल कसे असले तरी तिला ते प्राणाहून प्रिय असते. आपल्या मुलाची ती नेहमीच काळजी करत असते .मुलाच्या प्रगतीसाठी मुलाची आई निरंतर प्रयत्न करत असते .आपल्या मुलाने जगात यशस्वी नागरिक व्हावे यासाठी ती प्रयत्नशील असते. आपल्या मुलांनी जगात नेहमीच ताट मानेने जगावे असे कोणतेही आईला वाटत असते.
कोणत्याही मुलांसाठी आई प्राणाहून प्यारे असते.मुलाला भवितव्य देण्याचे काम आई करत असते.मूल भविष्यात कोणत्या मार्गाने जाईल हे आईच्या संस्कारांवर अवलंबून असते.प्रत्येक मुलाची आई आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्यासाठीच प्रयत्नशील असते.आई ही मुलांसाठी,"वासराची गाय असते आणि लंगड्याचा पाया असते".याचे कारण म्हणजे मुलाच्या प्रत्येक सुखात आणि दुःखात आई त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते.आई मुलाला कणखरपणा देण्याचा प्रयत्न करत असते. मुलाच्या सुखात आई आनंदी असते आणि मुलाच्या दुःखात आहे त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असते.मुलासाठी आई हि देवा पेक्षाही महत्त्वाची मानली जाते.मुलासाठी आई ही देवच असते."आईसारखे दैवत जगात नाही". असे त्यामुळेच म्हटले जाते.

आईचे महत्व ( Importance of mother)


आई माझा डब्बा झाला का तयार? रोज सकाळी या नाहीतर दुसऱ्या कोणत्याही कामाच्या वाक्याने आपल्या जीवनातील आईचे महत्व अधोरेखित होते.आपल्या जीवनात आईचे महत्व खूप आहे अगदी जन्माला आल्यापासून ते आपली आई आहे तोपर्यंत तिचे महत्व आपल्यासाठी खूप मोलाचे असते.आपल्या जीवनाला आकार देण्याचे काम ती करत असते.ईश्वर आपल्याला जन्माला घालतो परंतु,आपल्या जीवनाला संपूर्ण आकार देण्याचे काम काहीच करत असते.मूल जन्माला आल्यानंतर त्याला संपूर्ण जीवन जगण्याची कला हीच आईच शिकवत असते. मुलाच्या जीवनात आईचे महत्व देवा पेक्षा जास्त असते.आई ही मुलांसाठी मायेचा आधार असते.

आपल्या मुलांना समाजात चांगल्या रीतीने वागता यावे यासाठी त्यांना चांगले वळण लावण्याचे काम आईच करत असते.आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सतत राब राब राबणारी आईचा असते. आपल्या कुटुंबाला चांगले दिवस येण्यासाठी ती सतत कष्ट करत असते.आपल्या मुलाने कुठल्याही वाईट व्यसनांच्या,गोष्टींच्या आहारी जाऊ नये यासाठी ती सतत काळजी घेत असते.आपल्या मुलांसाठी आई मातीपेक्षा मऊ आणि वेळ आलीच तर हिऱ्यापेक्षाही कठीण होते.आपल्या मुलांना समाजात कोणीही वाईट बोलू नये,हीन दर्जाची वागणूक देऊ नये यासाठी ती सतत प्रयत्न करत असते.आपल्या मुलांनी समाजाला आदर्श बनून मान मिळवावा यासाठी ती सतत प्रयत्न करत असते.प्रसंगी आपल्या मुलांची बाजू घेऊन समाजाशी झगडणारी आईच असते.

आपल्या मुलाच्या जन्मापासून ते मुलगा मोठा होईपर्यंत मुलांसाठी जीवाचे रान करणारी आईच असते.मुलांना समाजाची रीत शिकवणारी आईच असते.आपल्या मुलांच्या भल्यासाठी समई प्रमाणे सतत तेवत राहणारी आपली आईच असते.मुलांसाठी आई वासराची गाय असते.आईला मला शिवाय कोणतीही गोष्ट अमूल्य नसते.अशी ही आईची माया मुलांना हवीहवीशी वाटत असते.


मोलाचे बोल


माझी आई निबंध मराठी हा निबंध ई.२ री ते ४ थी, ई.५ वी ते ७ वी, ई. ८ वी ते १० वी आणि ११ वी व १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा निबंध अगदी १० ओळी ,२० ओळी, १०० शब्द ते ५०० शब्दांपर्यंत हा निबंध उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दृष्टीने हा निबंध वाचून लिहिण्याचा प्रयत्न करावा म्हणजे,निबंध पाठ होईल आणि आपल्या हक्काचे मार्क्स मिळवता येतील.निबंध कसा वाटला आवश्य कमेंट करून सांगा.